Home » तुम्ही पार्टनरपासून इमोशनली दूर होत असल्याचे ‘हे’ आहेत संकेत

तुम्ही पार्टनरपासून इमोशनली दूर होत असल्याचे ‘हे’ आहेत संकेत

by Team Gajawaja
0 comment
Love Affair Problem
Share

जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा तुम्हाला पार्टनरकडून काही अपेक्षा असतात. खरंतर नात्यात विश्वास असणे ही फार महत्वाची गोष्ट असून त्यावर तुमचे नाते दीर्घकाळ टिकते. त्याचसोबत तुम्ही एकमेकांशी भावनात्क जोडले गेलेले असतात. मात्र काही वेळेस कोणत्या ना कोणत्या कारणास्तव तुम्ही पार्टनरपासून थोडं दूर राहण्यास सुरु करता. यामध्ये काही वेळेस पार्टनर एकमेकांना खोटे बोलून फसवू ही शकतात. मात्र जेव्हा तुमचे नाते अचानक तुटते तेव्हा समोरच्या व्यक्तीला नक्की असे का झाले हे कळणे मुश्किल होते. असे का होत असेल किंवा त्यामागे काय कारण असू शकतात याचा अंदाज लावणे सुद्धा थोडे मुश्किलच आहे. अशातच तुम्ही पार्टनरसोबत इमोशनली दूर होत आहात का तर हे पुढील संकेत तुम्हाला त्याबद्दल सांगतील. (Relationship emotions)

-एकत्रित वेळ न घालवणे
जेव्हा तुमटे पार्टनरसोबत तुमचे उठणे-बसणे सातत्याने होत असते तेव्हा तुम्ही रिलॅक्स असता. मात्र अचानक याच गोष्टी कमी झाल्यास आणि आधीसारखा आनंद तुम्हाला त्यावेळी होत नसेल तर समजून जा तुम्ही तुमच्या पार्टनर पासून इमोशनली दूर होत आहात.

-पार्टनर समस्येत असेल तरीही तुम्ही चिंता करणे सोडता
जेव्हा तुमचा पार्टनर एखाद्या समस्येत असेल तरीही तुम्हाला त्याच्याबद्दल अधिक चिंता वाटत नाही किंवा तुम्ही त्याकडे कानाडोळा करत असाल तर याचा अर्थ असा होतो की, तुम्ही पार्टनर पासून दूर जात आहात. कारण समोरचा व्यक्ती कोणत्या परिस्थितीतून जातोय याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नसते.

Relationship emotions
Relationship emotions

-जेव्हा पार्टनर प्रोत्साहन देणे बंद करतो
पार्टनर ज्यावेळी तुम्हाला प्रोत्साहन देत नाही किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला पाठिंबा देत नाही, तेव्हा गोष्टी थोड्या कठीण होतात. तेव्हा तुम्हाला समजण्याची वेळ असते की, तुम्ही पार्टनर पासून इमोशनली दूर होत चालले आहात.

हे देखील वाचा- लग्नासाठी एखाद्याला होकार देण्यापूर्वी ‘या’ गोष्टींबद्दल स्पष्ट सांगा

-पार्टनर तुमच्यापेक्षा दुसऱ्याला अधिक वेळ देतो
जर तुमचा पार्टनर तुम्हाला त्याचा वेळ देण्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीला देत असेल तर नात्यात वाद होणारच. कारण एकमेकांचा सहवास लाभल्यास आपल्यावर असलेला ताण हा थोडाफार काही वेळासाठी का होईना तो दूर होतो. मात्र या गोष्टी उलट पद्धतीने होत असतील तर तुम्ही सुद्धा नात्यापासून दूर राहण्यास प्रयत्न करु लागता.(Relationship emotions)

-दुसऱ्याच व्यक्तीसाठी तुमच्याशी भांडण करणे
नात्यात समजूतदारपणा असावा. मात्र नात्यात एखादा तिसरा व्यक्ती आला आणि त्याच्यावरुन तुमचा पार्टनर तुम्हाला ओरडू लागल्यास वाईट वाटते. अशावेळी आपणच नात्यामधून दूर जावे असे वाटू लागते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.