Home » ‘जॅक मा’ जपानमध्ये राहत असल्याचे उघड?

‘जॅक मा’ जपानमध्ये राहत असल्याचे उघड?

by Team Gajawaja
0 comment
Jack Ma
Share

जॅक मा आठवतात का….चीनमधील सर्वात श्रीमंत उद्योगपती महाकाय ई-कॉमर्स कंपनी, अलीबाबाचे संस्थापक चीन सरकारविरोधात बोलल्यामुळे या अब्जाधीशाला चीन सरकारच्या दडपशाहीला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर काही वर्ष जॅक मा(Jack Ma) प्रसार माध्यमातून जणू गायब झाल्यासारखे होते.  चीन सरकारनं त्यांच्या कंपन्यांवर कारवाईचा धडाका सुरु केला होता. या सर्वांला कंटाळून त्यांनी निवृत्ती घेतल्याचीही चर्चा होती.  तसेच चीन सरकारनं त्यांना तुरुंगात डांबल्याचीही चर्चा होती.  मात्र आता जॅक मा महाशय नुकतेच दिसले आहेत.  तेही जपानमध्ये जपानमध्ये एका गावामध्ये जॅक मा(Jack Ma) कुटुंबिय गेल्या काही महिन्यापासून रहात असल्याची माहिती आहे. हा अब्जाधीश जपानमध्ये अत्यंत साध्या जीवनशैलीत रहात आहे. जपानमधील आघाडीच्या टेलिकॉम आणि इंटरनेट कंपन्यांपैकी एक असलेल्या सॉफ्टबँकने अलीबाबा कंपनीमधून आपले शेअर्स काढून घेतले नेमके त्याच क्षणी जॅक मा जपानमध्ये राहत असल्याचे उघड झाले, हा एक योगायोग मानला जात आहे.  

चीनचे अब्जाधीश आणि महाकाय ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाचे संस्थापक जॅक मा हे जवळपास 6 महिन्यांपासून जपानची राजधानी टोकियोमध्ये राहत आहेत. जॅक मा 2020 पासून अत्यंत सामान्य जीवनशैली जगत आहेत.  मक्तेदारी विरोधी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे जॅक मा यांचा चीन सरकारसोबतचा तणाव वाढला होता.  त्यापासून जॅक मा यांच्याभोवती चीन सरकारनं एक जाळंच विणलं होतं.  अखेर त्यातून मुक्त होतं जॅक मा (Jack Ma) जपानमध्ये  वास्तव्यास गेल्याची माहिती आहे.  जॅक मा टोकियोच्या बाहेरील ग्रामीण भागात हॉट स्प्रिंग्स आणि स्की रिसॉर्टमध्ये आपल्या कुटुंबासह राहत आहेत.  जॅक मा (Jack Ma) यांनी अलिकडच्या काही महिन्यांत अनेकवेळा अमेरिका आणि इस्रायलला भेट दिल्याची माहिती आहे.  58 वर्षीय जॅक मा यांनी 2020 मध्ये चीनच्या धोरणांवर टीका केली होती. ऑक्‍टोबर 2020 मध्ये शांघाय येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी चीनच्या आर्थिक नियमांवर आणि सरकारी बँकांवर कठोर टीका केली. व्यवसायात नवीन गोष्टी सुरू करण्याचे प्रयत्न दडपले जाऊ नयेत म्हणून व्यवस्था बदलली पाहिजे, असे आवाहन जॅक मा (Jack Ma) यांनी सरकारला केले होते.  या भाषणानंतर चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षात खळबळ उडाली होती. जॅक मा यांची ही टिका म्हणजे कम्युनिस्ट पक्षावरील टिका असे मानण्यात आले.  या घटनेनंतर जॅक मा यांचे वाईट दिवस सुरू झाले.

जॅक मा (Jack Ma) यांनी आंतरराष्ट्रीय वित्तीय नियमन करारावरही प्रश्न उपस्थित केले. तेव्हापासून त्यांनी स्थापन केलेल्या अँट आणि अलिबाबा या दोन्ही कंपन्यांना चिनी प्रशासनाकडून त्रास दिला जात होता.  गेल्या वर्षी, चिनी सरकारने अँट कंपनीच्या ब्लॉकबस्टर $37 अब्ज आयपीओवर बंदी घातली आणि विश्वासाचा गैरवापर केल्याच्या नावाखाली अलीबाबा कंपनीवर विक्रमी $2.8 अब्ज दंड ठोठावला.  चीन सरकारसोबत तणाव वाढण्यापूर्वी जॅक मा यांनी 2015 मध्ये भारताला भेट दिली होती. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली.  आणि भारतातही उद्योग व्यवसायात गुंतवणूक केली होती.  जॅक मा चीनमधील  शांघायजवळील हांगझोऊ शहरात रहात असत.  याच शहरात त्यांच्या अलीबाबा कंपनीचे मुख्यालय आहे.  मात्र चिनी सरकारबरोबर झालेल्या वादानंतर जॅक मा अन्य देशात स्थलांतरीत होण्यासाठी मार्ग शोधत असल्याची माहिती आहे.  गरीब कुटुंबात जन्मलेले जॅक मा(Jack Ma) हे चीनमधील सर्वात प्रतिष्ठित व्यावसायिकांपैकी एक मानले जात.  55 व्या वाढदिवसाला त्यांनी आपल्या व्यवसायातून निवृत्ती जाहीर केली होती. तेव्हा जेक मा अचानक चर्चेत आले होते. मात्र चीन सरकारच्या वादानं जेक मा यांना थेट देश सोडावा लागला आहे.  

=======

हे देखील वाचा : धावपळीच्या आयुष्यात महिलांनी अशा पद्धतीने दूर करा मानसिक थकवा

=======

चीनमध्ये शी जिनपिंग यांच्या तिसऱ्या कार्यकाळावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर अनेक श्रीमंत लोक चीनमधून पळून जाण्याचे मार्ग शोधत आहेत. त्यांच्यावर कारवाई होण्याची भीती आहे.  चीनमध्ये उद्योगपतींवर अनेक बंधने असून त्यांचे पालन न झाल्यास त्या कंपनीला मोठ्या आर्थिक दंडाला सामोरे जावे लागते.  तसेच कायदेशीर बंधनातही कंपनीला अडकवण्यात येते.  त्यामुळेच चीनमधील  मान्यवर उद्योगपती आपला व्यवसाय अन्य देशात स्थलांतरीत करण्यावर भर देत आहेत.

सई बने…


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.