टेलिकॉम कंपन्याचा याआधी 30 दिवसांचा रिचार्ज प्लॅन असायचा. पण आता जवळजवळ सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी केवळ 28 दिवसांची वॅलिडिटी असणारा प्लॅन आणला आहे. पण असे का झाले आणि कंपन्या असे का करतायत? यामध्ये रिलायन्स जिओ ते एअरटेल, वोडाफोनचाही समावेश आहे. तर जाणून घेऊयात रिचार्ज प्लॅन केवळ 28 दिवसांचाच का असतो त्याबद्दल अधिक. (Recharge Plans)
टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना एक महिन्याचा वॅलिडिटी असणारा प्लॅन देतो. पण महिन्याभरात 30-31 दिवस जरी असले तरीही प्लॅन हा 28 दिवसांचाच असतो. 2 महिन्याचा 56 दिवसांचा, 3 महिन्याचा प्लॅन घेतल्यास तो 84 दिवसांच्या वॅलिडिटीसह दिला जातो. अशा प्रकारे प्रत्येक टेलिकॉम कंपन्या प्रत्येक प्लॅनमध्ये दिवस कमी करते. याचा थेट परिणाम ग्राहकावर होतो. जो कस्टमर वर्षात केवळ 12 वेळा करतो त्याला आता तोच 13 वेळा करावा लागत आहे.
खरंतर कंपन्यांना असे केल्याने खुप मोठा फायदा होतो. वर्षाच्या प्रत्येक महिन्यातील 2-3 दिवस कमी करत तो प्लॅन 30-31 दिवसांचा असल्याचे सांगते. म्हणजेच कायद्याने तर 12 महिन्याचे बेनिफिट मिळाले पाहिजे पण आता 13 वेळा रिचार्ज करण्यास भाग पाडून अधिक महिन्याचा फायदा घेत आहे.
सर्व टेलिकॉम कंपन्या आपल्या युजर्सला 28 दिवसांच्या हिशोबाने प्लॅन प्रोवाइड करते. पण बीएसएनएल एक अशी टेलिकॉम कंपनी आहे जी आपल्या युजर्सला आज सुद्धा 30 दिवसांची वॅलिडिटी असणारा प्लॅन ऑफर करते. म्हणजेच तु्म्ही बीएसएनएल युजर आहात तर 28 दिवस नव्हे तर संपूर्ण 30 दिवसांची वॅलिडिटी असणाऱ्या प्लॅनचा फायदा घेता येतो. (Recharge Plans)
हेही वाचा- Twitter वर आता 2 तासांपर्यंत व्हिडिओ अपलोड करता येणार
दरम्यान, बेव कॉन्फ्रेंन्स कंपनी झूम व्हिडिओ कम्युनिकेशनला पॅन इंडिया टेलिकॉमचा परवाना मिळाला आहे. याचसोबत जियो, एअरटे आणि विआयनंतर झूम चौथी टेलिकॉम कंपनी बनणार आहे. झूमची पॅरेंट कंपनी ZVC ने असे सांगितले की, परवाना मिळाल्यानंतर झूम ग्राहक आणि एंटरप्राइज कस्टमरला टेलिफोनच्या सेवा लवकरच मिळणार आहेत. तर अमेरिकेतील झूम कंपनी आता पर्यंत आपल्या ग्राहकांना वेबसाइट आणि अॅपच्या माध्यमातून वॉइस आणि व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगची सेवा देते. झूमने इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन प्रोवाइडर सोबत करार केला आहे. तसेच जवळजवळ 47 देशांमध्ये आपली टेलिकॉम सर्विस देत आहे.