Home » त्रिपुरा मध्ये वाढणाऱ्या एचआयव्ही संक्रमानाच कारण काय ?

त्रिपुरा मध्ये वाढणाऱ्या एचआयव्ही संक्रमानाच कारण काय ?

by Team Gajawaja
0 comment
HIV AIDS
Share

भारतातील त्रिपुरामधील शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये एड्सच संक्रमन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्रिपुरा राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्रिपुरामध्ये एचआयव्हीमुळे ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे दररोज एचआयव्हीचे पाच ते सात रुग्ण सापडत आहेत. त्रिपुरात नेमकं असं घडलं काय की इतके विद्यार्थी एचआयव्ही पॉजिटिव आढळलेत. जाणून घेऊया या व्हीडियोच्या माध्यमातून. (HIV AIDS)

HIV AIDS या सारख्या भयाण आजाराने त्रिपुरा राज्यात 47 विद्यार्थ्यांचा जीव घेतलाय आणि 828 विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्रिपुरा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातल्या सर्वात लहान राज्यापैकी एक आहे. आता तिथे मोठ्याप्रमाणात एचआयव्ही रुग्ण सापडण्याच्या घटना घडत आहेत. काय आहे या भयाण विषाणूच्या संक्रमाणा मागचं कारण ? त्रिपुरात नेमकं असं घडलं काय की इतके विद्यार्थी एचआयव्ही पॉजिटिव आढळलेत. (HIV AIDS)

HIV AIDS असा आजार आहे जो माणसाला पूर्णपणे निकामी करतो. या विषाणू ची लागण झालेल्या व्यक्तीचा अकाली मृत्यू होतो. महत्त्वाचं म्हणजे या आजाराच्या सुरवातीच्या काळात लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे लवकर निदान करून त्यावर उपचार करणं कठीण होतं. म्हणून एचआयव्ही ला सायलंट किलरही म्हटलं जातं. आणि म्हणूनचं त्रिपुराच्या एचआयव्हीबाबत चिंताजनक अहवालाने सर्वांनाच धक्का दिला आहे. हा अहवाल सादर करणारे त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल TSACS च्या वारिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार 828 रुग्णांपैकी 572 विद्यार्थी अजूनही जिवंत आहेत आणि 47 लोकांचा या भयानक संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. आणि बरेच संक्रमित विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी राज्यातून बाहेर गेल्याची माहीती आहे. (HIV AIDS)

एचआयव्ही हा प्रामुख्यानं लैंगिक संबंधांतून पसरतो, पण त्याचं त्रिपुरा राज्यात आणि खासकरून विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित होण्याचं कारण वेगळं आहे. अमली पदार्थांच्या सेवनामुळे हे संक्रमण झाल्याचं लक्षात येतयं. अमली पदार्थ शरीरात इंजेक्ट करण्यासाठी वापरण्यात येणारे injections शेअर केल्यामुळे एचआयव्ही, ब्लड to ब्लड transmit होऊन त्याच संक्रमण मोठ्या प्रमाणात झालं. त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीनुसार 220 शाळा आणि 24 कॉलेज आणि विश्वविद्यालयांमधील विद्यार्थी अमली पदार्थ सेवनात सहभागी आहेत. या अवहाला मुळे आणखी एक धक्का बसला तो म्हणजे विद्यार्थ्यांना असणाऱ्या अमली पदार्थांच्या व्यसनाचा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एचआयव्ही पॉजिटिव आढळलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अधिकतर विद्यार्थी श्रीमंत कुटुंबातील आहेत जिथे आई वडील दोघही सरकारी कर्मचारी असून त्यांनी मुलांचे सर्व हट्ट पुरवले आहेत पण जेव्हा त्यांना समजले की त्यांची मुले ड्रग्सला बळी पडली आहेत, तेव्हा खूप उशीर झाला होता.

मे 2024 पर्यंत art म्हणजेच अॅंटीरेट्रोव्हायरल थेरपी केंद्रानुसार त्रिपुरा मध्ये एचआयव्ही पीडितांची संख्या 8729 इतकी आहे. त्यापैकी 5674 लोक जिवंत असून 4570 पुरुष आणि 1103 महिलारुग्ण आहेत,आणि फक्त एक ट्रान्सजेंडर आहे. HIV संक्रमण थांबवण्यासाठी आणि एचआयव्ही रुग्णांना बरं करण्यासाठी ART म्हणजेच एंटीरेट्रोवायरल थेरपी ही मुख्य उपचार पद्धती आहे, या थेरपीत एचआयव्हीची रक्तातली पातळी कमी ठेऊन रुग्णांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवली जाते. (HIV AIDS)

==================

हे देखील वाचा: ‘हे’ उपाय करा आणि मिळवा डेरेदार तुळस

==================

आता राज्यभरात HIV आणि ड्रग्सच व्यसन या दोन्ही समस्यांना तोंड देण्यासाठी ART सारखी उपचार पद्धती आणि वद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाचे उपक्रम राबवले जाणार आहेत. Aids सारख्या आजारा बद्दल माध्यमांद्वारे जनजागृती पसरत असली तरीसुद्धा आजही अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमजुतींना समाजात खतपाणी मिळतं. त्यामुळे आपण एड्स बद्दल जागरूक असणं आणि लोकांपर्यंत त्याची माहिती पोहचवण खूप महत्त्वाच आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.