१९६२ चं भारत-चीन वॉर हे इतिहासातलं एक असं युद्ध होतं, जिथे भारतीय जवानांनी खरंच अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. हे तेच वॉर आहे, जे वॉर ऑफ रेजांग ला म्हणून ओळखलं जातं. १३ कुमाऊं रेजिमेंटच्या जवानांना लडाखमधल्या चुशूल व्हॅलीत १८००० फुटांवर पाठवलं गेलं. तिथलं वातावरण म्हणजे सगळीकडे फक्त बर्फ आणि टेंप्रेचर शून्यापेक्षाही खाली. थंडी जास्त होती आणि कोणाकडे बरे थंडीचे कपडे, शूज नव्हते. पण जे होते ते हलक्या क्वालिटीचे होते. १८ नोव्हेंबर १९६२, रविवारचा दिवस होता, थंडी रोजपेक्षा जास्त वाढली होती. रात्री साडे तीन वाजता मोठा आवाज झाला.
ऑनरेरी कॅप्टन सुबेदार राम चंद्र यादव यांनी मेजर शैतान सिंग यांना सांगितलं, “८ प्लाटून के सामने से फायर आ रहा है” आणि भारतीय जवानांनी लांब बर्स्ट फायर केलं आणि चार- पाच चीनी सैनिक तिथेच गारद झाले आणि त्यानंतर सुरू झालं हिस्टरी मधलं असं वॉर, ज्यात मेजर शैतान सिंग यांच्या नेतृत्वाखाली १३ कुमाऊं रेजिमेंटच्या १२४ जवानांनी चीनच्या हजारो सैनिकांना टक्कर दिली आणि पुढे काय झालं असेल, हे जाणून घेऊ. (Rezang La 1962)
१९६२ चं इंडिया चीन वॉर हे अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरून सुरू झालं होतं. कारण? सीमावाद आणि भारताने दलाई लामांना आश्रय दिल्याचा राग. युद्धात लडाखमधलं रेजांगला हे एक अत्यंत महत्त्वाचं ठिकाण होतं. कारण हा खिंडीचा रस्ता होता, जिथून चुशूल व्हॅलीमध्ये एंट्री मिळायची. जर चीन आर्मीने रेजांग ला ताब्यात घेतलं, तर लेह आणि श्रीनगरपर्यंत त्यांचा रस्ता मोकळा झाला असता आणि इथेच भारताच्या १२४ जवानांनी चिनी सैन्याला अक्षरशः नाकीनऊ आणले. १८ नोव्हेंबरच्या पहाटे, चिनी सैन्याने रेजांगला पोस्टवर हल्ला चढवला होता. (Top Stories)
असं म्हटलं जातं, चीनचे जवळपास ५००० सैनिक होते आणि त्यांच्याकडे मोठ्या तोफा, मोर्टार, रॉकेट्स आणि भरपूर ॲमुनिशन होतंच आणि भारतीय जवानांकडे? फक्त १२४ जवान, जुन्या .३०३ रायफल्स, काही लाईट मशीन गन्स आणि लिमिटेड ॲमुनिशन. वर बर्फाळ वातावरण, मायनस डिग्री टेम्प्रेचर आणि लो क्वालिटी. तरीसुद्धा मेजर शैतान सिंग आणि त्यांच्या जवानांनी हार मानली नाही. आता मेजर शैतान सिंग हे राजस्थानच्या जोधपूरमधल्या बन्सूर गावचे. १ डिसेंबर १९२४ ला शैतान सिंग यांचा जन्म झाला. त्यांचे वडील लेफ्टनंट कर्नल हेम सिंग भाटी यांच्याकडूनच त्यांना देशसेवेची प्रेरणा मिळाली होती. (Rezang La 1962)
जोधपूरच्या राजपूत हायस्कूलमधून मॅट्रिक आणि नंतर जसवंत कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलं. १९४९ मध्ये ते कुमाऊं रेजिमेंटमध्ये कमिशन्ड ऑफिसर झाले. फुटबॉलपटू म्हणूनही ते पॉप्युलर होते, पण त्यांचा कमालीचा पराक्रम १९६२ मध्ये रेजांग ला युद्धात दिसला.
पहाटेच्या अंधारात चिनी सैन्याने रेजांगला वर हल्ला केला. त्यांनी याक आणि घोड्यांच्या गळ्यात लालटेन बांधून भारतीय सैन्याला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला. पण मेजर शैतान सिंग यांनी आपल्या जवानांना सावध केलं आणि लढाईला तयार ठेवलं. भारतीय जवानांनी उंचवट्या भागांना ढाल बनवलं आणि चिनी सैन्यावर जोरदार हल्ला चढवला. पहिल्या टप्प्यात ३५० चिनी सैनिकांनी हल्ला केला, त्यांना मेजर शैतान सिंग यांच्या रणनीतीने चारीमुंड्या चीत केलं. दुसऱ्या टप्प्यात ४०० सैनिक आले, भारतीय जवानांनी त्यांनाही परतवून लावलं. यानंतर सुद्धा चिनी आर्मी थांबली नाही. त्यांनी मोर्टार आणि रॉकेट्सचा मारा सुरू केला. भारतीय जवानांचा ॲमुनिशन संपत आलं होतं. अखेर फक्त ५-७ गोळ्या उरल्या. तरीही मेजर शैतान सिंग यांनी हार मानली नाही. त्यांनी आपल्या जवानांना बायनेटने हल्ला करायला सांगितलं. १२४ पैकी शेवटचे २० जवान खंदकांमधून बाहेर पडले आणि चिनी सैन्यावर हाताने लढत तुटून पडले. यात त्यांनी जवळपास १३०० चिनी सैनिक मारले आणि ३००० सैनिकांना माघार घ्यायला भाग पाडलं. (Top Stories)
===============
हे देखील वाचा :World War-I History : राजकुमार फ्रांज फर्डिनेंड यांच्या हत्येने सुरू झाले होते महायुद्ध?
