लग्नानंतर जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा तिथे नव्याने नातेसंबंध जुळले जातात. ज्यांच्यासोबत ती राहते त्यांच्यासोबत ती काही गोष्टी शेअर करते. सासरच्या मंडळींना तुमच्याबद्दल सुरुवातील फार काही माहिती नसते किंवा तुम्हाला ही त्यांच्याबद्दल माहिती नसते. काही वेळेस अज्ञातपणे सासरच्या मंडळींना अशा काही गोष्टी सांगतो त्यामुळे नात्यात कटुता येते. यामुळे गरजेचे आहे की, सुरुवातीच्या काळात सासरच्या माणसांना काही गोष्टी सांगणे टाळावेत. (Relationship advice)
आर्थिक स्थितीबद्दल वाईट न बोलणे
लग्नानंतर तुम्ही सासरच्या मंडळींना त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल वाईट बोलू नये. त्याच सोबत तुम्ही ते आर्थिकरित्या कमजोर आहात हे सुद्धा दाखवून देऊ नका. असे केल्याने ते तुम्हाला चुकीचे समजू शकतात. नात्यात समस्याही यामुळे उद्भवू शकते. त्यामुळे प्रयत्न करा की, जी काही स्थिती आहे ती स्विकारा. जेणेकरुन तुम्हाला अॅडजेस्ट करण्यास समस्या येणार नाही.
घरातील चुका काढू नका
प्रत्येक परिवाराचे काही नियम, वागण्याबोलण्याची पद्धत असते. त्यामुळे कधीही सासरच्या मंडळींच्या चूका काढण्यापासून दूर रहा. ते कसे वागताय, काय करतायत यामधील चूका काढत राहिल्याने तुमचे त्यांच्यासोबतचे नातेसंबंध बिघडू शकतात. तुम्ही त्यांच्या कलेने काही समजून घेण्याचा प्रयत्न करा.
सासरच्या मंडळींची तुलना दुसऱ्यांसोबत करू नका
कधीही चूकन आपल्या सासरच्या मंडळींची तुलना दुसऱ्यांसोबत करू नये. काही लोक अशी चुक करतात. ते आपल्या सासरच्या मंडळींची तुलना दुसऱ्यांसोबत करतात. जेव्हा त्यांना तुम्ही असे करत आहात हे कळेल तेव्हा तुमच्यासोबत ते वेळ घालवणे पसंद करणार नाहीत. त्यामुळे अज्ञातपणे सुद्धा अशा प्रकारची चूक करण्यापासून दूर रहा. (Relationship advice)
पैशाची बढाई मारू नका
जर तुमच्या माहेरची परिस्थिती उत्तम असेल आणि तुम्ही सुद्धा नोकरी करत असाल तर सहाजिकच तुमच्याकडे अधिक पैसे असतील. पण तुमच्याकडे अधिक पैसे आहेत म्हणून सासरच्या मंडळींसोबत यावरून बढाई मारत आहात तर अशी चूक करू नका. असे करणे त्यांना अजिबात आवडणार नाही. उलट त्यांना तुम्ही घमेंडी आहात असे वाटेल.
हेही वाचा- पालकांच्या भांडणांचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर होईल परिणाम