Home » कंकणाकृती सूर्यग्रहण

कंकणाकृती सूर्यग्रहण

by Team Gajawaja
0 comment
Ring Of Fire
Share

यावर्षातील सर्वात मोठे आणि दुसरे सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर रोजी होत आहे. ही खगोलीय घटनेला बघण्यासाठी अनेक उत्सुक असतात. वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे. कंकणाकृती सूर्यग्रहणाला रिंग ऑफ फायर म्हणतात. यावेळी आकाशात आगीचे वलय दिसते. खगोलीय घटनांमध्ये रस असलेल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. मात्र हे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. ग्रहण दक्षिण अमेरिकेत होणार आहे. 2 ऑक्टोबर 2024 रोजीच पितृ पक्षाच्या शेवटच्या दिवस सून सर्व पितृ अमावश्या आहे. यावेळी होणारे ग्रहण हे शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण असणार आहे. या ग्रहणाचा एकूण कालावधी 06 तास 4 मिनिटे असणार आहे. (Ring Of Fire)

पृथ्वीवर ज्या काही दुर्मिळ खगोलीय घटना घडतात, त्यात सूर्यग्रहाणाचा समावेश आहे. अशीच खगोलीय घटना 2 ऑक्टोबर रोजी होत आहे. हे कंकणाकृती सूर्यग्रहण वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण असणार आहे. चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये असतो. त्यामुळे सूर्याकडून येणारा प्रकाश खंडित होतो. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या चंद्राचे अंतरही वेळोवेळी बदलत असते. चंद्राच्या अंतरातील बदलामुळे, पृथ्वीवरून पाहिल्यावर तो लहान आणि मोठा दिसतो. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तेव्हा तो मोठा दिसतो. या काळात सूर्यग्रहण झाले तर ते संपूर्ण सूर्याला व्यापते, यालाच संपूर्ण सूर्यग्रहण म्हणतात. त्यानंतर, अवकाशातून पाहिल्यास, पृथ्वीवर चंद्राची मोठी सावली दिसते. ज्या भागात सूर्यग्रहण होते तेथे दिवस काही मिनिटांसाठी रात्रीसारखा होतो. (International News)

तापमानातही घसरण होते, हे आधी झालेल्या सूर्यग्रहणानंतर स्पष्ट झालं आहे. यावेळी होणारे कंकणाकृती सूर्यग्रह हे खगोलप्रेमींसाठी आणि छायाचित्रकारांसाठी मोठी मेजवानी ठरते. कारण यावेळी आकाशात जो नजारा दिसतो तो अद्भूत असतो. कंकणाकृती सूर्यग्रहणादरम्यान चंद्र पृथ्वीपासून दूर जात असताना त्याचा आकार बदलतो. नंतर ते लहान दिसते. सूर्यग्रहणाच्या वेळी ते सूर्याला पूर्णपणे झाकत नाही. या कारणामुळे सूर्याच्या कडा दिसतात. पृथ्वीवरून पाहिल्यास असे दिसते की जणू आकाशात आगीचे वलय आहे. यावेळेच सूर्यग्रहण सहा तासांपेक्षा जास्त काळ असल्यामुळे ज्या भागातून हे ग्रहण दिसणार आहे, त्यांना हे सूर्याचे तेजपूंज कंकण अधिक काळ बघता येणार आहे.
भारतीय वेळेनुसार, हे सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर रोजी रात्री 9:13 पासून सुरू होईल आणि 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:17 पर्यंत दिसेल. कंकणाकृती सूर्यग्रहण चिली, अर्जेंटिना आणि पॅसिफिक महासागरात दिसणार आहे. हे आंशिक सूर्यग्रहण दक्षिण अमेरिकेतील इतर देशांमध्ये दिसणार आहे. (Ring Of Fire)

हे ग्रहण बघण्यासाठी या भागातील नागरिकांनी उंच पर्यटन स्थानावर गर्दी केली आहे. तसेच या भागातील हॉटेलमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. गेल्या सूर्यग्रहणादरम्यान अमेरिकेमध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाला होता. यावेळीही नागरिकांमध्ये ग्रहण बघण्यासाठी मोठा उत्साह आहे. अर्थात या उत्साही नागरिकांनी सूर्यग्रहण बघतांना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. ग्रहण बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात खास चष्मे उपलब्ध असून त्यातूनच ग्रहण बघण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अमेरिकेमध्ये अनेक हॉटेलमध्ये हे ग्रहण बघण्यासाठी येणा-या पर्यटकांसाठी खास व्यवस्था कऱण्यात आली आहे. अमेरिकन स्थानिक वेळेनुसार, आंशिक ग्रहण सकाळी 11:42 वाजता सुरू होईल. यावेळेत चंद्र सूर्यासमोरून जाईल. यानंतर दक्षिण प्रशांत महासागरात दुपारी 12:50 वाजता कंकणाकृती सूर्यग्रहण सुरू होईल. (International News)

======

हे देखील वाचा : सूर्यग्रहणाची छाया आणि घटस्थापना

======

अटलांटिक महासागरात दुपारी 4:39 वाजता रिंग ऑफ फायर संपेल. ग्रहण दक्षिण अटलांटिक महासागरात संध्याकाळी 5:47 वाजता संपणार आहे. हे वर्षातील दुसरे सूर्यग्रहण असून तेही भारतात दिसणार नाही. यापूर्वी ८ एप्रिलला वर्षातील पहिले सूर्यग्रहण झाले होते. परंतु हे सूर्यग्रहण दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील भाग, होमोलुलु, पॅसिफिक महासागर, अंटार्क्टिका, बेका बेट, अटलांटिक, चिली, पेरू, फ्रेंच पॉलिनेशिया महासागर, आर्क्टिक, फिजी, न्यू चिली, ब्राझील, मेक्सिको, उरुग्वे या उत्तर अमेरिकेच्या दक्षिणेकडील भागांमध्ये दिसणार आहे. ब्युनोस आयर्स या देशांमध्येही हे कंकणाकृती सूर्यग्रहण बघता येणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे त्याचे सुतकही येथे वैध ठरणार नसल्याचे जाणकारांनी सांगितले आहे. (Ring Of Fire)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.