जर तुम्हाला नेटफ्लिक्सवरील शो पहायचे असतील तर त्यासाठी पैसे मोजावे लागतात अशातच त्यांच्या किंमती पाहून ही आपण काही वेळेस त्याचा रिचार्ज करण्यास नकार देतो. पण जर तुम्हाला फ्री मध्ये नेटफ्लिक्स पहायचे असेल तर काय करावे हेच आम्ही सांगणार आहोत. (Recharge Plans)
टेलीकॉम कंपनी रिलायन्स जिओ व्यतिरिक्त वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल आपल्या कंपन्यांना युजर्सच्या सुविधा लक्षात ठेवत काही असे प्लॅन ऑफर करतात ज्याचा सोबत युजर्सला ना केवळ डेट आणि अन्य बेनिफिट्स ही देतातच. पण अन्य ओटीटी चाहत्यांना नेटफ्लिक्सचा सुद्धा फायदा मिळतो. सोप्प्या भाषेत बोलायचे झाल्यास तुम्हाला केवळ एक रिचार्ज प्लॅन घ्यायचा आणि त्यानंतर नेटफ्लिक्ससाठी सब्सक्रिप्शनचे खरेदी करावे लागत नाही.
जिओ ३९९ प्लॅन
या प्लॅनसह ७५ जीबी डेटा दिला जातो. डेटा लिमिट संपल्यानंतर प्रति जीबी १० रुपयांचा चार्ज लागेल. त्याचसोबत अनलिमिडेट कॉलिंग आणि प्रतिदिन १०० एसएमएस मिळणार आहेत. या प्लॅनसह फ्री अॅमेझॉन प्राइमचे सब्सक्रिप्शन आणि नेटफ्लिक्सचा मोबाईल प्लॅन मिळतो.
जिओ ५९९ प्लॅन
या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण १०० जीबी हायस्पीड डेटासह अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि प्रति दिन १०० एसएमएस दिले जातात. हा एक फॅमिली प्लॅन असून त्यासोबत कंपनी अॅडशनल जिओ सिम देते. हा प्लॅन सुद्धा तुम्हाला अॅमेझॉन प्राइमसह नेटफ्लिक्सचा फायदा घेण्याची संधी देतो.
जिओ ७९९ प्लॅन
या प्लॅनमध्ये १५०जीबी डेटा मिळतो. त्याचसोबत २०० जीबी डेटा ऑफर केला जातो. यामध्ये दोन फॅमेली मेंबरला जोडता येते. या प्लॅनमध्ये डेली १०० एसएमएची सुविधा दिली जाते. यामध्ये नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन दिले जाते. तसेच एका वर्षासाठी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ पाहता येते. त्याचसोबत जिओ टीवी, जिओ सिक्युरिटी आणि अॅमेझॉन क्लाउटचे फ्री सब्सक्रिप्शन ही मिळते. (Recharge Plans)
एअरटेल ११९९ प्लॅन
एअरटेलच्या या प्लॅन मध्ये कंपनी प्रतिदिन १०० एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देते. खरंतर या कंपनीचा हा पोस्टपेड प्लॅन आहे. यासोबत १५० जीबी डेटा रोलओवरची सुविधा दिली जाते. या प्लॅनमध्ये कंपनी डिझनी प्लस हॉटस्टार, नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ पाहण्याची संधी देते.
हे देखील वाचा- एकेकाळी दिवाळखोर झाला होता सिनेजगतातील सर्वाधिक मोठा फिल्म स्टुडिओ ‘मार्वल’
एकूणच पाहता, रिलायन्स जिओकडून नेटफ्लिक्स पाहण्यासाठीच्या प्लॅनची किंमत ही एअरटेल प्लॅनच्या तुलनेत कमी किंमतीचे आहेत. त्याचसोबत Vi चा असा कोणताही प्लॅन नाही की, ज्यामध्ये तुम्हाला नेटफ्लिक्सचा फायदा मिळेल.