Home » उलटं चालल्याने महिलांचे पोट आणि वजन होते कमी

उलटं चालल्याने महिलांचे पोट आणि वजन होते कमी

by Team Gajawaja
0 comment
Reverse walking benefits
Share

हेल्दी आरोग्य जगण्याचा मंत्रा म्हणजे हेल्दी लाइफस्टाइल आणि व्यायाम करणे. व्यायामाचे विविध प्रकार जरी असले तरीही चालणे हे सर्वात बेस्ट मानले जाते. यामुळे तुमचे वजनच नव्हे तर ब्लड प्रेशर, मधुमेह, हार्ट आणि किडनी संदर्भातील रोगांचा धोका कमी होतो. या व्यतिरिक्त दररोज सकाळी वॉक केल्याने शरिराला विटामिन डी सुद्धा मिळते. यामुळे शरिरातील हाडांना बळकटी मिळते. यामुळेच डॉक्टरही तुम्हाला दररोज ४० मिनिटे तरी चालावे असा सल्ला देतात. परंतु आम्ही तुम्हाला चालण्याने या समस्या तर दुर होतातच. पण उलट चालल्याचे नक्की काय फायदे आहेत याच बद्दल सांगणार आहोत.(Reverse walking benefits)

कधी तुम्ही उलट चाललण्याचा प्रयत्न केलाय का? काही लोकांना उलटं चालणं हे मुर्खपणा वाटतो. पण तज्ञ असे सांगतात की, उलटं चालल्याने तुमच्या ब्रेन आणि हार्टसाठी ते फायदेशीर असते. यामुळे मेटाबॉलिज्मला चालना ही मिळते. अशातच चालल्याने नॉर्मल वॉकिंगच्या तुलनेत अधिक कॅलरीज बर्न होतात.

या व्यतिरिक्त स्पोर्ट्स मेडिसिन इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, उलटं चालणे म्हणजे बेस्ट कार्डिओ एक्सरसाइज म्हटले जाते. यामुळे वजन कमी होण्यासह संपूर्ण शरिरात बदल दिसून येतात.

आपण जेव्हा पुढच्या बाजूस झुकून चालतो तेव्हा मसल्सला काही फायदा होत नाही. परंतु जेव्हा तुम्ही रिवर्स वॉकिंग करता तेव्हा मसल्सला सुद्धा वेग मिळतो. या व्यतिरिक्त उलटं चालल्याने पायाच्या पुढील-मागील बाजूस असलेल्या मसल्सची उत्तम एक्सरसाइज होते आणि यामुळे पायांना मजबूती मिळते.तसेच जर्नल ऑफ चिरोप्रॅक्टिक मेडिसिन मध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, हॅमस्ट्रिंग मध्ये लवचीकता नसेल तर पाठीच्या खालील बाजूल खुप दुखते. या समस्येपासून दूर राहण्यासाठी जवळजवळ १५ मिनटे तरी दररोज उलटं चालले पाहिजे.(Reverse walking benefits)

तर ज्या लोकांचे गुडघे दुखतात किंवा दुखापत होते ते अगदी हळूवार उलटं वॉक करु शकतात. यामुळे गुडघ्यांवर अधिक प्रेशर येत नाही. तसेच याचे दुखणे ही कमी होते. जर्नल ऑफ फिजिकल थेरेपी सायन्समध्ये प्रकाशित रिसर्चनुसार उलटं चालल्याने बॅलेन्स मध्ये सुधारणाहोते. यामुळे हॅप्पी हार्मोन्स रिलिज होतात जे तुम्हाला शांत ठेवण्यास मदत करतात.

हेही वाचा- आर्टिफिशियल स्विटनरचा वापर करत असाल तर व्हा सावध

उलटं चालल्याने होणारे अन्य फायदे
-वेगाने कॅलरी बर्न होते
-हृदयाचे आरोग्य उत्तम राहते
-मेंदूसाठी उत्तम एक्सरसाइज
-मानसिक आरोग्य सुधारते
-रात्री शांत झोप लागते
-मेटाबॉलिज्म बूस्ट होतो


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.