Home » रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी वाढ, तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी वाढ, तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

by Team Gajawaja
0 comment
Repo Rate Hike
Share

भारतीय रिजर्व बँकेने मुख्य रुपात महगाईवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने द्विमासिक मॉनिटरी पॉलिसीच्या आढाव्याअंतर्गत पुन्हा एकदा नीतिगत दर रेपो मध्ये ०.२५ टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे मुख्य पॉलिसीचे दर वाढून ६.५० टक्के झाले आहे. त्याचसोबत केंद्रीय बँकेने सुरु असलेले आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी जीडीपीच्या वृद्धी दराच्या अनुमानाला ६.८ टक्क्यांनी वाढवून ७ टक्के केले आहे. तर पुढील वर्षात जीडीपी वृद्धी दर ६.४ टक्के असल्याचा अनुमान लावण्यात आला आहे. (Repo Rate)

आरबीआयने आताच्या आर्थिक वर्षात किरकोळ दर ६.५ टक्के आणि पुढील आर्थिक वर्षात ५.३ टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला आहे.

रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट म्हणजे असा व्याज दर ज्यावर कमर्शियल बँका आपल्या गरजेनुसार सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्रीय बँकेकडून कर्ज घेतात. यामध्ये वाढ होणे याचा अर्थ असा की, बँका आणि आर्थिक संस्थांकडून घेतले जाणारे कर्ज महाग होणार. तसेच सध्याच्या कर्जाच्या मासिक हप्त्यात वाढ होणार.

एमपीसीच्या तीन दिवसीय बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देत आरबीआय गवर्नर शक्तिकांत दास यांनी डिजिटल माध्यमातून जाहीर केलेल्या विधानात असे म्हटले की, सध्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करता एमपीसीने नितीगत दर रेपो ०.२५ टक्क्यांनी वाढवून ६.५० टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी असे म्हटले की, मॉनिटरी पॉलिसीच्या समितीच्या सहा सदस्यांपैकी चार जणांनी रेपो रेटमध्ये वाढ करण्याच्या पक्षात मतदान केले.

मे ते आता पर्यंत सहा वेळा वाढला रेपो रेट
दरम्यान, रेपो रेट मध्ये वाढ ही गेल्या पाच वेळा झालेल्याच्या तुलनेत कमी आहे. याची मार्केटकडून फार काळापासून अपेक्षा केली जात होती. आरबीआयकडून मुख्य रुपात महागाई नियंत्रणात आणण्यासाठी गेल्या मे महिन्यापासून ते आता पर्यंत सहा वेळा रेपो रेट मध्ये २.५० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.

हे देखील वाचा- श्रीरामाच्या भरोवशावर श्रीलंकेची अर्थव्यवस्था….

यापूर्वी मे मध्ये रेपो रेट ०.४० टक्के, जून, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ०.५०-०.५० टक्के. तर डिसेंबरमध्ये ०.३५ टक्क्यांनी वाढवला होता. केंद्रीय बँक नीतिगत दरावर निर्णय घेताना मुख्य रुपात किरकोळ महागाईवर लक्ष देते. (Repo Rate)

रिवर्स रेपो रेट
त्याचसोबत रिवर्स रेपो रेट म्हणजे त्याच्या रेपो रेटच्या विरुद्ध. हा तोच दर असतो ज्यावर बँकांना त्यांच्याकडून आरबीआयमध्ये जमा झालेल्या रक्कमेवर व्याज मिळते. रिवर्स रेपो रेट बाजारात कॅश लिक्विडिटीला नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडतो. मार्केटमध्ये जेव्हा अधिक पैसा दिसतो तेव्हा आरबीआय रिवर्स रेपो रेट वाढवतो.यामुळे बँक अधिकाधिक व्याज कमावण्यासाठी आपली रक्कम त्यांच्याकडे जमा करतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.