Home » ग्लॅमरपासूर दूर असणारी कपूर गर्ल…

ग्लॅमरपासूर दूर असणारी कपूर गर्ल…

by Team Gajawaja
0 comment
riddhima kapoor
Share

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे बहुचर्चित लग्न एकदाचे झाले. या लग्नाचे फोटो आणि त्या संबंधित बातम्या आता सोशल मिडियवर सर्वत्र पसरल्या आहेत.  त्यामध्ये रणबीर आणि आलिया प्रमुख असले तरी अजून एका व्यक्तींनेही लक्ष वेधून घेतलं आहे. ती म्हणजे रिद्धीमा कपूर साहनी…. रणबीर कपूरची बहिण.  

ऋषी कपूर आणि नीतू कपूरची मुलगी… रणबीर आणि रिद्धिमा या भावंडाचं बॉण्डींग खूप चांगलं आहे.  तसंच रिद्धिमा आणि नीतू कपूर या माय लेकींचं नातं भक्कम आहे. ऋषी कपूर यांच्या निधनानंतर रिद्धिमानं खचलेल्या आपल्या आईला मदत केली.  

हिच रिद्धिमा, रणबीर आणि आलियाच्या लग्नात प्रमुख म्हणून वावरत होती. अगदी लग्नाच्या खरेदीपासून ते पाहुण्याच्या स्वागतापर्यंत सगळी जबाबदारी रिद्धिमानं घेतली. नीतू कपूरबरोबर रिद्धिमाही मिडीयालाही सामोरी जात होती. त्यामुळेच रणबीर आणि आलियासोबत सोशल मिडीयावर रिद्धिमाची तेवढीच चर्चा आहे.

  

riddhima kapoor

कपूर घराणे म्हणजे बॉलिवूडचे आद्यघराणे म्हटले पाहिजे… पृथ्वीराज कपूर यांनी बॉलिवूडमध्ये कपूर घराण्याची मुहूर्तमेढ रोवली… त्यानंतर राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर, ऋषी कपूर यांनी हा वारसा पुढे चालवला. कपूर घराण्यात बबिता आणि नितू कपूरसारख्या स्टार सुनाही आल्या, पण त्या लग्नानंतर चित्रपटात आल्या नाहीत.  

करिष्मा आणि करीना कपूरनं या बहिणी आपल्या घराण्याचा वारसा चालवत बॉलिवूडमध्ये आल्या.  याव्यतिरिक्त मात्र बाकींनी चित्रपटापासून स्वतःला दूर ठेवलं. यातलं एक प्रमुख नाव म्हणजे रिद्धिमा कपूर.  रिद्धिमा ही ऋषि आणि नितू कपूरची मुलगी. 

रणबीर जेव्हा चित्रपटात आला तेव्हा रिद्धिमाही डेब्यु करणार अशी चर्चा होती. मात्र रिद्धिमानं या सर्वांना विराम दिला. अत्यंत सुंदर असणारी रिद्धिमा काही जाहीराती आणि मॉडेल शो मध्ये दिसली. पण याव्यतिरिक्त ती बॉलिवूडमध्ये रमली नाही.  

ज्वेलरी डिझायनर म्हणून रिद्धिमा ओळखली जाते. 2017 मध्ये रिद्धिमाचा दिल्लीच्या 25 मान्यवर उद्योजकांमध्ये समावेश करण्यात आला होता. डिझायनिंग आणि मार्केटींगमध्ये पदवी घेतलेली रिद्धिमा ऋषि कपूरची अत्यंत लाडकी होती.  

रिद्धिमाचा जन्म 15 सप्टेंबर 1980 मध्ये जन्म मुंबईत झाला. त्याचवेळी कपूर घराण्यात करीना कपूरचाही जन्म झाला. गणेशजन्माच्यावेळी या दोन कन्यांचा जन्म झाल्यामुळे राज कपूर यांनी रिद्धि-सिद्धी आल्या असं म्हटलं. त्यावरुनच तिला रिद्धिमा असं नाव मिळालं. 

रिद्धिमा आपल्या भावाची, म्हणजेच रणबीरचीही खूप लाडकी आहे. लहानपणी रणबीर खोडकर म्हणून प्रसिद्ध होता. तेव्हा अनेकवेळा रिद्धीमानं आईवडीलांच्या रागापासून रणबीरचा बचाव केला आहे. लंडन येथे शिक्षण झालेली रिद्धिमा, भारत साहनी नावाच्या उद्योगपतीच्या प्रेमात पडली आणि 25 जानेवरी 2006 रोजी तिनं भारत साहनीबरोबर लग्न केलं. तिला समारा नावाची मुलगी आहे.  

रिद्धिमाचा स्वतःचा ज्वेलरी ब्रॅण्ड आहे. आर ज्वैलरी नावानं ओळखला जाणारा हा ब्रॅण्ड देशात आणि विदेशातही प्रसिद्ध आहे. याबरोबरच तिचा सॅम अण्ड फ्रेंडस नावाचा कपड्यांचा ब्रॅण्डही आहे.  

=====

हे देखील वाचा – आर माधवनचा मुलगा वेदांत माधवनचा अनोखा विक्रम, नेटिझन्सनी केला कौतुकाचा वर्षाव…

=====

कपूर घराण्याच्या रिद्धिमाची रहाणीही आपल्या घराण्यासारखी आहे. तिला ब्रॅण्डेड घडाळ्यांचा शौक आहे. ती योगमास्टरही आहे. ऋषि कपूर यांच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या आपल्या आईबरोबर रिद्धिमाचे योग करतांनाचे अनेक फोटो सोशल मिडीयावर आले होते.  

आता रणबीरच्या लग्नानिमित्त या मायलेकींचे नाते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. रिद्धिमा प्रत्येकवेळी आपल्या आईसोबत होती. भावाच्या लग्नाची सर्व जबाबदारी तिनं सांभाळली आणि आईलाही सोबत दिली.  कपूर घराण्याची ही लेक बॉलिवूडमध्ये सक्रीय नसली तरी तिची सोशल मिडीयावर म्हणूनच अन्य कपूर्ससारखी चर्चा आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.