काही वेळेस असे होते की, प्रेम प्रकरण किंवा वैवाहिक आयुष्यात संशय, चुका, अविश्वास, लहान-लहान गोष्टीवरुन भांडण यामुळे लोक एकमेकांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतात. हा निर्णय कोणताही मागचापुढचा विचार न करता काही वेळेस घेतला जातो. यामुळे नंतर आपण खरंच असा निर्णय घेतला म्हणून पश्चाताप ही व्यक्त करतो. एकमेकांपासून दूर गेल्यानंतर आपल्याला समोरच्या व्यक्तिची किंमत कळते. असे अशावेळी होते जेव्हा तुम्हाला समोरच्या व्यक्तिसाठी मनात भावना, प्रेम असते. परंतु तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा एखादा निर्णय आयुष्यात घेतला असेल आणि आता पार्टनरकडे पुन्हा जाऊन नात्याला पुढे नेण्यासाठी आणखी एक संधी देऊ पाहत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे. कारण आधी ज्या चुका केल्या त्या पुन्हा करण्यापासून दूर राहिले पाहिजे. (Relationship Advice)
तुटलेले नाते पुन्हा जोडण्यासाठी पुढील काही गोष्टी लक्षात ठेवा
-जर तु्म्हाला वाटत असेल तुम्ही घाईत निर्णय घेतला आणि तुम्हाला अजून ही पार्टनरवर प्रेम आहे तर त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. जर तो यासाठी प्रयत्न करत नसेल तर तुम्ही करुन पहा.
-जर सोशल मीडियात त्याने तुम्हाला ब्लॉक केले असेल तर त्याची ईमेलच्या माध्यमातून समजूत घालण्याचा प्रयत्न करा. काही वेळ त्याच्या उत्तराची प्रतीक्षा ही करा. जर त्याच्या मनात तुमच्यासाठी खरंच प्रेम असेल तर तो तुम्हाला नक्की रिप्लाय करेल. तुटलेले नाते पुन्हा एकदा जोडण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो.
-तुमची मतं भले वेगवेगळी असो पण नात्यावर जेव्हा त्याचा परिणाम होतो तेव्हा एकमेकांशी बोलून त्यावर तोडगा काढता आला पाहिजे. कधीच आपले नाते एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहू नका. एकमेकांमध्ये फूट पडण्यापासून दूर रहा. दोघांनी समजूतीने रिलेशनशिपमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. आपल्या चुकांमधून शिका आणि नात्याला आणखी एक संधी देऊन पहा.
-नव्याने पुन्हा एकदा नाते सुरु करण्यापूर्वी आधी एकमेकांना समोरासमोर भेटा आणि बोला. कोणत्या चुकांमुळे तुम्ही नाते तोडले होते त्याबद्दल स्पष्ट करा. आता जर नाते पुन्हा नव्याने सुरु करायचे असेल तर यावेळी नात्यामध्ये काही मर्यादा सुद्धा एकमेकांसाठी तयार करा. पण त्याचा अतिरेक होणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्या.
-जर तुम्हाला वाटत असेल नाते तुमच्यामुळे तुटले असेल तर कोणत्याही निसंकोचाशिवाय तुम्ही पार्टनरची माफी मागा. माफी मागितल्याने काही कमीपणा येत नाही. तुमच्याच चुकांमुळे पार्टनर दुखावला गेला तर त्याची माफी मागण्यात लाज का बाळगायची? अशातच तुमचा पार्टनर ही तुमचा भुतकाळ विसरुन नव्याने सुरुवात करु पाहत असेल तर त्याच्या त्या निर्णयाचे स्वागत करा. (Relationship Advice)
हे देखील वाचा- सावधान ! घोरण्याच्या सवयीवर माऊथ टॅपिंग ट्रेंड
-तुटलेल्या नात्याला पुन्हा एकदा संधी देताना सकारात्मक विचार ठेवा. जर तुम्ही सकारात्मक होऊन तुटलेले नाते पुन्हा सुरु करत असाल तर शेवट पर्यंत तशीच सकारात्मकता तुमच्यामध्ये कायम ठेवा. एकमेकांवर विश्वास ठेवून नाते पुढे किती आनंदाने घेऊन जाता येईल याचा सुद्धा विचार करा.