कोणत्याही नात्याची सुरुवात ही विश्वासाने होते. जेव्हा तुम्ही एकमेकांवर विश्वास ठेवता आणि नेहमी एकमेकांसाठी उभे राहता तेव्हा तुमचे नाते अधिक घट्ट होते. मात्र तुमच्या नात्यात हळूहळू अविश्वासाची भावना निर्माण झाल्यास असे नाते दीर्घकाळ टिकत नाही. खरंतर जेव्हा तुमचा आपल्याच माणसावरील विश्वास उठतो तेव्हा अशी स्थिती दोघांसाठी वेदनादायक असते. (Relationship advice)
रिलेशनशिप एक्सपर्ट्स असे म्हणतात की, विश्वास हा नात्याचा पाया असतो. कारण तुम्ही यामुळे भावनात्मक आणि सुरक्षिततेच्या भावनेने समोरच्या व्यक्तीशी जोडले जातात. मात्र पार्टनरचा विश्वास मिळवायचा असेल तर त्यासाठी वेळ द्या. हळूहळू गोष्टी आपोआप सुधारतील. अशातच काही गोष्टी अशा करा ज्यामुळे पार्टनरचा विश्वास जिंकण्यास तुमच्या कामी येतील. त्या नक्की कोणत्या आहेत हे आज या लेखातून पाहूयात.
माफी मागण्यास शिका
माफी मागणे सोप्पे नव्हे. मात्र माफी मागण्यासाठी काहींना भीती वाटते किंवा लाज वाटते. जर तुम्ही चुकला असाल तर पार्टनरची जरुर माफी मागा. यासाठी आधी तुम्ही नक्की काय चुक केली आहे यावर पुन्हा विचार करा आणि पार्टनरशी बातचीत करण्यासाठी त्याच्याकडे वेळ मागा.
चुकांची जबाबदारी घ्या
जर तुमच्याकडून एखादी चुक झाली असेल आणि त्याला जबाबदार तुम्ही असाल तर ती गोष्ट स्विकारा. तुम्ही असे केलात तर पुढील वेळेस तशी चुक करण्यापासून दूर रहाल. एखादे महत्त्वाचे कागदपत्र तुमच्या हातून गहाळ झाले असेल तर त्या बद्दल आधीच पार्टनरला सांगा, जेणेकरुन नंतर या बद्दल पार्टनरशी खोटं बोलण्याची वेळ येणार नाही.
पार्टनरचे व्यवस्थितीत ऐका
नात्यात विश्वास तेव्हाच निर्माण होईल जेव्हा तुम्ही एकमेकांना समजून घ्याल. एकमेकांच्या चुका माफ कराल. मी पणाची भावना नात्यात निर्माण झाल्यास नात्यात प्रेम कमी आणि वादच अधिक होत राहतील हे लक्षात घ्या. त्यामुळे पार्टनर नक्की काय बोलतोय, त्याला नेमके काय बोलायचे आहे हे व्यवस्थितीत ऐका आणि नंतरच रिअॅक्ट करा. अन्यथा यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात.
माफीनामा लिहा
जर तुम्हाला पार्टनरला समोरून सॉरी बोलता येत नसेल तर तुम्ही चिठ्ठी लिहून माफी मागू शकता. तुम्ही त्यात तुमच्या मनातील सर्वकाही गोष्टी लिहू शकता. मात्र लिहिताना त्यात नेहमीच योग्य शब्दांचा वापर करा. जेणेकरुन समस्या सुटेल. (Relationship advice)
हेही वाचा- नवऱ्याची नोकरी गेल्यानंतर बायकोने असे सांभाळावे घर
पार्टनरशी वाद घालण्यापासून दूर रहा
रिलेशनशिपमध्ये विश्वास दीर्घकाळ टिकवून ठेवायचा असेल तर पार्टनरशी वाद घालण्यापासून दूर रहा. जर मतभेद असतील तर त्याला तुमच्या भांडणाचे कारण होऊ देऊ नका. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या नात्याला महत्त्व द्या.