Home » हॅक झालेले तुमचे इंस्टाग्राम अकाउंट ‘अशा’ पद्धतीने करा रिकव्हर

हॅक झालेले तुमचे इंस्टाग्राम अकाउंट ‘अशा’ पद्धतीने करा रिकव्हर

by Team Gajawaja
0 comment
Recover Hack Instagram
Share

इंस्टाग्राम सोशल मीडियातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. लहान व्हिडिओ तयार करुन ते पोस्ट करणे किंवा स्टोरीज अपलोड करण्यासारखे विविध पर्याय आपल्याला तेथे मिळतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून आता हॅकर्स इंस्टाग्रामच्या माध्यमातून सुद्धा लोकांची फसवणूक करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. ऐवढेच नव्हे तर हॅकर्स तुमचे अकाउंट हॅक करत तुमचा खासगी डेटा घेऊ शकतातच पण तुम्हाला त्याचा एक्सेस ही मिळत नाही. या व्यतिरिक्त हॅकर्स तुमचा प्रोफाइल फोटो बदलू शकतात किंवा तुमच्या मित्र परिवाराला तुमच्या नावे इंस्टाग्रामवर मेसेज ही करु शकतात. (Recover Hack Instagram)

मात्र जर अन्य डिवाइसच्या माध्यमातून तुमच्या खात्यात अज्ञात लॉगिन नोटिफिकेशन मिळाल्यास तर समजून जा तुमचे अकाउंट हॅक झाले आहे. अशातच तातडीने इंस्टाग्रामवर जाऊन तेथे तुम्हाला पासवर्ड बदलावा लागणार आहे. पासवर्ड बदल्यानंतर कोणत्या पद्धतीने तुम्ही तुमचे इंस्टाग्रामचे अकाउंट रिकव्हर करु शकता त्याचबद्दल आम्ही तुम्हाल अधिक माहिती देणार आहोत.

Recover Hack Instagram
Recover Hack Instagram

पासवर्ड कसा बदलाल?
-तुमच्या मोबाईलवर इंस्टाग्राम अकाउंट सुरु करा
-खाली डाव्या बाजूला प्रोफाइल टॅबवर जा
-वरती डाव्या कोपऱ्यात मेन्यू हा ऑप्शन निवडा आणि सेटिंग्सवर क्लिक करा
-सेटिंग्समध्ये सिक्युरिटीवर जा
-येथेच पहिला पर्याय पासवर्ड असा दिसेल तो निवडा
-आता तुमचा सध्याचा पासवर्ड टाका आणि नवा पासवर्ड तुम्हाला दोन वेळा टाकावा लागणार आहे
-आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, टॉप राइटला चेकमार्क बटण दाबल्यानंतर तुमचे काम पूर्ण होईल

अॅक्टिव्ह सेशन मधून बाहेर या
-आपल्या मोबाईलवरील इंस्टाग्राम सुरु करा
-खाली डाव्या कोपऱ्यात आपल्या प्रोफाइलवर टॅबवर क्लिक करा
-आता वरती डाव्या कोपऱ्यात मेन्यू निवडा
-तेथे सेटिंग्स मध्ये जा आणि सिक्युरिटी निवडा
-आता लॉगिन अॅक्टिव्हिटीवर क्लिक करा
-येथून तुम्ही सर्व डिवाइस पाहू शकता ज्यामध्ये तुमचे अकाउंट लॉग इन केलेले आहे

थर्ड पार्टी अॅप काढून टाका
आपल्या मोबाईलवरील इंस्टाग्राम सुरु करा आणि वर दिल्या गेलेल्या सेटिंग्स आणि नंतर सिक्युरिटी मध्ये जा. येथून अॅप्स अॅन्ड वेबसाइटचा ऑप्शन निवडून त्यावर क्लिक करा. पुढील स्क्रिनवर तुम्ही विशेष अॅपचे एक्सेस हटवू शकता.(Recover Hack Instagram)

हे देखील वाचा- WhatsApp कडून घेतली जाते तुमच्या प्रायव्हसीची काळजी, ‘या’ सेटिंग्स वापरल्यास होईल फायदा

इंस्टाग्रामकडून सिक्युरिटी कोड मागा
इंस्टाग्राम सुरु केल्यानंतर लॉग-इन स्क्रिन दिसेल. येथून गेट हेल्प लॉगिंग इन ऑप्शन निवडा. आता तुमचे युजरनेम, ईमेल किंवा फोन क्रमांक द्या, त्यानंतर नीड मोर हेल्प निवडा आणि ऑन स्क्रिन नियमांच पालन करा. सेंड सिक्युरिटी कोडवर टॅप करा आणि आता इंस्टाग्रामद्वारे पाठवण्यात आलेला कोड द्या, त्यानंतर हॅक करण्यात आलेले खाते रिकव्हर करण्यासाठी आपली ओळख वेरिफिकेशन करण्यालाठी नियमांचे पालन करा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.