Reheat Cooking Oil : संध्याकाळच्या नाश्तासाठी भाजी किंवा वडे अथवा पापड तळण्याासाठी वापरलेले तेल बहुतांशजण पुन्हा वापरतात. खरंतर, तळणीचे तेल पुन्हा एखाद्या भाजी किंवा रेसिपीसाठी वापरणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. कुकिंग ऑइल वारंवार वापरल्यास किंवा रिहीट केल्यास त्यापासून टॉक्सिक पदार्थ तयार होऊ लागतात. यामुळे शरिरात फ्री रेडिकल्सची समस्या वाढली जाऊ शकते. अशातच भविष्यात आरोग्यासंबंधित काही गंभीर आजार होण्याचा धोका वाढला जातो. जाणून घेऊया कुकिंग ऑइलचा वारंवार वापर केल्याने आरोग्याला कोणते नुकसान होऊ शकते हे जाणून घेऊया.
हृदयासंबंधित आजार
तळणीचे तेल पुन्हा वापरल्याने हृदयासंबंधित समस्या वाढल्या जाऊ शकतात. खरंतर, कुकिंग ऑइल पुन्हा वापरल्यास शरिरात फॅट्सचे प्रमाण वाढले जाते. यामुळे हृदयासंबंधित आजार होण्याचा धोका उद्भवू शकतो. मोठ्या आचेवर वापरलेले तेल पुन्हा गरम केल्यास त्यामधील फॅट्स हे ट्रान्स फॅट्समध्ये बदलले जातात, जे शरिरासाठी अत्यंत हानिकारक असतात. अशातच हार्ट अटॅकचा धोका वाढला जातो.
कॅन्सरचा धोका
एकदा वापरलेले तेल पुन्हा अन्नपदार्थ तयार करण्यासाठी घेतल्यास कॅन्सरचा धोका अधिक वाढला जाऊ शकतो. खरंतर, तेल वारंवार गरम केल्याने त्यामधून फ्री रेडिकल्स येऊ लागतात. याशिवाय अँटी ऑक्सिडेंट्सही संपले जातात. अशातच तेलात कॅन्सरा निमंत्रण देणारे तत्त्व निर्माण होऊ लागतात, जे अन्नपदार्थांच्या माध्यमातून शरिरात प्रवेश करतात. वापरलेले तेल पुन्हा वापरल्यास पोटाचा कॅन्सर, गॉल ब्लॅडर कॅन्सर किंवा लिव्हर कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
![Reheat Cooking Oil](https://gajawaja.in/wp-content/uploads/2025/02/Reheat-Cooking-Oil.png)
Reheat Cooking Oil
लठ्ठपणाची समस्या
आजकाल बहुतांशजण लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. कारण कुकिंग ऑइल पुन्हा रेसिपीसाठी वारल्यास लठ्ठपणाची समस्या मागे लागू शकते. याशिवाय तेलामुळे शरिरात ट्रान्स फॅट्स निर्माण होतात. यामुळे लठ्ठपणाची समस्या वाढली जाऊ शकतो. यामुळे वापरलेले तेल पुन्हा वापरण्यापासून दूर रहावे.
अॅसिड वाढले जाते
वारंवार गरम केलेले तेल जेवणात वापरल्यानंतर शरिरातील अॅसिडचे प्रमाण वाढले जातेय यामुळे पोट आणि घशासंबंधित समस्या उद्भवू शकतात. अॅसिडिटीची समस्या असल्यास जंक आणि डीप फ्राय फूड्सचे सेवन करणे टाळावे.
बॅड कोलेस्ट्रॉल वाढले जाते
तेलामधून काळा धूर किंवा घाण वास येत असल्यास आणि तेच तेल पुन्हा वापरल्यास शरिरात बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक वाढले जाऊ शकते. यामुळे हृदयासंबंधित समस्या, स्ट्रोक आणि छातीत दुखण्याची शक्यता वाढली जाते. यामुळे कोलेस्ट्रॉलच्या समस्येपासून दूर राहण्यासाठई कुकिंक ऑइलचा पुन्हा वापर करणे टाळा. (Reheat Cooking Oil)
=======================================================================================================
हेही वाचा :
Wheat Grass Juice निरोगी शरीरासाठी अमृततुल्य आहे गव्हांकुराचा रस
उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी चुकूनही खाऊ नका या गोष्टी, बिघडेल आरोग्य
=======================================================================================================
बीपीच्या रुग्णांसाठी धोकादायक
उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी तळणीचे तेल पुन्हा अन्नपदार्थांसाठी वापरणे टाळावे. यामधून फ्री अॅसिड आणि रेडिकल रिलीज होऊ लागतात. अशातच ब्लड प्रेशन वेगाने अनियंत्रित होऊ शकते.
सूजेची समस्या वाढली जाते
वापरलेले कुकिंग ऑइल अन्नपदार्थांसाठी घेतल्यास शरिराला सूज येण्याची समस्या वाढली जाऊ शकते. यामुळे अंग दुखी, ब्लॉटिंग आणि अॅसिडिटीची समस्या वाढते. वाढत्या वयासह शरिरात अल्जाइमरसारखे आजारही मागे लागू शकतात.