Relationship Advice : रिलेशनशिपमध्ये गर्लफ्रेंडआणि बॉयफ्रेंडमध्ये खरं प्रेम असल्यास त्यांचे नाते एका वैवाहिक कपलप्रमाणे अनमोल असते. असे म्हटले जाते की, नाते जेवढे जोडणे सोपे आहे तेवढेच टिकवण फार कठीण आहे. नात्यात एकमेकांवर प्रेम, विश्वास आणि सन्मान असल्यास ते दीर्घकाळ टिकून राहू शकते. पण काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास नाते मोडले जाऊ शकते. अशातच गर्लफ्रेण्डच्या कोणत्या गोष्टींचा त्रास बॉयफ्रेंडला होऊ शकतो याबद्दल जाणून घेऊया सविस्तर….
दिवसभर कॉल आणि मेसेज
पार्टनरला दिवसभर कॉल आणि मेसेज केल्याने तो देखील वैतागू शकते. प्रत्येकाला पर्सनल स्पेस देणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशातच गर्लफ्रेंड सातत्याने पार्टनरल कॉल आणि मेसेज करत असेल तर नात्यात कालांतराने या गोष्टीवरून वाद होऊ शकतात. यामुळे तुम्हाला काम असेल किंवा मोकळ्या वेळेत एकमेकांना कॉल किंवा मेसेज करा. याचा नात्यावरही परिणाम होणार नाही.
भूतकाळाबद्दल विचारू नका
ब्रेकअप केल्यानंतर तुम्ही पुन्हा एका नव्या नात्यात अडकला गेलात तर पार्टनरला कधीच अत्याधिक प्रश्न विचारू नका. तुम्ही वारंवार पार्टनरला त्याच्या भूतकाळातील गोष्टी विचारल्यास नात्यात वाद होऊ शकतात. याशिवाय एक्स पार्टनरबद्दने केलेल्या काही गोष्टींचा त्रास दुसऱ्या पार्टनरला होऊ शकतो हे लक्षात घ्या. यामुळे पार्टनरसोबत दीर्घकाळ नाते टिकवायचे असल्यास वर्तमानकाळात जगा. (Relationship Advice)
टोमणे मारणे
तुम्ही बहुतांशवेळेस पाहिले असेल की, पार्टन एकमेकांना लहान-लहान गोष्टींवरून टोमणे मारतात. खरंतर ही सवय बदलली पाहिजे. सातत्याने पार्टनरला टोमणे मारल्याने त्याला आपण दोषी असल्यासारखे वाटू शकते. यामुळे नात्यात गोडवा आणि आनंद हवा असल्यास एकमेकांचा आदर आणि समजून घेणे फार महत्त्वाचे आहे.