उन्हाळ्याची चाहूल लागली की, घरांमधी महिलांची एकच लगबग सुरु होते. ही लगबग असते ती वर्षभरासाठी साठवल्या जाणाऱ्या धान्यांची. अनेक घरांमध्ये आजही महिला उन्हाळा सुरु झाला की, एकदम वर्षभरासाठी लागणारे धान्य घेऊन ठेवतात. यात गहू आणि तांदुळासोबतच विविध प्रकारच्या डाळी, उसळी देखील असतात. मात्र सध्याचे वातावरण बघता हे वर्षभरासाठी भरले जाणारे धान्य लवकरच कहरब होऊन त्याला किड लागते. आता कीड लागल्यानंतर हे कीड धान्यामधून काढणे खूपच जटिल काम असते. शिवाय संपूर्ण कीड काढून धान्य पुन्हा भरल्यानंतर कीड त्यात होणार नाही याची शाश्वती देखील नसते. अनेक घरांमध्ये महिला धान्यामध्ये बोरिक पावडर किंवा इंजेक्शन टाकून धान्य भरतात. मात्र हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अजिबातच योग्य नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वर्षभरासाठी किंवा कमी कालावधीसाठी धान्य टिकवायचे असेल तर कोणते सोपे आणि सुरक्षित उपाय करता येतात हे सांगणार आहोत. (Kitchen Tips)
१) धान्य साठवण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते साठवायचे ठिकाण, डब्बे, कोठ्या हे कोरडे आणि स्वच्छ असणं आवश्यक आहे. पावसाळी हवामानामुळे घरात कुठेही ओलसरपणा राहिला, तर त्याचा परिणाम थेट धान्यावर होतो. त्यामुळे कोठी किंवा डब्बा जिथे ठेवणार आहात, तो भरायच्या आधी आतून कोरडा करून घ्या. शक्य असल्यास त्याला उन्हं दाखवून घ्या किंवा २–३ दिवस कोरड्या कपड्याने पुसून हवेतच ठेवून द्या. हे केल्यास अळ्या, बुरशी किंवा ओलसर गंध निर्माण होणार नाही.
२) माचिसच्या पेटीत एक विशिष्ट प्रकारचा गंधक असतो ज्यामुळे किडे घाबरून पळून जातात. या सल्फरमुळे धान्य खराब होऊ नये म्हणून माचिसची पेटी कापडात बांधून ठेवावी. मॅच बॉक्समध्ये गनपावडर देखील असते, म्हणून जर तुम्ही ही टिप्स वापरत असाल तर धान्य वापरण्यापूर्वी नेहमी दोन-तीन वेळा धुवा. (Marathi)
३) थंडीच्या दिवसांत सूर्यप्रकाश मिळत नसल्याने साठवलेल्या धान्यात किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे धान्य साठवण्यासाठी हवाबंद डब्यांचा वापर करावा. यामुळे तुमचे धान्य दिर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते. (Marathi News)
४) पुदिन्याची सुकलेली पाने तुम्ही पिठांमध्ये अथवा अन्नधान्याच्या डब्यांमध्ये ठेवल्यास, कीड लागत नाही. याचा सुगंध कीड न लागण्यासाठी फायदेशीर ठरतो. तसेच यातील नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्समुळे कडधान्ये आणि पिठ सुरक्षित राहण्यास मदत होते. (Todays Marathi Headline)

५) हिंगाचा उग्र वास धान्यांमध्ये असलेले कीटक आणि बुरशीला धान्यापासून दूर ठेवतो. आपण ते आपल्या कंटेनरमध्ये ठेवू शकता. यातून कोणतेही नुकसान होणार नाही. फक्त हिंग कापडात बांधायचे आहे. त्यामुळे हिंगाचा वास धान्यामध्ये जाणार नाही. कडधान्यातील कीड दूर ठेवण्यासाठी तुम्ही काळया मिरीचा वापर करू शकता. पण ही काळी धान्यात ठेवताना नेहमी तिला कपड्यात बांधून ठेवा. (Top Trending Headline)
६) तांदळामध्ये अळी आणि किडे लवकर होतात. यासाठी एक पारंपरिक पण अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे कडुलिंब. तांदूळ भरताना कोठीच्या तळाशी आणि वरच्या थरावर कडुलिंबाची पानं ठेवावीत. त्याशिवाय तांदळामध्ये ठिकठिकाणी तमालपत्र टाकल्यास त्याचा सुगंध अळ्यांना दूर ठेवतो. कडुलिंबातील नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म धान्य टिकवून ठेवण्यास मदत करतात. (Top Marathi News)
७) धान्य भरल्यानंतर ते कुठे ठेवायचं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. नेहमी असे डब्बे कोरड्या जागी आणि शक्यतो सूर्यप्रकाश पोहोचेल अशा ठिकाणी ठेवावेत. पावसाळ्यात ओलसर भिंतींना लागून धान्य ठेवू नका. शक्य असल्यास २–३ इंच उंचीवर प्लास्टिक क्रेट किंवा लाकडी स्टॅंडवर ठेवावं. यामुळे जमिनीतील ओलावा थेट डब्ब्यापर्यंत पोहोचत नाही. (Latest Marathi Headline)
=======
TFM Awards : टाइम्स फ्युचर ऑफ मॅटरनिटी’ (TFM) अवॉर्ड्स २०२६ साठी प्रवेशिका आमंत्रित
=======
८) लवंगचा किंवा लवंगचा तेलाचा वापर करुन धान्य कीटकांपासून सुरक्षित ठेवता येते. यासाठी डब्यांमध्ये लवंग ठेवा. लवंगचा उग्र वासामुळे कीटक धान्याजवळ येत नाही. तसेच मुंग्याही येणार नाहीत. शिवाय लसूण हा पदार्थ चवीसाठी फोडणीत वापरला जातो. त्याचा वास खूप तीव्र असतो. धान्याच्या डब्यात लसूण ठेवल्यास कीटक येत नाही. फक्त लसणाच्या काही पाकळ्या कापडात बांधून ठेवा. (Top Stories)
९) कडधान्य जास्त दिवस साठवून ठेवायचे असतील तर त्यात कोरड्या लाल मिरच्या टाकून ठेवा. यामुळे तुमची डाळ कधीही खराब होणार नाही. थंडीच्या दिवसांत तुम्हाला जर तुमचं धान्य खराब होण्यापासून वाचवायचं असेल तर तुम्ही या पद्धतींचा वापर करू शकता. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
