लवकरच भारत आपला ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ताक राष्ट्र घोषित करण्यात आले म्हणूनच हा दिवस राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जातो. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची राज्यघटना लोकशाहीच्या उद्देशाने तयार करण्याचे काम सुरू झाले. २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांत भारताचे संविधान तयार झाले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाच्या संविधान सभेने स्वीकारले. त्यानंतर पुढच्याच वर्षी २६ जानेवारी १९५० रोजी संपूर्ण देशात ही राज्यघटना लागू झाली. (Republic Day)
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी देशामध्ये ठिकठिकाणी राष्ट्रध्वज फडकवला जातो. दिल्लीमध्ये देखील राष्ट्रपतींच्या हस्ते हा राष्ट्रध्वज फडकवला जातो. मात्र तुम्हाला माहित आहे का आपला राष्ट्रध्वज फडकविण्याचे नियम आहेत. २००२ सालाआधी सामान्य भारतीयाला फक्त स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाची परवानगी देण्यात आली होती. मात्र २६ जानेवारी २००२ पासून यात बदल करण्यात आले, आणि कोणताही नागरिक कोणत्याही दिवशी ध्वज फडकवू शकतो असा नियम तयार केला गेला. मग ध्वज फडकवण्याचे नियम कोणते चला जाणून घेऊया. (Marathi)
– तिरंगा ध्वज हा नेहमी लोकर, सूत, सिल्क किंवा खादीपासून तयार केलेला असावा. झेंड्याचा आकार नेहमी आयताकारच असायला हवा. लांबी आणि रुंदीचे प्रमाण ३:२ असे असावे. झेंड्यामध्ये केशरी रंग खालील बाजूस ठेवून झेंडा फडकवू नये. (Latest Marathi Headline)
– तिरंगा कधीही पाण्यात बुडवू नये. झेंड्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान करू नये. तिरंग्याचा कोणताही भाग जळालेला असल्यास तसेच तिरंग्याबद्दल अवमानकारक टिपण्णी केल्यास तीन वर्षांचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
– फडकविलेला तिरंगा त्याच स्थितीत कायम राहायला हवा. फाटलेला, मळलेला वा चुरगळलेला तिरंगा फडकवू नये. त्यावर योग्य पद्धतीने पुढील सोपस्कार करावे. (Social Updates)
– तिरंगा एखाद्या मंचावर फडकवला असल्यास, वक्ता भाषण करत असताना तिरंगा त्याच्या उजवीकडे असणे आवश्यक आहे.
– राष्ट्रध्वजापेक्षा इतर कोणताही झेंडा किंवा पताका उंच किंवा त्याच्यावर किंवा त्याच्याबरोबर लावू नये.

– पूर्वी राष्ट्रीय ध्वज केवळ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच फडकवण्याची परवानगी होती. मात्र जुलै २०२२ मध्ये झालेल्या बदलानुसार, आता ध्वज दिवसा व रात्री दोन्ही वेळेस फडकवता येतो. यासाठी रात्री पुरेसा प्रकाश असणे आवश्यक आहे. कोणताही नागरिक, शैक्षणिक संस्था किंवा खाजगी संघटना वर्षातील कोणत्याही दिवशी सन्मानाने ध्वज फडकवू शकतात. (Top Trending News)
– झेंडा अर्ध्यावर ठेवून फडकवू नये. काही प्रसंगी सरकारी आदेश असल्याशिवाय सरकारी इमारतीवरील तिरंगा अर्ध्यावर आणण्यास मनाई आहे.
– तिरंग्याचा व्यावसायिक वापर करू नये. तिरंग्याचा गैरवापर कुणी करत असेल, तिरंगा वस्त्र म्हणून वापरत असेल किंवा शहीद जवान वगळता कोणी मृतदेहाभोवती तिरंगा लपेटत असेल तर तो तिरंग्याचा अपमान असतो. शिवाय जर एखादी व्यक्ती कमरेच्या खालीली वस्त्रासाठी तिरंग्याचा कापड म्हणून वापर करत असेल तर तो तिरंग्याचा अपमान आहे. (Top Marathi Headline)
– तिरंग्याचा वापर कधीही गणवेश म्हणून करू नये. तिरंग्याचा रुमाल किंवा उशीसाठीही वापर करता येणार नाही.
– तिरंग्यावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहू नयेत. विशेष प्रसंगी किंवा राष्ट्रीय दिन जसे प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाला तिरंगा फडकविण्यापूर्वी त्यात फुलांच्या पाकळ्या ठेवण्यास हरकत नाही. (Social Updates)
– एखाद्या कार्यक्रमात व्यासपीठावरील टेबल झाकण्यासाठी किंवा मंचाची सजावट करण्यासाठी तिरंग्याचा वापर करू नये. गाडी, रेल्वे किंवा विमानाचे छत वा अन्य भाग झाकण्यासाठी तिरंग्याचा वापर करता येणार नाही. एखाद्या इमारतीत तिरंग्याचा पडदा लावण्यासही सक्त मनाई आहे. (TOp Trending Headline)
=========
Republic Day : प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो?
=========
– भारतीय राज्यघटनेनुसार, राष्ट्र विभूती असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ध्वज काही काळ खाली केला जातो आणि राष्ट्रीय शोक घोषित केला जातो. ज्या इमारतीत त्या विभूतीचे पार्थिव ठेवण्यात आले आहे, त्याच इमारतीचा तिरंगा खाली केला जातो. मृतदेह इमारतीच्या बाहेर काढल्यानंतर तिरंगा पूर्ण उंचीवर फडकवला जातो. त्याचबरोबर देशातील महान व्यक्ती आणि हुतात्म्यांच्या पार्थिवांना तिरंग्यात गुंडाळून आदरांजली वाहिली जाते. मात्र, तिरंग्याची भगवी पट्टी डोक्याच्या बाजूला आणि हिरवी पट्टी पायाला असावी, याची काळजी घेतली जाते. (Top Stories)
– संस्कृती मंत्रालयाने राष्ट्रीय ध्वज दुमडण्यासाठी चार टप्प्यांची मार्गदर्शिका दिली आहे. सुरुवातीला ध्वज क्षैतिज ठेवावा. त्यानंतर केशरी व हिरवी पट्टी पांढऱ्या पट्टीखाली दुमडावी. मग पांढरी पट्टी अशा प्रकारे दुमडावी की फक्त अशोकचक्र दिसेल. शेवटी हा दुमडलेला ध्वज सुरक्षित ठिकाणी ठेवावा. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
