बहुतांश वेळा असे पहायला मिळते की, एखाद्याला काही महिने डेट केल्यानंतर ज्या प्रकारे आनंदित असलायचे पाहिजे तसे राहता येत नाही. जो पर्यंत तुम्ही पार्टनरच्या भावना समजून घेत नाहीत आणि त्यांच्याशी कनेक्ट होत नाही तो पर्यंत तुम्हाला पार्टनर नक्की कसा आहे कळत नाही. चुका तर प्रत्येक व्यक्तीकडून होतात. परंतु एखाद्यासोबत तुम्ही रिलेशनशिपमध्ये येता तेव्हा काही गोष्टींची काळजी घेणे फार आवश्यक असते. जेणेकरुन तुम्ही खरंच योग्य व्यक्तीला डेट करताय की चुकीच्या व्यक्तीला करतायत हे तुम्हालाच कळले. (Relationship Tips)
-विचारांचा सन्मान न करणे
जर एखादा व्यक्ती तुमचा आदर करत नसेल तर समजून जा पुढे जाऊन समस्या येऊ शकतात. खरंतर विचारांमध्ये मतभेद असू शकतात. परंतु समोरच्या व्यक्तीचे ऐकून घेणे आणि त्याच्या भावनांचा आदर न करणे हे एका योग्य व्यक्तीचे लक्षण नाही.
-तुमच्या सुरक्षिततेसंदर्भात बेजबाबदारपणा
तुमच्या सुरक्षिततेसंदर्भात पार्टनर नेहमीच काळजी करत असतो. परंतु तुम्ही कधीतरी डेटवर गेला आणि तेथे काही स्थिती निर्माण झाली तर तुमची जबाबदारी पार्टनरने घेतली पाहिजे. तो तुम्हाला तेथेच सोडून निघून गेला तर ही गोष्ट योग्य नाही. अशा रिलेशनशिपमध्ये भावना नसतात, जबाबदारी नसते.

-प्रत्येक गोष्टीवर चिडणे
सुरुवातीला डेट करताना काही गोष्टी पार्टनरच्या कळणार नाहीत. मात्र काही महिन्यानंतर तुम्हाला त्याचा खरा स्वभाव कसा आहे हे कळून येईल. जर तो रागीट असेल तर वेळीच निर्णय घ्या. कारण अशी माणसे पुढे जाऊन हिंसक रुपात तुमच्याशी वागू शकतात. तर तो तुमच्या प्रत्येक गोष्टीवरुन चिडत असेल, भांडत असेल तर अशा रिलेशनशिपपासून दूर राहिलेलेच बरे.(Relationship Tips)
-तुमचे मत न ऐकणे
काही महिन्यांतर असे होते की, पार्टनर तुम्हाला फारसे महत्व देत नाही. तुमचे मत ही ऐकून न घेता स्वत: निर्णय घेतो. असे नाते तुमच्यासाठी समस्या निर्माण करु शकतात.
हे देखील वाचा- नात्यांमध्ये वाद वाढलाय तर ‘या’ टीप्स येतील कामी
-वारंवार पुरुषी अहंकार दाखवणे
जर तुम्हाला पार्टनरच्या वागण्यातून वारंवार त्याचा पुरुषी अहंकार दिसून येत असेल तर वेळीच नाते संपवलेले बरे. कारण तुम्हाला यावेळी फारसे महत्व दिले जात नाही. तुम्ही किती दुबळे आहात हेच वारंवार तुमच्याकडे बोट करुन दाखवले जाते. त्यामुळे मनस्ताप होण्यापेक्षा असा पार्टनर नसलेला बरा.