Home » पार्टनर सोबत वारंवार विनाकारण भांडण होत असेल तर ‘या’ टिप्स पहा

पार्टनर सोबत वारंवार विनाकारण भांडण होत असेल तर ‘या’ टिप्स पहा

by Team Gajawaja
0 comment
Relationship Tips
Share

रिलेशनशिपमध्ये प्रेम तर असतेच पण कधी कधी पार्टनरसोबत भांडण होणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे जी प्रत्येक कपल्समध्ये होते. परंतु काही कपल्स उगाचच विनाकारण भांडत राहतात. अशातच तुमची सुद्धा पार्टनर सोबत लहानसहान गोष्टींवर भांडण होत असतील तर पुढील काही सोप्प्या टिप्स तुमच्या जरुर कामी येऊ शकतात. (Relationship Tips)

काही कपल्स तर सतत एकमेकांशी वाद घालत राहतात. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होते. अशा नात्यात तुम्ही कधीच आनंदी राहत नाहीत. पण यावर तोडगा सुद्धा निघू शकतो हे लक्षात ठेवा.

-पार्टनरशी बोला
आजकाल व्यस्त आयुष्यात कपल्सला एकमेकांकडे अधिक लक्ष देता येत नाही. त्यामुळेच त्यांच्यामध्ये वाद होऊ लागतात. अशातच पार्टनर सोबत भांडण करण्याऐवजी त्यांच्याशी बातचीत करुन तुमची समस्या सोडवा. अन्यथा पार्टनर सोबत वॉकला जाऊ शकता. या दरम्यान तुम्ही पार्टनरशी आपल्या मनातील सर्वकाही सांगू शकता.

-कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा
जर तुमच्या पार्टनर सोबत सतत वाद होत असतील तर त्यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. अशातच काही कपल्स या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांच्या नात्यातील वाद हा अधिकच वाढला जातो. नात्यात दूरावा येऊ लागतो. त्यामुळे पार्टनरशी बातचीत करुन त्यामागील नक्की कारण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

-रागावर नियंत्रण ठेवा
काही वेळेस रागाच्या भरात आपण पार्टनरला काहीही बोलून जातो. त्यामुळे पार्टनरला वाईट वाटते. त्यामुळेच आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देताना विचार करा आणि नंतरच द्या. अशातच नात्यात वाद कमी होतील.

-वागणे बदलू नका
काही वेळेस असे होते की, वाद झाल्यानंतर पार्टनर एकमेकांशी विचित्र वागण्यास सुरुवा करतात. जसे की, एकटे राहणे, एकट्याने सर्व गोष्टी करणे. यामुळे नात्यातील वाद अधिक वाढू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला तुमचे नाते अधिक काळ टिकवून ठेवायचे असेल तर तुमच्या वागण्याकडे सुद्धा लक्ष द्या. लक्षात ठेवा तुमच्या वागण्यामुळे पार्टनरला वाईट वाटल्यास तर नाते तुटू शकते.(Relationship Tips)

हे देखील वाचा: तुम्ही चुकीच्या व्यक्तीला तर डेट करत नाही ना? ‘या’ संकेतांनी काढा शोधून

-एकत्रित वेळ घालवा
पार्टनरसोबत तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. या व्यतिरिक्त अगदीच वेळ नसेल तर फोनवरुन बातचीत तरी करा. अशातच तुमच्यातील दूरावा कमी होऊ शकतो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.