जानेवारी महिना सुरु झाला की, सगळीकडे प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरु होते. प्रजासत्ताक दिन म्हणजे २६ जानेवारी, १९५० मध्ये भारताचे संविधान लागू झाले आणि भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले होते. या दिवशी भारताला खऱ्या अर्थाने लोकशाही मिळाली आणि नागरिकांना त्यांचे सरकार निवडण्याचा अधिकार प्राप्त झाला. असा हा २६ जानेवारीचा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. (Republic Day)
यंदा भारत ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. २६ जानेवारीच्या दिवशी भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कर्तव्य पथावर मोठा सोहळा संपन्न होतो. हा सोहळा बघण्याचे प्रत्येक भारतीयांचे स्वप्न असते. यंदा देखील हा सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. तुम्हाला जर हा सोहळा याची देही याची डोळा पाहायचा असेल तर या कार्यक्रमाची तिकीट विक्री सुरु झाली आहे. हे तिकीट कसे बुक करायचे आणि कसे घ्यायचे याची अधिक माहिती जाणून घेऊया. (Marathi NEws)
संरक्षण मंत्रालयाने २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी तिकिट विक्रीची अधिकृत घोषणा केली आहे. यंदा तिकिटांचे दर सर्वसामान्य नागरिकांना परवडतील असे ठेवण्यात आले असून, यंदा देखील या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य परेडसह बीटिंग रिट्रीट फुल ड्रेस रिहर्सल आणि मुख्य बीटिंग रिट्रीट समारंभासाठी तिकिट विक्री सुरू झाली आहे. ही तिकिटे ५ ते १४ जानेवारीदरम्यान उपलब्ध असतील. दररोज सकाळी ९ वाजल्यापासून तिकीटांचा कोटा संपेपर्यंत तिकिटे विकली जाणार आहेत. (Todays Marathi Headline)
प्रजासत्ताक डे परेड (२६ जानेवारी २०२६) १०० रुपये २० रुपये
बीटिंग रिट्रीटची संपूर्ण ड्रेस रिहर्सल (२८ जानेवारी २०२६) – २० रुपये
बीटिंग रिट्रीट (२९ जानेवारी २०२६) – १०० रुपये

ही तिकीटं www.aamantran.mod.gov.in या वेबसाईटवरून थेट खरेदी करू शकता. तिकीट खरेदी करण्यासाठी ओरिजनल फोटो आयडी कार्ड उदा आधारकार्ड, वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट आदी ओळखपत्र दाखवावे लागतील. प्रजासत्ताक दिन, बीटिंग रिट्रीट फुल ड्रेस रिहर्सल आणि बीटिंग रिट्रीट या तिन्ही कार्यक्रमांसाठी फक्त एकच फोटो ओळखपत्र आणावे लागेल. ही तिकीटं सेना भवन (गेट नंबर ५ जवळ), शास्त्री भवन (गेट नंबर ३ जवळ), जंतर-मंतर (मुख्य प्रवेशद्वाराजवळ), संसद भवन (रिसेप्शन), राजीव चौक मेट्रो स्टेशन (डी ब्लॉक, गेट नंबर ३ आणि ४ जवळ) आणि काश्मीरी गेट मेट्रो स्टेशन (कॉन्कोर्स लेव्हल, गेटनंबर ८ जवळ) या ठिकाणांवरून घेऊ शकता. ऑनलाइन तिकीट कसे बुक करावे याची माहिती खालील प्रमाणे. (Latest Marathi News)
* पहिल्यांदा तिकीट बुक करत असाल तर बुकिंग स्टेप्स
– ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी रक्षा मंत्रालयच्या आमंत्रण वेबसाईट (aamantran.mod.gov.in) ला भेट द्या. (Top Marathi News)
– जर तुम्ही पहिल्यांदा लॉगिन करत असाल तर तुम्हाला New User Ragistration वर क्लिक करावे लागणार आहे.
– इथे तुमचे नाव, नंतर ईमेल-आयडी, मोबाईल नंबर, कॅप्चा एंटर करा आणि नंतर ओटीपीची विनंती करा.
– ओटीपी एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर अॅड गेस्टचे ऑप्शन दिसणार आहे आणि यामध्ये तुम्हाला नाव,
जन्मतारीख, ओळखपत्राचा पुरावा इत्यादी माहिती भरावी लागणार आहे.
– आयडी प्रूफ टाइपमध्ये आधार कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, पासपोर्ट किंवा वोटर आईडीपैकी कोणत्याही एका ओळखपत्राची माहिती भरावी लागणार आहे. (Latest Marathi Headline)
– आयडी नंबरमध्ये आई़डी प्रूफचे नंबर जसे आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा ड्राइविंग लाइसेंस किंवा वोटर आईडीचा नंबर भरावा लागणार आहे.
– आता तुम्हाला इथे तुमचे पूर्ण नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, घराचा पत्ता भरावा लागणार आहे.
– आता आयडी प्रुफची पुढील बाजू अपलोड करा आणि त्यानंतर मागील बाजू अपलोड करा. फाईल साईज 300KB पेक्षा जास्त ठेऊ नका.
– आता सेव गेस्टवर टॅप करा.
– आता तुम्हाला रिपब्लिक डे परेड आणि बीटिंग रिट्रीट तिकीट बुक करण्याचा पर्याय मिळणार आहे.
– आता तिकीटांची संख्या निवडा आणि ऑनलाईन पेमेंट करा. (Top stories)
– अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या रिपब्लिक डे परेडसाठी ऑनलाईन तिकीट बुक करू शकता.
* जुने यूजर्सने ऑनलाईन तिकीट बुकींग कसे करावे?
– ऑनलाईन तिकीट बुकींग करण्यासाठी रक्षा मंत्रालयच्या आमंत्रण वेबसाईट (aamantran.mod.gov.in) वर जा.
– आधीच तुम्ही या वेबसाईटवर रजिस्टर केलं असेल तर मोबाईल नंबर टाकून कॅप्चा भरा आणि ओटीपी एंटर करा.
– इथे तुम्हाला रिपब्लिक डे परेड आणि बीटिंग रिट्रीटचे तिकीट बुक करण्याचा पर्याय मिळणार आहे.
========
Tariq Rahman : बांगलादेशाच्या राजकारणातला नवा मोहरा
========
– तुमचे ओळखपत्र, मोबाईल नंबर इत्यादी माहिती इथे भरा.
– यानंतर तिकीटांची संख्या निवडा आणि त्या हिशोबाने ऑनलाईन पेमेंट करा. (Top Trending Headline)
– एक गोष्ट लक्षात ठेवावी की, aamantran.mod.gov.in वर दिलेल्या सूचनांनुसार जर ओळखपत्रात पूर्ण पत्ता नसेल, तर तुमचे तिकीट रद्द केले जाईल. तिन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी तुम्ही तुमचे मूळ फोटो ओळखपत्र आणणे आवश्यक आहे.
* मोबाईल अॅपमधून तिकीट कसे बुक करावे?
– स्मार्टफोन यूजर्स गुगल प्ले स्टोअरवरून किंवा अॅपल अॅप स्टोअरवरून आमंत्रण मोबाईल अॅप डाऊनलोड करू शकणार आहेत.
– इथे तुमची सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला रिपब्लिक डे परेड आणि बीटिंग रिट्रीट तिकीट बुक करण्याचा ऑप्शन मिळणार आहे.
– आता पेमेंट करून तुम्ही तुमचे तिकीट बुक करू शकता. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
