ज्या नात्यात सतत वाद, भांडण होत राहतात ते नाते कधीच अधिक काळ टिकून राहू शकत नाही. अशा नात्यात एकमेकांच्या भावनांचा सन्मान केला जात नाही. परंतु काहीवेळेस कपल्समध्ये वाद झाल्यानंतर गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड तरी नाराज होते. त्यामुळे एकमेकांना समजून घेण्यासाठी, त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार ना? परंतु भांडण मिटवण्याच्या प्रयत्नात जर गर्लफ्रेंड नाराज झाली तर अधिकच पंचायत होते. अशावेळी नेमके करायचे काय असा प्रश्न पडतो. पण तुम्हाला तिची समजूत काढून भांडण मिटवायचे असेल तर पुढील काही गोष्टी बोलणे टाळा.(Relation Tips)
-वेळोवेळीच असेच करतेस
काही नात्यात लहान-लहान गोष्टींवरुन वाद होतात पण ते लवकर मिटतात. मात्र जर तुम्ही रागात गर्लफ्रेंडला तु वेळोवेळी अशीच नाटकं करतेस असे म्हणाल तर ती अधिकच चिडेल. वाद मिटण्याऐवजी तो अधिक वाढेल. त्यामुळे तिला प्रेमाने समजवा आणि नक्की काय वाद झाला याबद्दल ही एकमेकांशी बोलून त्यावर तोडगा काढा.
-तुला माझी किंमतच नाही
भांडण झालं की, व्यक्ती रागाच्या भरात वाट्टेल ते बोलते. त्यामुळे काहीवेळा असे म्हटले जाते की, रगात आपण जे बोलतो ते सत्य असते. परंतु वाद अतिशय टोकाला गेला तरी आपण तिला तुला माझी किंमतच नाही असे वाक्य बोलणे टाळा. जेणेकरुन तुमचे नाते टिकण्याऐवजी मोडले जाईल.
हे देखील वाचा- “Hybrid Dating”- प्रेमाच्या नात्यांना लागलेले नवं वळण

-तुला वाट्टेल तेव्हा बोल किंवा फोन कर
नात्यात भांडण झालं की, आपण एकमेकांशी बोलणे, संपर्क करणे टाळतो. आपल्याला असे वाटते की, समोरच्याच व्यक्तीने आपल्याला समजून घेतले पाहिजे. त्यामुळे नाराज असलेल्या गर्लफ्रेंडला तुला वाट्टेल तेव्हा बोल किंवा फोन कर असे अजिबात बोलू नका.(Relation Tips)
-माझी अगोदरचीच गर्लफ्रेंड बरी होती
तुमची गर्लफ्रेंड नाराज झाली असेल तर तिला टोमणे मारताना तुम्ही माझी अगोदरचीच गर्लफ्रेंड बरी होती असे कधीच बोलू नका. कारण येथे तुम्ही तुमच्या आधीच्या नात्याबद्दल आतासुद्धा विचार करता असे वाटले. यामुळे तुमच्या नात्यात दूरावा येईलच पण वाद अधिक वाढेल.
-मी तुझ्यावर प्रेम करुन चूक केली
मी तुझ्यावर प्रेम करुन चूक केली हे तर बोलणे तुम्ही नक्कीच टाळले पाहिजे. भांडण किती ही टोकाला जाऊ दे पण हे बोलू नका. चिडलेल्या गर्लफ्रेंडच्या भावना तर दुखावल्या जातीलच. त्याचसोबत तुमचे नाते तेथेच संपुष्टात येईल.