Relationship Tips : प्रेमाच्या नात्यात विश्वास हा एक अत्यंत महत्त्वाचा पाया असतो. पण काही वेळा, आपला पार्टनर आपल्या पाठीत खंजीर खुपसतोय का, अशी शंका मनात डोकावू लागते. ही शंका काही वेळा निराधार असते, तर काही वेळा ती सत्य ठरते. अशा वेळी काही लक्षणे किंवा संकेत आपल्याला मदत करू शकतात हे समजून घेण्यासाठी. हे संकेत हे अंतिम पुरावे नसले, तरी त्या दिशेने विचार करण्यास मदत करतात.
1. वागण्यात अचानक बदल:
जेव्हा एखादा पार्टनर फसवण्याच्या मार्गावर असतो, तेव्हा त्याच्या वागण्यात स्पष्ट बदल दिसून येतात. उदाहरणार्थ, जो व्यक्ती अगदी सहज बोलायचा, तो अचानक खूप गप्प राहू लागतो किंवा कोणत्याही प्रश्नाचं थेट उत्तर न देता विषय चुकवतो. मोबाईल किंवा सोशल मिडिया वापरण्याच्या सवयी बदलतात, फोन अचानक लॉक ठेवला जातो, आणि तो कुणाच्या फोनकडे किंवा मेसेजकडे जाऊ देत नाही, हे सर्व गोष्टी संशय निर्माण करणाऱ्या असतात.

Relationship Tips
2. वेळ न देणे किंवा टाळणे:
पूर्वी नेहमी वेळ देणारा जोडीदार अचानक व्यस्त असण्याचे कारण सांगून वेळ देणे टाळू लागतो, तर तो एक महत्त्वाचा संकेत असू शकतो. काम, मिटिंग, किंवा “थकलोय” यासारखी कारणं वाढतात. विकेंडला एकत्र वेळ घालवण्याऐवजी तो/ती सतत कुठे तरी बाहेर असतो/असते, आणि त्याच्या वेळापत्रकात एक प्रकारचा गोपनीयपणा येतो.
3. दिसण्यात आणि स्वभावात बदल:
अचानक पार्टनरने स्वतःच्या लुक्सकडे खूप लक्ष द्यायला सुरुवात केली असेल – जिमला जाणं, नवीन कपडे, परफ्युम्स, केशभूषा – आणि हे सगळं अचानक आणि नेहमीपेक्षा वेगळं वाटत असेल, तर त्यामागे कोणीतरी नवीन व्यक्ती असण्याची शक्यता असते. यासोबतच, तुमच्यावर चिडचिड करणे, छोट्या गोष्टींवरून भांडण करणे, किंवा तुला न समजण्याचा दोष तुमच्यावरच टाकणे हे देखील बदलाचे लक्षण असू शकते.(Relationship Tips)
4. डिजिटल संवाद टाळणे:
फेसबुक, WhatsApp, Instagram यावर पार्टनरचा वेळ वाढतोय, पण तुम्हाला ब्लॉक करणे, स्टेटस किंवा पोस्ट्स तुमच्यापासून लपवणे, हे सर्व लक्षणं फसवणुकीकडे इशारा करत असतात. फोन अचानक सायलेंट ठेवणे, कॉल येताच दुसऱ्या खोलीत जाणे, हे देखील शंका वाढवणारे संकेत असतात.
==========
हे ही वाचा :
Relationship Tips : नात्यात पैशांमुळे वाद होत असतील तर कसे सोडवावे?
Parenting Tips : मुलांमधील खोटं बोलण्याची सवय थांबवण्यासाठी खास टिप्स
==========
5. शारीरिक आणि भावनिक अंतर:
पार्टनर तुमच्याशी भावनिकदृष्ट्या दूर जाणे, आधी जेवढं जवळीक होतं ते कमी होणं, प्रेम, स्पर्श, संवाद यामध्ये घट होणं हे सर्व गोष्टी तुम्ही ओळखू शकता. हे लक्षण केवळ फसवणुकीचं नसून नात्यात थंडी पडल्याचं संकेतही असू शकतं, पण या बाबी एकत्र आल्यास नक्कीच दखल घ्यावी लागते.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics