एक सुंदर आणि भावनात्मक नाते तेच असते ज्यामध्ये दोन्ही बाजूने एकमेकांना सन्मान दिला जातो. अशा नात्याला परफेक्ट रिलेशनशिप असे म्हटले जाते. पण जेव्हा नात्यात एकच व्यक्ती रिलेशनशिप सांभाळण्यासाठी काही गोष्टी करत असेल आणि दुसरा त्याकडे दुर्लक्ष करत असेल तर असे नाही कधीच परफेक्ट असू शकत नाही. तर तुम्ही सुद्धा अशा नात्यात अडकलात होता का? काही रिलेशनशिप असे असतात जे खरंच एकमेकांसाठी योग्य नसतात. पण तरीही आपण त्यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहतो. काही गोष्टी माहिती असूनही आपण त्या नात्यातून बाहेर पडू शकत नाही. अखेर अशी कोणती कारणे आहेत जी आपल्याला आपण चुकीच्या व्यक्तीसोबत रिलेशनशिप मध्ये असल्याचे दाखवून देतील हे पाहूयात. (Relationship advice)
दुसऱ्यांकडून चुकीच्या अपेक्षा करणे
काहीवेळेस आपण दुसऱ्यांकडून चुकीच्या अपेक्षा, इच्छा ठेवतो. यामुळेच आपले नाते कमजोर होऊ शकते. डेटिंग दरम्यान लोकांना माहिती असते की, तुमचा पार्टनर तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्या स्तरापर्यंत जाऊ शकतो. जेव्हा तुमच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा तुम्ही तुमच्या काही गोष्टी समोरच्या व्यक्तीवर सोडता. काही वेळेस तुमचे बदलले वागणेही नात्यावर प्रभाव पाडते. त्यामुळे आपल्या इच्छा एखाद्यावर थोपण्यापूर्वी त्यांची स्ट्रेंथ काय आहे हे जाणून घ्या.
सामाजिक दबाव
सामाजिक अपेक्षा आणि मित्रांच्या दबावामुळे लोक चुकीच्या व्यक्तींसोबत नातेसंबंध जोडतात. भारतीय समाजात हे पाहिले गेले आहे की, एक मुलगी आणि एक मुलगा एकटे राहणे, लग्न किंवा मुलं जन्माला न घालणे हे लोकांसाठी त्रासदायक ठरते. परिणामी आपण चुकीच्या लोकांसोबत नात्यात अडकलो जातो.
इमोशनल ट्रॉमा
काही वेळेस भूतकाळातील वाईट अनुभव किंवा इमोशनल ट्रॉमामुळे लोक चुकीच्या व्यक्ती निवडतात. काही लोकांसोबत आपले नातेसंबंध जोडतात जे त्यांच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टींना पुर्नजन्म देतात. पण असे नातेसंबंध आयुष्यात केवळ फसवणूक आणि धोकाच देतात. त्यामुळे इमोशनल ट्रॉमामध्ये बनवण्यात आलेले नातेसंबंधत दिर्घकाळ टिकत नाहीत.
नकाराची भीती
नकाराचा सामना तर प्रत्येकालाच करावा लागतो. पण वारंवार नकार मिळत असेल तर व्यक्ती भावनिकरित्या कमजोर होतो. काही वेळेस रिजेक्शनच्या भीतीमुळे मुलगा अथवा मुलगी चुकीच्या पार्टनरसोबत रिलेशनशिपमध्ये येतात. एकटेपणाची भीती सुद्धा कधीकधी वाटत राहते.या अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यासाठी चुकीच्या व्यक्तींची साथ निवडली जाते.पण असे करणे खरंच अयोग्य आहे. (Relationship advice)
कॉम्प्रेमाइज करणे
काही वेळेस मुद्दाम किंवा अज्ञातपणे लोक नात्यात कॉम्प्रेमाइज करू लागतत. पार्टनर तुमच्याशी नाते टिकवेल की नाही याची कोणतीही गॅरेंटी नसताना ही पार्टनर आहे म्हणून नात्यात राहणे चुकीचे आहे. अथवा रिलेशनशिपच नाही म्हणून चुकीच्या व्यक्तींसोबत नातेसंबंध जोडणे सुद्धा तुमच्या आयुष्यासाठी धोकादायक आहे.
हेही वाचा- सासरच्या मंडळींना कधीच सांगू नका ‘या’ गोष्टी