Home » रिलेशनशिपमध्ये पार्टनर खुश नसल्याचे हे आहेत संकेत

रिलेशनशिपमध्ये पार्टनर खुश नसल्याचे हे आहेत संकेत

कोणत्याही रिलेशनशिपमध्ये भावनात्मक चढ-उतार दिसून येतात. पण हेल्दी रिलेशनशिपसाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे असते.

by Team Gajawaja
0 comment
Relationship Tips
Share

Relationship Problems : कोणत्याही रिलेशनशिपमध्ये भावनात्मक चढ-उतार दिसून येतात. पण हेल्दी रिलेशनशिपसाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे असते. खासकरुन पार्टनर तुमच्यासोबत रिलेशनशिपमध्ये खुश आहे की नाही हे फार महत्त्वाचे असते. काही वेळेस रिलेशनमध्ये नाखुश असूनही काहीजण खुश असल्याचा दिखावा करतात. पण असे रिलेशनशिप दीर्घकाळ टिकत नाही.

कोणत्याही नात्यात खुश न राहाता राहणे कालांतराने मुश्किल होते. याचा व्यक्तीच्या मानसिक आणि आरोग्यावरही परिणाम होतो. अशातच पुढील काही संकेत दाखवतात की, तुमचा पार्टनर तुमच्यासोबतच्या रिलेशनशिपमध्ये खुश आहे की नाही.

संवाद कमी होणे
कोणत्याही नात्यात संवाद कमी होणे फार वाईट गोष्ट आहे. तुमचा पार्टनरल एकटा राहण्याचा प्रयत्न करत असेल, त्याच्या भावना व्यक्त करू शकत नसेल, संवाद साधताना बोलण्याकडे दुर्लक्ष करत असेल तर असे संकेत दाखवतात की, पार्टनर नात्यात खुश नाही. अशातच गरजेचे आहे की, पार्टनरशी मोकळेपणाने बोला.

भावनात्मक दूरावा
कोणत्याही नात्यात भावनात्मक मजबूत असणे अत्यंत गरजेचे आहे. पण तुम्हाला वाटत असेल की, पार्टनर तुमच्याशी भावनात्मक रुपात दूर जात आहे तर तो नात्यात खुश नसल्याचे संकेत आहे. यामुळे पार्टनरशी भावनात्मक दूरावा कमी करण्यासाठी प्रयत्न करा. एकमेकांसोबत अधिकाधिक वेळ घालवा.

रुटीन आणि सवयींमध्ये बदल
तुम्हाला पार्टनरच्या सवयींमध्ये आणि डेली रुटीनमध्ये बदल दिसून येत असेल तर समजून जा पार्टनर तुमच्यासोबत खुश नाही. याबद्दल पार्टनरशी बोलून काही गोष्टींवर तोडगा काढण्याचा जरुर प्रयत्न करा.

चिडचिड आणि तणावाखाली राहणे
तुमचा पार्टनर लहानलहान गोष्टींवरुन चिडचिड करत असेल किंवा सातत्याने तणावाखाली राहत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. पार्टनरशी बोला. पार्टनरच्या राग किंवा तणावाचे कारण जाणून घेण्यााचा प्रयत्न करा. (Relationship Problems)

भविष्याबद्दल प्लानिंग न करणे
तुमचा पार्टनर तुमच्यासोबत भविष्यासंदर्भातील कोणतेही प्लॅनिंग करत नसेल तर समजून जा तो तुमच्यासोबत खुश नाही. एकमेकांच्या इच्छा-अपेक्षा समजून घेणे फार महत्त्वाचे असते. तेव्हाच रिलेशनशिप दीर्घकाळ टिकून राहते.


आणखी वाचा :
रिलेशनशिपमध्ये इमोशनल डिटॅचमेंटचे ‘हे’ आहेत संकेत
नव्या रिलेशनशिपमध्ये ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
Gaslighting चा रिलेशनशिपवर होतो असा परिणाम

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.