Home » एका खोलीतून सुरु झालेल्या Reebok च्या यशाचा प्रवास

एका खोलीतून सुरु झालेल्या Reebok च्या यशाचा प्रवास

by Team Gajawaja
0 comment
Reebok Success Story
Share

रीबॉक म्हणजेच स्पोर्ट्स असो किंवा फॅशन अथवा लाइफ स्टाइलचे विविध रंग, आता हा ब्रँन्ड एक स्टेटस सिंबल झाला आहे. तर जगभरातील यशस्वी शू ब्रँन्ड म्हणून प्रसिद्ध झालेल्या रीबॉकची भारतात ही लोकप्रियता खुप वाढली आहे. प्रत्येक वर्ग आणि वयातील लोक या ब्रँन्डला अगदी आवडीने खरेदी करण्यासह ते घालण्यास पसंद करतात. दशकांपासून हा ब्रँन्ड फुटवेअर निर्मात्यांच्या रेसमध्ये नेहमीच पुढे राहिला होता. आज रीबॉकची एकूण संपत्ती ११.२२ मिलियन डॉलर असून तो २८ देशांत विस्तारला आहे. (Reebok Success Story)

दरम्यान, कोणत्याही व्यवसायात यश मिळण्यापूर्वी त्यांना अनेक चढउतारांचा सामना करावा लागतो. हा व्यवसाय ही एका लहानश्या खोलीतून सुरु झाला होता. पण आता तो जगातील काही देशांच्या बड्या शोरुम पर्यंत पोहचला आहे. असे म्हटले जाते की, रीबॉकला ही नुकसानीचा सामना करावा लागला होता, परंतु या मुश्किल काळातून त्यांना पुन्हा वर येण्यासाठी खुप वेळ लागला नाही. आजच्या तारखेला रीबॉकचे यश हे प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहे.

कशी सुरुवात झाली?
जोसेप विलियम फोस्टर यांनी केवळ वयाच्या १४ व्या वर्षी याची सुरुवात केली. सन १८९५ मध्ये लंडन मधील सर्वाधिक पहिल्या टोकदार शूजचे डिझाइन केले. त्यानंतर १९०० मध्ये त्यांचा मुलगा ही यामध्ये सहभागी झाला. याआधी कंपनीचे नाव J.W.Foster and Sons असे ठेवले गेले होते. ज्यांनी डिझाइन स्पोर्ट्स शूज बनवले आणि ते अमेरिकेत खुप लोकप्रिय झाले. लोकांचा विश्वास मिळवणे सोप्पे नव्हते.

व्यवसायाची अनोखी रणनिती
रीबॉकने खरंतर फ्रीस्टाइल शूज सोबत सुरुवात केली होती. जे ९० च्या दशकापर्यंत ते एरोबिक्सच्या चलनासह पुढे जात होते. मात्र जसा जसा स्पोर्ट्स शुजचा आविष्कार झाला तेव्हा रीबॉक पंपने एथलेटिक शूज तयार करण्यास सुरुवात केली. १९९६ मध्ये रीबॉकने एलनेन इवरसन यांच्यासोबत ५० मिलियन डॉलरच्या एंडोर्समेंट करारावर स्वाक्षरी केली, जे बास्केटबॉलचे दुसरे सर्वाधि मोठे रनिंग शूज होते. (Reebok Success Story)

२८ पेक्षा अधिक देशांमध्ये व्यवसाय
रीबॉक ब्रँन्डचा व्यवसाय आजच्या तारखेला २८ पेक्षा अधिक देशांमध्ये विस्तारला गेला आहे. काही देशातील खेळाडूंनी या ब्रँन्डचे शूज आपल्या खेळादरम्यान वापरले. त्यामुळे ही ब्रँन्डची अधिक लोकप्रियता वाढली गेली. २००२ मध्ये रीबॉकने इतिहासात सर्वाधिक वेगाने विक्री केले जाणारे शूज म्हणून आपले नाव कोरले. कंपनीचे हेडक्वार्टर हे बोस्टन येथे आहे. मात्र एम्स्टर्डम, मॉन्ट्रियल,हाँगकाँग आणि मेक्सिको सिटीत कार्यालये आहेत.

हे देखील वाचा- Rolex च्या यशाची कथा

अब्जावधींच्या संपत्तीचे मालक
दरम्यान, २००५ मध्ये एडिडासने रीबॉकचे सर्व शेअर्सचे अधिग्रहण केले आणि २००५ मध्ये ३.८ बिलियन डॉलरचा करार पूर्ण केला. २०२१ ला ऑथेंटिक ब्रँन्ड ग्रुपने एडिडासकडून रीबॉकला २.५ बिलियन डॉलरमध्ये खरेदी केले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.