आज भारत आपला ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. आज संपूर्ण देशामध्ये एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळेच वातावरण अनुभवायास मिळत आहे. संपूर्ण देश देशभक्तीच्या रंगात न्हाहून निघत आहे. आज सकाळी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कर्तव्य पथावर ध्वजारोहण झाले. त्यानंतर परेड सुरु झाल्या. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे मुख्य आणि मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘चित्ररथ’. दरवर्षी विविध राज्यांचे चित्ररथ सादर केले जातात. या चित्ररथांमधून त्या त्या राज्याची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक वारसा लोकांपर्यंत पोहचवला जातो. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अनेक चित्ररथ आपल्याला पाहायला मिळतात. मात्र कर्तव्य पथावर सादरीकरणासाठी चित्ररथांची निवड कशी केली जाते? जाणून घेऊया. (India)
देशातील सगळ्या राज्यातील चित्ररथांना प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये स्थान मिळत नाही. चित्ररथांच्या निवडीची संपूर्ण जबाबदारी रक्षा मंत्रालयाकडे आहे. इतकेच नाही तर या ऐतिहासिक दिवशीची सुरक्षा, परेडपासून चित्ररथांचे संपूर्ण व्यवस्थापन रक्षा मंत्रालयाकडून केले जाते. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात संरक्षण मंत्रालयातर्फे चित्ररथांसाठी सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश, केंद्र शासनातील विविध विभाग आणि संवैधानिक संस्थाने यांच्याकडून अर्ज मागवले जातात. यावर्षीच्या परेडसाठी केंद्र शासनाचे ८० विभाग, ३६ राज्य आणि केंद्रशासीत प्रदेश तसेच निवडणूक आयोग, नीती आयोग यांना पत्र पाठविण्यात आले होते. २७ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करावयाची होती. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवड प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली. (Top Marathi News)

संरक्षण मंत्रालयाद्वारे कला आणि संस्कृती क्षेत्रातील तज्ज्ञांची विशेष समिती गठित केली जाते. समितीद्वारे अर्जासोबतचे चित्ररथाचे स्केच तसेच त्याच्या डिझाइनची छानणी केली जाते. स्केच सोपे, रंगीबेरंगी आणि स्पष्ट असावेत. चित्ररथासोबत जर पारंपरिक नृत्य सादर होणार असेल, तर त्याचा व्हिडीओदेखील अर्जासोबत जोडला असावा. नृत्यातील वाद्य आणि पोषाखांची माहिती देणे देखील आवश्यक असते. (Latest Marathi Headline)
यात निवड झालेल्या राज्यांना आणि विभागांना चित्ररथाचे थ्री-डी मॉडेल सादर करावे लागतात. यात चित्ररथांची दृश्यता, समाजमनावर होणारा परिणाम, चित्ररथाची थीम, सादर होणारे वाद्य या बाबींचादेखील विचार केला जाते. सुमारे सहा-सात वेळा समितीची बैठक होते. प्राप्त अर्जांमधून उत्कृष्ट चित्ररथाची यादी तयार केली जाते. यात निवड झालेल्यांना पुढील प्रक्रियेसाठी आमंत्रित केले जाते. अंतिम तपासणीनंतरच राजपथावर चित्ररथ सादर करण्याची परवानगी दिली जाते. (Top Trending Headline)
राज्य किंवा विभागाची संस्कृती प्रदर्शित करणारा चित्ररथ असावा, चित्र दाखवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक डिस्पलेचा वापर केला गेला असावा. दोन राज्यांचे चित्ररथ एकाच प्रकारचे नसावेत. चित्ररथात केवळ राज्याचे नाव लिहिण्यास परवानगी दिली जाते. लोगोचा किंवा इतर कुठल्याही गोष्टींचा समावेश नसावा. चित्ररथाच्या पुढे हिंदीत, मागे इंग्रजीत, तर बाजूला स्थानीय भाषेत नाव लिहिले असावे. चित्ररथ तयार करण्यासाठी पर्यावरणपूरक पदार्थांचा जास्तीत जास्त वापर केला असावा. (Top Stories)
========
Republic Day : प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुण्यांची निवड कशी केली जाते ?
Temple : देशातील ‘या’ मंदिरामध्ये होते चक्क भारत मातेची पूजा
========
संरक्षण मंत्रालयाद्वारे प्रत्येक सहभागी विभागाला एक ट्रॅक्टर आणि एक ट्रॉली दिली जाते. याव्यतिरिक्त अन्य कुठल्याही वाहनाचा वापर करता येत नाही. चालकाच्या सोयीसाठी टॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये सहा फूट अंतर ठेवणे आवश्यक असते. ट्रेलरची लांबी २४ फूट ८ इंज आणि रुंदी ८ फूट असावी. उंची ४ फूट २ इंच असावी. ट्रेलरची क्षमता १० टनाच्या जास्त नसते. संपूर्ण चित्ररथाची लांबी ४५ फूट, रुंदी १४ फूट तर उंची जमिनीपासून १६ फुटांपेक्षा अधिक नसावी. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
