काही दिवसांपूर्वी स्टँडअप कॉमेडीयन आणि यूट्यूबर समय रैना याच्या इंडियास गॉट लेटेंट या शोमुळे वाद निर्माण झाला होता. ज्यामध्ये आक्षेपार्ह कोमेंट्स केल्यामुळे रनवीर अहलाबादिया याला बरंच ट्रॉल केलं गेलं. त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा झाली. पण मुख्यमंत्रीपदावर असलेल्या नेत्याने भूतकाळात असेच आक्षेपार्ह कोमेंट्स पोस्ट केले असतील तर? केलं असतील नाहीत केले आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या रेखा गुप्ता यांनी अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यांच्या ह्या जुन्या पोस्ट सोशल मिडियावर आता एक वादाचा मुद्दा बनले आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारी नेता अशी आक्षेपार्ह भाषा वापरतो, अशी टीका त्यांच्यावर होत आहे? त्याचबरोबर हे नवं भाजप आहे, अशी टीका सुद्धा विरोधक करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी भूतकाळात असे काय tweets केले होते की वाद उफाळून आला आहे, जाणून घेऊया.
१९ फेब्रुवारीच्या रात्री भाजपने रेखा गुप्ता यांना दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं. मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव जाहीर होताच, त्यांच्या जुन्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या. यामध्ये त्यांनी आपचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह भाषा वापरली होती. या जुन्या पोस्ट भाजप समर्थकांनी पुन्हा शेअर करून केजरीवाल यांच्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत पराभवावर चेष्टा केली. पण भाजपा समर्थकांना माहिती नव्हतं की हा डाव त्यांच्यावरच, खासकरून रेखा गुप्ता यांच्यावरच उलटेल. (Rekha Gupta)
रेखा गुप्ता यांनी २०१६ आणि २०१९ मध्ये काही पोस्ट केल्या होत्या, यामध्ये त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात अभद्र भाषा वापरून व्यक्तिगत हल्ले केले होते. १४ मार्च २०१९ रोजी मनोज तिवारी यांच्या एका पोस्टला रिपोस्ट करत रेखा गुप्ता यांनी लिहिलं होतं, “दिल्ली तेरे बाप की भी नही है जो तू यहां मुख्यमंत्री बन कर बकवास कर रहा है! दिल्ली जनता की है, ओर जनता तुझे तेरी मां की कोख में वापसी भिजवायेगी!! #कमीना कही का,” एवढंच नाही, याशिवाय ४ ऑक्टोबर २०१६ ला सुद्धा त्यांनी केलेली एक पोस्ट व्हायरल होते आहे. “केजरीवाल अपना जन्मदिन कभी नहीं मनाता, उन्होंंने अपनी मां से घटना का व्हिडिओ मांगा था जिसे वो नहीं दे सकी थी.. याशिवाय बरेच अशाच पोस्ट आहेत ज्यामुळे आता रेखा गुप्ता यांनी केलेल्या टीकेमुळेच त्यांच्यावर टीका होत आहे.
दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री महोदयांना भेटा, हेच संस्कार दिले आहेत त्यांच्या पक्षाने. रक्षण करा आता दिल्लीचे, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची राजधानीच्या या मुख्यमंत्र्यांची अशी भाषा आहे. अशी टीका विरोधक करत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि माजी पत्रकार सागरिका घोष यांनी सुद्धा एक पोस्ट केली आहे, “मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचे ट्वीट्स शिला दिक्षित यांच्या मेहनती आणि दयाळू स्वभावापासून, आणि सुषमा स्वराज यांच्या सभ्य भाषेपासून खूप लांब आहे. पण हेच “नवीन” भाजप आहे जिथे द्वेष आणि अपशब्द वापरणं सामान्य झालं आहे”, अशा शब्दात सागरिका घोष यांनी टीका केली आहे. (Rekha Gupta)
=================
हे देखील वाचा : Rekha Gupta : रेखा गुप्ता यांच्यामुळे राजधानी बहरणार का ?
=================
काहींनी रेखा गुप्ता यांच्या या ट्वीट्स मुळे त्यांनी समय रैना आणि रनवीर अहलाबादिया यांनाही मागे टाकलं असं म्हणत आहेत. राजकारणात नेते एकमेकांवर टीका करत असतात, पण या टीकांनी सभ्यपणाची पातळी ओलांडली तर त्या राजकरण्यांवर कारवाई होते का? ज्या जलद गतीने समय रैना आणि रनवीर अहलाबादिया यांच्यावर कारवाई झाली. असा सवाल आता विचारला जात आहे.