मराठीसोबतच हिंदी चित्रपट, मालिका गाजवणाऱ्या रेशम टिपणीसला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. मागील अनेक वर्षांपासून ती या क्षेत्रात काम करत आहे. तिने तिच्या अभिनयाने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. मात्र अचानक रेशम टिपणीसबद्दल माध्यमांमध्ये खूपच बातम्या येत आहे. मनोरंजनविश्वात प्रसिद्ध असलेली अभिनेत्री रेशम टिपणीस सध्या कमालीची चर्चेत आली आहे. रेशमची एक पोस्ट खूपच व्हायरल होत असून या पोस्टमधून तिने संताप व्यक्त केला आहे. रेशमच्या मुलाबद्दल एका पोर्टलने आक्षेपार्ह बातमी प्रसिद्ध केल्याने तिने पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. (Marathi News)
झाले असे की मुंबईच्या कांदिवली पश्चिम इथल्या उच्चभ्रू अशा सी ब्रूक या इमारतीत एक गुजराती अभिनेत्री तिच्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. बुधवारी २ जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास अभिनेत्रीने तिच्या १४ वर्षांच्या मुलाला शिकवणीला जाण्यास सांगितले. मात्र मित्र खाली खेळण्यासाठी बोलावत असल्याने अभिनेत्रींच्या मुलाने शिकवणीला जायला आईला नकार दिला. मात्र, आईने त्याला काही झाले तरी शिकवणीला जायचे ती चुकवायची नाही असे सांगितले. मित्रांसोबत खेळायला मिळणार नसल्याने आणि बळजबरीने शिकवणीस जावे लागेल यामुळे मुलगा नाराज हाेता. या नाराजीतूनच त्याने त्याच इमारतीच्या ५६व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवले. (Todays Marathi HEadline)
ही बातमी जेव्हा माध्यमांमध्ये यायला लागली तेव्हा एका पोर्टलने त्या मुलाच्या फोटोच्या जागी रेशमच्या मुलाचा फोटो लावला आणि बातमी पब्लिश केली. ती बातमी वाचून रेशमला अनेकांनी फोन केले. तेव्हा तिला या प्रकरणाबद्दल समजले. यानंतर तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचा मुलगा सुरक्षित असल्याचे सांगत संताप व्यक्त केला आहे. (Marathi Trending News)
रेशमने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “माझ्या लेकाबद्दल खोटी बातमी पसरवली जात आहे. कृपया दुर्लक्ष करा… बाप्पाच्या आशीर्वादानं माझा मुलगा मानव ठणठणीत आहे. पण ज्याने कोणी हे केलंय, त्याच्यावर कडक कारवाई होणार हे नक्की…” या पोस्टमधून तिने त्या पोर्टलवर कारवाई होणार असल्याचे देखील सांगितले आहे. दरम्यान, मानव हा रेशम आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव सेठ यांचा मुलगा आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळं ते चर्चेत आले होते. रेशमच्या या पोस्टवर अनेकांनी त्या पोर्टलवर चुकीची बातमी दाखवल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. नेटकाऱ्यानी त्या पोर्टल ट्रोल केले देखील केले आहे. (Top Marathi NEws)
=================
हे देखील वाचा : Ramayan : ‘आदीपुरुष’चा डाग नितेश तिवारीचं ‘रामायण’ पुसून काढणार का ?
=================
रेशम टिपणीसबद्दल बोलायचे झाले तर ती मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून, आजवर तिने अनेक हिंदी मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. शिवाय तीन मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात देखील सहभागी झाली होती. रेशमने हिंदी टेलिव्हिजन अभिनेते संजीव सेठ यांच्याशी १९९३ साली लग्न केले होते. मात्र लग्नानंतर ११ वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. मानव हा त्या दोघांचाच मुलगा आहे. सध्या रेशम मागील नऊ-दहा वर्षांपासून संदेश किर्तीकरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतेय. (Social Updates)