भारतात दोन वर्षानंतर प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार असून त्यासाठी प्रमुख पाहुणे येणार आहेत. याबेळी प्रमुख अतिथी म्हणून मिस्रचे राष्ट्रपती अब्देह फतेह अल सिसि असतील. ज्यांनी नुकत्याच प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण स्विकार केले आहे. ते आधी मिस्रचे संरक्षण मंत्री आणि सेना प्रमुख होते. देशातील प्रजासत्ताक दिनानिमित्त परदेशी प्रमुखांना मुख्य अतिथीच्या रुपात आमंत्रित करण्याची परंपरा आहे. या दिवशी अतिथींचा विशेष सन्मान केला जातो. त्यांना गार्ड ऑफ ऑनर सुद्धा दिले जाते. तर जाणून घेऊयात प्रजासत्ताक दिनानिमित्त कशा पद्धतीने प्रमुख अतिथींची निवड केली जाते त्याबद्दलच अधिक.(Republic Day Chief Guest)
सहा महिन्यांपूर्वी सुरु होते प्रक्रिया
भारतातील प्रजासत्ताक दिवसानिमित्त कोण प्रमुख अतिथी असतील याची प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वीच सुरु होते. त्यावेळी कोणाकोणाला आमंत्रित करायचे, त्यांना निमंत्रण पाठवणे, त्यांच्या उत्तराची वाट पहामे किंवा ते आल्यानंतर कुठे राहणार, अतिथींची काळजी, विशेष भोजन अशा विविध गोष्टींची तयार केली जाते.
अत्यंत विचार करण्याची गरज
पण मुख्य अतिथींच्या रुपात कोणाला निवडावे यावर खुप विचार केला जातो. आमंत्रण पाठवण्यापूर्वी काही पैलूंचा विचार केला जातो. यामध्ये सर्वाधिक मोठा पैलू म्हणजे भारत आणि त्या देशासोबतचे संबंध. यामुळे दोन्ही देशांमध्ये मैत्री अधिक वाढण्याची ही शक्यता असते.

आणखी काही पैलू
आमंत्रित करण्यात आलेल्या अतिथींमुळे देशातील भारतातील राजकय, व्यावसायिक, सैन्य, आर्थिक पैलंवूर कसा प्रभाव पडेल याची सुद्धा काळजी घेतली जाते. या व्यतिरिक्त हे सुद्धा लक्षात ठेवले जाते की, आमंत्रित अतिथीला बोलवल्यानंतर अन्य देशांसोबत असलेले मित्रत्वाचे नाते सुद्धा वाईट होऊ नये. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडे दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्याची उत्तम संधी असते.
आता पुढील प्रक्रिया
त्यानंतर परराष्ट्र मंत्रालय पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांकडून यासाठी परवानगी घेते. त्यांच्या सल्ल्यानंतर किंवा परवानगी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरु होते. त्या देशात भारताचे राजदूत असे जाणून घेतात की, त्या दिवशी देशाची प्रतिनिधी उपलब्ध असतील की नाही. त्याचसोबत काही कारणास्तव ते निमंत्रण तर स्विकारत नाहीत ना ही सुद्धा शक्यता असते.(Republic Day Chief Guest)
हे देखील वाचा- मॉस्कोत मार्शल लॉ! युक्रेन युद्धासाठी २० लाख लोकांची पुतिन करणार भरती
पूर्ण कार्यक्रमाची माहिती
हेच कारण असते की, नेहमीच परराष्ट्र मंत्रालय मुख्य अतिथीच्या रुपात एकापेक्षा अधिक ऑप्शन घेऊन चालतात. तसेच या सुचीत प्राथमिकता ठरवली जाते. काही वेळेस असे होते की, एका पेक्षा अधिक देशांच्या प्रतिनिधींना बोलावले जाऊ शकते. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे अतिथी देशासोबत बातचीत करण्यास सुरुवात करतात. संपूर्ण कार्यक्रमाची माहिती देत त्यांना सर्वकाही सविस्तर ही समजावून सांगितले जाते.
एकदा का आमंत्रण स्विकार केल्यानंतर पुढील काही गोष्टी केल्या जाता. जसे मुख्य अतिथींसोबत कोणकोण येणार, त्यांचा खासगी स्टाफ ज्यामध्ये सुरक्षारक्षक, वैद्यकिय आणि अन्य अधिकाऱ्यांचा समावेश असतो. अतिथींच्या परिवारातील सदस्य सुद्धा येतात. त्यांच्यासाठी सुद्धा खास काळजी घेतली जाते. प्रजासत्ताक दिनावेळी प्रमुख पाहुणे हे खास आकर्षण असतात.