Home » चक्क चीनच्या टॉयलेट मध्ये वेळेची नोंद

चक्क चीनच्या टॉयलेट मध्ये वेळेची नोंद

by Team Gajawaja
0 comment
China Toilet Timer
Share

चीन हा देश असा आहे की, त्याचे गुप्तहेर जगभरातील सर्वच देशात असल्याचे सांगितले जाते. फारकाय चीनमध्ये राहणा-या नागरिकांचाही डाटा सरकारकडे उपलब्ध असतो. आता या सर्वात चीननं एक नवा विक्रमच केला आहे. चीनमध्ये चक्क सार्वजनिक टॉयलेटच्या बाहेर टायमर लावण्यात आले आहेत. यामुळे टॉयलेटला गेलेला व्यक्ती किती वेळ आत होता, याची नोंद ठेवण्यात येणार आहे. (China Toilet Timer)

चीनमध्ये अनेक ठिकाणी मोबाईल वापरास बंदी आहे. त्यामुळे नागरिक मोबाईलचा वापर करण्यासाठी काही साधनांचा उपयोग करतात. त्यामध्ये सार्वजिनक स्वच्छतागृहांचाही समावेश आहे. आता अशाच सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या बाहेर चीन सरकारनं टायमर लावले आहेत. आधीच चीनमधील सार्वजनिक स्वच्छतागृहांची व्यवस्था परदेशी पर्यटकांना गुंतागुंतीची वाटते.  त्यात त्यावर टायमर लावण्यात आल्यानं काही पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  तर काहींनी या टायमरचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत चीनवर टीका केली आहे.  

चीनमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांबाहेर टायमर लावण्यात आले आहेत. त्यातून आत असलेल्या व्यक्तीने किती वेळ टॉयलेटचा वापर केला आहे, याची नोंद ठेवण्यात येत आहे. यासंबंधीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, आणि चीन नेमका कसला डाटा जमा करत आहे, अशा प्रश्नांचा पूर सोशल मिडियावर आला आहे.  एऱवीही चीन त्यांच्या नागरिकांवर पाळत ठेवत असल्याची ओरड होते.  आता ती पाळत थेट टॉयलेटपर्यंत गेल्यानं चीनवर जाहीर टीका होत आहे.  या संदर्भात चीनच्या टॉयलेटमधून आलेली छायाचित्रे आश्चर्यचकित करणारी आहेत.(China Toilet Timer)

स्वच्छतागृहांच्या बाहेर लावलेल्या टायमर मधून आत गेलेल्या व्यक्तिची माहिती घेण्यात येणार आहे. तसेच  टॉयलेटमध्ये गेलेली आणि किती वेळ आत राहिली याची नोंद ठेवण्यात येत आहे.   हे शौचालय जेव्हा रिकामे असते त्याच्या बाहेर तेव्हा हिरवा दिवा चमकू लागतो आणि रिकामे असल्याचे लिहिले जाते. हे टायमर संबंधित व्यक्ती अन्य कुठल्या टॉयलेटमध्ये गेली आहे याचीही माहिती देणार आहेत. 

याशिवाय प्रत्येक टॉयलेटचा स्वतःचा डिजिटल टायमर असून आत गेलेल्या व्यक्तीने आतून दरवाजा बंद केल्यावर हा टायमर सुरु होतो आणि दरवाजा उघडल्यावर तो बंद होतो.  मात्र टायमर लावून स्वच्छतागृहाची कालमर्यादा निश्चित केली नसल्याचे या ठिकाणी असलेल्या सरकारी कर्मचा-यांनी सांगितले.  असे टायमर बहुतांशी पर्यटन स्थळांवरील स्वच्छतागृहांवर लावण्यात आले आहेत. (China Toilet Timer)

या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढत असल्याने टायमरची गरज असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.  त्यामुळे स्वच्छतागृहांसाठी रांगेत उभ्या असलेल्या अन्य पर्यटकांना किती वेळ रांगेत उभे रहावे लागेल, याचा अंदाज घेता येतो.  असे स्पष्टीकरण चीन सरकारतर्फे देण्यात आले तरी, स्वच्छतागृह वापरणा-या सर्वांचीच माहिती येथील मशीनमध्ये द्यावी लागत आहे.  त्यामुळेच चीन आता पर्यटकांचाही डाटा गोळा करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.  

चीनमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची मोठी संख्या आहे. तेथील स्वच्छतागृहात स्क्वॅट टॉयलेट्स आहेत.  चीनमधील मोठ्या शहरांमधील हॉटेल्स, विमानतळ,  सार्वजनिक बगिचे येथेही अशाच पद्धतीची व्यवस्था आहे.  आता नव्यानं उभारण्यात आलेल्या इमारतींमध्ये मानक पाश्चात्य शैलीतील शौचालये आहेत. मोठ्या शहरांमधील सार्वजनिक शौचालयांमध्ये सहसा किमान एक पाश्चात्य-शैलीतील शौचालयही असते.  तेथे पर्यटक आपल्या सोयीनुसार टॉयलेटची निवड करु शकतात. याशिवाय चीनमधील बहुतांश विमानतळांवर व्हीलचेअर वापरता येणारी शौचालये आहेत. मोठ्या शहरांमधील बहुतेक सार्वजनिक शौचालयांमध्ये देखील अपंग नागरिकांसाठी टॉयलेटमध्येही सुविधा आहेत. (China Toilet Timer)

============

हे देखील वाचा : कोट्यावधी Views मिळाल्यानंतरही युट्यूब करू शकतो तुमचा व्हिडीओ डिलीट, जाणून घ्या नियम

============

चीनमधील सार्वजनिक टॉयलेट बाहेर  “सार्वजनिक शौचालय” असा  मोठ्या अक्षरातील बोर्ड लिहिलेला असतो.  याशिवाय तेथील सार्वजनिक स्वच्छतागृहांना रेटिंग देण्याची पद्धत आहे. अर्थात तेथील बहुतांश टॉयलेटमध्ये टॉयलेट पेपरची सुविधा नसते आणि ज्या टॉयलेटना सर्वोच्च रेटींग आहे, त्यात ही सुविधा असते.  २०१५ पासून चीनमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांसबंधी एक मोहीम राबवण्यात आली, त्याला स्वच्छतागृहांची क्रांती असा उल्लेख करण्यात आला. (China Toilet Timer)

यातून २०१७ पर्यंत चीनमध्ये ६८००० एवढी सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्यात आली.   सध्या बीजिंगमध्ये चीनमधील सर्वात प्रगत टॉयलेट आहेत.  त्यात वैयक्तिक टीव्ही, चार्जिंग स्टेशन, वाय-फाय, एटीएम आणि आरामदायी संगीत यांचा समावेश आहे.  आता अशाच टॉयलेटच्या बाहेर टायमर लावण्याची वेळ चीनमधील सरकारवर आली आहे.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.