Home » पार्टनर सोबत राहूनही एकटेपण वाटते? ही असू शकतात कारणं

पार्टनर सोबत राहूनही एकटेपण वाटते? ही असू शकतात कारणं

by Team Gajawaja
0 comment
Relationship Problems
Share

प्रेम, विश्वास आणि प्रत्येत स्थिती एकमेकांसोबत उभं राहण्यासाठी जेव्हा दोन लोक एका नात्यात येतात तेव्हा आयुष्यात खुप आनंद असतोच. पण आव्हानांना ही दोघे ठापमणे सामोरे जातात. अशातच काहींना पार्टनरची साथ न मिळाल्याने एकटे वाटते. पार्टनर असतो सोबत पण त्याच्याकडून तुम्ही जी अपेक्षा करता ती पूर्ण होत नाही आहे याची खंत तुम्हाला वाटत असते. त्यामुळेच नात्यात आपण एकटेच सर्व काही करतोय अशी भावना मनात निर्माण होते. यामागील सर्वाधिक मोठे कारण असे की, दोघांमधील संवाद. (Relationship Problems)

-दोघांमधील संवाद
लाइफहॅकच्या मध्ये एकमेकांसोबत बातचीत करणे हे असे एक माध्यम आहे ज्याच्या मदतीने तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या भावना, समस्या आणि आनंद शेअर करु शकता. एकटेपणापासून दूर राहण्यासाठी हे फार महत्वाचे आहे. मात्र हे अश्या गोष्टींवर निर्भर करते की, तुम्ही कोणत्या प्रकारे बातचीत करता. जर तुम्ही तणाव, राग आणि चिडचिडेपणासह बोलत असाल तर एकमेकांपासून दूरावा वाढला जातो. हे सुद्धा नात्यात एकटेपण वाटण्याचे कारण असू शकते.

-पार्टनरची सोबत
जर तुम्ही दोघेही नोकरी करत असाल आणि एकमेकांसोबत कमी वेळ घालवत असाल तर तुमच्या दोघांमध्ये दूरावा वाढू शकतो. हे सुद्धा एकटेपणाचे एक कारण असू शकते. जर तुम्ही फिजिकली सेपरेशन व्यतिरिक्त एकमेकांना सांगा की, मी नेहमीच तुझ्या सोबत आहे तर अशावेळी एकटेपण वाटत नाही. पण असे न केल्यास एकटेपणा वाटणे स्वाभाविक आहे.

-इंटिमेसी प्रॉब्लेम
जर तुमच्या नात्यातील उत्साहाच निघून गेला असेल तर यामुळे एकमेकांबद्दल वाटणारे अफेक्शन ही काही कामाचे नाही. हे एकटेपण वाटण्यामागील मोठे कारण असू शकते. यामुळेच कपल्समध्ये इंटिमेसी एक महत्वाची भुमिका निभावते. जेणेकरुन एकटेपण नेहमीच दूर राहिल. (Relationship Problems)

-यश आणि पराभवाची भावना
जर तुमच्यामध्ये करियर, संसार आणि कोणत्याही गोष्टी बद्दल यश आणि पराभवाच्या भावना असतील तर नात्यात फूट पडू शकते. तुम्ही एकटे पडू शकता. तुम्हाला वाटत असले तरीही तुम्ही पार्टनर सोबत सर्वसामान्यपणे वागत आहात असे वाटत नाही.

हे देखील वाचा- वेळेआधीच आलेल्या मेनोपॉजमुळे महिलांच्या शारिरीक-मानसिक आरोग्याला धोका

-गरजा वेगवेगळ्या असणे
काही कपल्स आपल्याच स्वत:च्याच गरजांकडे अधिक लक्ष देतात. पार्टनरला काय वाटते हे पाहतच नाही. अशातच त्यांच्यामध्ये भावनात्मक दूरावा येतो आणि एकटेपण घर करु लागते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.