Relationship : सध्या जग वेगाने बदल चालले आहे. अशातच बहुतांशजण आपल्या करियरकडे सर्वाधिक लक्ष देत आहेत. पण लग्न आणि मुलं योग्य वयात झाली तर पती-पत्नीचे नाते उत्तम राहते असे बहुतांशजणांना वाटते. वय वाढल्यानंतर लग्न झाल्यास कपल्समध्ये काही गोष्टींबद्दल ताळमेळ बसणे कठीण होऊ शकते. अशातच लग्न योग्य वयात करावे असा सल्ला नेहमीच घरातील मोठ्यांकडून दिला जातो. पण काही तरुण-तरुणी लग्नासाठी घाई करत नाहीत.
सध्याच्या बदलेलेल्या जीनवशैलीनुसार तरुण लग्नाचा विचार फार उशिराने करतात. आजकाल लोक आपल्या कामात ऐवढी अडकली गेलीत की, तणावाच्या आयुष्यापासून दूर राहण्यासाठी भटकंती करण्याचा प्लॅन करत राहतात. परंतु तुम्ही सध्याच्या कपल्समधील डिंक कपल्स ट्रेण्डबद्दल ऐकलेय का? जाणून घेऊया याबद्दल अधिक…..
डिंक कपल ट्रेण्ड नक्की काय आहे?
गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर डिंक कपल्स ही टर्म खूप चर्चेत आहे. खरंतर ही टर्म अशा कपल्ससाठी आहे ज्यांनी लग्न केलेयं, पण फॅमिली प्लानिंगसाठी घाई करत नाहीयेत. या टर्मचे पूर्ण नाव आहे डुअल इनकम नो किड्स. यामध्ये असे कपल्स मोडतात, जे दोघेही नोकरी करतात. परंतु त्यांना पालकत्व स्विकाराण्याची घाई नसते. (Relationship)
आपली आवड, इच्छा पूर्ण करणे
डिंक कपल्स जे कमावतात, बचत करतात आणि आपली आवड जोपासण्यासाठी पैसे खर्च करतात. बहुतांश कपल्स हा ट्रेण्ड फॉलो करत आहेत. कपल्स अशी काही कामे करतात त्यांना त्यामधून आनंद मिळतो. परिवारापेक्षा आपले खासगी आयुष्य आणि कामाला ते अधिक महत्त्व देतात. यामुळे कपल्स एकमेकांना व्यवस्थितीत समजू शकतात.
आव्हाने काय?
दरम्यान, काहीजण अशी देखील आहेत ज्यांना डिंक कपल्स प्रमाणे आयुष्य जगणे पसंत नाही. काही पालकांचे असे म्हणणे आहे की, त्यांच्या मुलांनी लग्न करून आयुष्यात सेटल व्हावे. हेच कारण आहे की, या ट्रेण्डचा काहीजणांकडून विरोध केला जात आहे. याशिवाय काही कपल्सच्या अशा विचारांमुळे परिवारात वेगळीच स्थिती निर्माण होते.