===============
मेजर शैतान सिंग यांनी लढाईत अंगावर अनेक गोळ्या झेलल्या. त्यांचा हात जखमी झाला, तरी ते हिम्मत हरले नाही. ते शेवटच्या श्वासपर्यंत लढत राहिले. गंभीर जखमी झाल्यावरही ते एका खंदकातून दुसऱ्या खंदकात जाऊन जवानांना मोटिवेट करत राहिले. शेवटी, त्यांना वाचवण्यासाठी दोन जवान त्यांना घेऊन मागे निघाले, पण तेवढ्यात चिनी सैन्याने फायरिंग केली. मेजर यांनी आपल्या जवानांना माघारी जाण्यास सांगितलं आणि स्वतः एका दगडामागे लपले. तिथेच त्यांना वीरमरण आलं. तुम्हाला विश्वास नाही बसणार पण त्यांचा मृतदेह तीन महिन्यांनी बर्फ वितळल्यानंतर सापडला आणि तेव्हा देखील त्यांनी हातात बंदूक घट्ट पकडलेली होती. (Rezang La 1962)
या वॉरमध्ये १२४ भारतीय जवानांपैकी ११४ शहीद झाले, ५ जणांना चिनी सैन्याने बंदी बनवलं, त्यातले एक बंदीतच मरण पावले. पण या जवानांनी १३०० चिनी सैनिक मारले आणि त्यांना चुशूल व्हॅलीत पुढे जाण्यापासून रोखलं. मेजर शैतान सिंह यांना त्यांच्या अद्वितीय नेतृत्व आणि शौर्यासाठी मरणोपरांत परमवीर चक्र देण्यात आलं. याशिवाय, १३ कुमाऊं बटालियनच्या ८ जवानांना वीर चक्र, ४ जणांना सेना मेडल आणि एकाला मेंशन इन डिस्पॅचेस हा सन्मान मिळाला. आर्मी इतिहासात एकाच बटालियनला इतके सन्मान मिळण्याची ही दुर्मिळ घटना आहे. सरकारने या बटालियनचं नाव रेजांग ला कंपनी असं ठेवलं, जेणेकरून हा पराक्रम कायम स्मरणात राहील. हरियाणाच्या रेवाडीत आणि चुशूलमध्ये रेजांग ला युद्ध स्मारक बांधण्यात आलं. या स्मारकांवर दरवर्षी शौर्य दिन साजरा केला जातो. (Top Stories)
=================
हे देखील वाचा : Indira Gandhi नी शापित खजिना शोधला आणि…
=================
चिनी सैन्याने स्वतः कबूल केलं की त्यांचं सर्वात मोठं नुकसान रेजांग ला युद्धात झालं. २१ नोव्हेंबर १९६२ ला त्यांनी युद्धविराम जाहीर केलं, कारण त्यांना पुढे जाणं अशक्य झालं होतं. भारतीय जवानांनी अशा प्रतिकूल परिस्थितीतही चिनी सैन्याला धूळ चारली.
The Brave: Param Vir Chakra Stories हे पुस्तक लिहिणाऱ्या रचना बिश्ट रावत या बीबीसीच्या एक इंटरव्ह्युमध्ये म्हणाल्या, “बॉडीज अशा मिळाल्या की, सैनिकांच्या हातात हत्यार होते. कोणाची रायफल पुढून उडाली होती आणि त्याचा बाट त्यांच्या हातात होता, अशा बॉडीस मिळाल्या. यावरून कळतं ते किती धाडसाने लढले होते. तोपर्यंत अंदाजही नव्हता त्या सैनिकांसोबत काय घडलं? कारण जे परत आले त्यांच्या बोलण्यावर विश्वास नव्हता ठेवला गेले.” त्यानंतर ते असंही म्हणाल्या की, गाववाल्यांना ते शूर आहेत हे पटवून देण्यासाठी कॅंपैन्स करावे लागले होते. (Rezang La 1962)
मेजर शैतान सिंग आणि त्यांच्या १२४ जवानांनी दाखवून दिलं की, संख्येपेक्षा हिम्मत आणि देशप्रेम मोठं असतं. अशा प्रतिकूल परिस्थितीत, जिथं शस्त्रं कमी, हवामान खराब आणि सैन्याची संख्या खूपच कमी होती, तिथंही त्यांनी चिनी सैन्याला माघार घ्यायला भाग पाडलं. अशा ग्रेट जवानांना गाजावाजाचा सलाम!
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics