पुष्पा २ ने सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे. फक्त मूवी थिएटरचं नाही इनस्टा, फेसबूक, यूट्यूब आणि नाक्या नाक्यांवर या मूवीचीच चर्चा आहे. कोणी म्हणतंय उगाचच हाइप आहे, तर कोणी मूवीच भरभरून कौतुक करतं आहे. थोडक्यात, सगळीकडे पुष्पाचीच चर्चा आहे. पण आज आपण चर्चा करणार आहोत या मूवीच्या प्लॉटमधला महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे रक्तचंदन यावर. मूवीमध्ये या गोष्टीमुळेच एवढे सगळे राडे होतं असतात. मूवीमध्ये दाखवलं आहे तशीच वास्तवात सुद्धा या रक्तचंदनाची Smuggling होतं असते. रक्तचंदनासाठी Smugglers आणि स्पेशल टास्क फोर्समध्ये रक्तपात होतं असतो. त्यामुळे हे रक्तचंदन काय आहे? त्याला एवढी मागणी का आहे? हे जाणून घेऊया. (Red Sandalwood)
रक्तचंदनाची झाडं फक्त भारतातच आढळतात आणि तेही आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूला लागून असलेल्या चित्तूर, कडप्पा, कुरनूल आणि नेल्लोर या चार जिल्ह्यांत पसरलेल्या शेषाचलमच्या पर्वतरांगांमध्येच. कारण हे झाड उगवण्यासाठी माती, पाणी, हवा हे सगळंच मॅटर करतं. रक्तचंदनाला पांढऱ्या चंदनासारखा सुगंध नसतो. पण ते अनेक गोष्टींसाठी उपयोगात येतं त्यात औषधी गुणधर्मही असतात. पचनाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी रक्तचंदनाचा वापरं केला जातो. तसंच, रक्तचंदनामध्ये रक्त शुद्धीकरणाचे गुणधर्म देखील आहेत. याशिवाय, या लाकडाचा उपयोग वाईनमध्ये चव आणण्यासाठी देखील केला जातो. त्यामुळे या लाकडाची नॅशनल आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. पुष्पा मुवीमध्ये रक्तचंंदनाची तस्करी ही जपानमध्ये होते असं दाखवलं होतं. त्याच कारणही तसंच आहे जपानमध्ये या रक्तचंदनाला पूर्वी खरोखरच मागणी होती. (Social News)
जपानमध्ये आहेर म्हणून म्हणजेच लग्नाच्यावेळी गिफ्ट म्हणून शामिशेन हे वाद्य दिलं जायचं. हे पारंपरिक वाद्य बनवण्यासाठी रक्तचंदनाच्या लाकडाचा वापर करायचे. तर दुसरीकडे चीनमध्ये सुद्धा याची जबरदस्त मागणी आहे. चौदाव्या शतकापासून सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत चीन वर राज्य करणारे मिंग वंशाला रक्तचंदनपासून बनवलेली फर्निचर आणि सजावटीच्या वस्तु इतकं आवडत होतं की त्यांनी शक्य तितक्या ठिकाणाहून ते मागवलं होतं. चीनमध्ये रेड सँडलवूड म्युझियम आहे, ज्यामध्ये रक्तचंदनापासून बनवलेलं फर्निचर आणि शोभेच्या वस्तू आहेत. जपान आणि चीन शिवाय सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमीरात या देशांमध्ये रक्तचंदनाला अधिक मागणी आहे. भारतात १९६० च्या दशकात सुमारे ४ हजार टन चंदनाचं वार्षिक उत्पादन होतं. (Red Sandalwood)
========
हे देखील वाचा : मिठाला एक्सपायरी डेट असते का?
========
आता ते कमी होऊन ३०० टनच राहिलं आहे. २००० पर्यंत तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटका येथील जंगलांतच रक्तचंदन आढळत होतं. त्यानंतर रक्तचंदनाच उत्पादन वाढवण्यासाठी त्याची शेती करण्याची परवानगी सुद्धा दिली. फक्त रक्तचंदनाची शेती करण्यासाठी राज्य वन विभागाकडून Licence घ्याव लागतं. आणि ते विकण्यासाठी ५ ते ८% टॅक्स भरावा लागू शकतो. पण Licence काढून शेती करण्यापेक्षा या लाकडाची तस्करी करणं सोपं असल्यामुळे मोठ्याप्रमाणात या लाकडाची तस्करी होते. गेल्या अनेक वर्षांमध्ये तपास पथकांनी हजारो टन रक्तचंदन जप्त केलं आहे. हे तस्कर रक्तचंदनाची झाडं कापण्यासाठी गरीब शेतकरी आणि भटक्या जमातीतील लोकांचा वापर करतात. त्यांना प्रतीकिलो २० ते ४० रुपये मजूरी दिली जाते. पोलिसांसोबतच्या चकमकीत हेच लोकं मग मारले जातात. या रक्तचंदनाच्या तस्करीवरून राजकारण सुद्धा केलं जात. त्यामुळे रक्तचंदनाची तस्करी हे फक्त इकोलॉजिकल समस्या नसून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समस्यासुद्धा आहे. (Social News)