नॉर्थ कोरिया आपल्या हुकूमशाह किम जोंग उनच्या विविध कारनाम्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तर गेल्याच काही दिवसांपूर्वी अशी बातमी समोर आली होती की, त्याने दोन तरुणांना ते दक्षिण कोरियातील सिनेमे पहायचे म्हणून त्यांची खुलेआम हत्या केली होती. अशातच महिलांसाठी सुद्धा काही नियम आहेत. ते नियम अत्यंत विचित्र आणि हैराण करणारे आहे. खरंतर नॉर्थ कोरियातील महिला जरी सुंदर दिसत असल्या तरी ही त्यांना आपल्या सौंदर्यांबद्दल ही काही नियम या हुकूमशाहने घालून दिले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ओठांना लाल रंगाची लिपस्टिक लावण्यास बंदी. रिपोर्ट्सनुसार, किम जोंग सरकारने यासाठी ही नियम तयार केले आहेत. पण असे का? (Red Lipstick Banned)
रिपोर्ट्सनुसार, लाल रंगाची लिपस्टिकवर बंदी घालण्यामागील मुख्य कारण म्हणजे त्याचा रंग. सरकारचे असे मानणे आहे की, हा रंग कॅप्टिलिज्मला प्रोत्साहन देतो. त्यामुळेच महिलांनी आपल्या ओठांना या रंगाची लिपस्टिक लावू नये. असे ही म्हटले जाते की, देशात फक्त लाल लिपस्टिकच नव्हे तर अन्य काही प्रोडक्ट्सवर ही बंदी घातली गेली आहे. नॉर्थ कोरिया असा एक देश आहे, जेथे सामान्य लोकांच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यात सरकार अधिकच हस्तक्षेप करते.

या व्यतिरिक्त महिलांनी या रंगाचे मेकअप प्रोडक्ट्स ऐवजी फिक्या रंगाचा वापर करण्याचा इशारा दिला आहे. देशातील लोकांना लाल रंगाचे ब्युटी प्रोडक्ट्स लावून सुद्धा सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी घातली गेली आहे. त्याऐवजी फिक्या रंगाची लिपस्टिक लावावी असे सांगितले गेले आहे. तसेच महिलांनी या संदर्भातील चुक करु नये म्हणून देशात काही ठिकाण पेट्रोलिंगची सुद्धा व्यवस्था केली आहे. (Red Lipstick Banned)
फक्त चेहऱ्याला लावण्यात येणाऱ्या प्रोडक्ट्सवरच नव्हे तर केसांना कलर करण्यासंदर्भातील ही नियम आहेत. महिला आणि पुरुषांना आपल्या केसांना लाल रंग लावण्यास अजिबात परवानगी नाही. त्यापेक्षा त्यांनी फिक्या रंगाची शेड वापरावी असे सांगितले गेले आहे.
हे देखील वाचा- हुकूमशाहाचा हुकूम : मुलांची नावे बॉम्ब, तोफा आणि सॅटेलाईट ठेवा…
त्याचसोबत पुरुषांसाठी २८ प्रकारच्या हेअर स्टाइल्ससाठी परवानगी दिली गेली आहे. सरकारकडून हेअर स्टाइल्स निवडून दिली आहे तिच करावी. अन्यथा त्या व्यक्तीला तुरुंगात पाठवले जाते. या व्यतिरिक्त महिलेचे लग्न झाले असेल तर तिने आपल्या मर्जीनुसार आवडणारी हेअरस्टाइल करावी. पण एखाद्या महिलेचे लग्न झाले नसेल तर तिने आपले केस लहानच ठेवली पाहिजेत.