Home » Uniform : माहिती आहे का….वकील काळा तर डॉक्टर पांढराच कोट का घालतात?

Uniform : माहिती आहे का….वकील काळा तर डॉक्टर पांढराच कोट का घालतात?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Uniform
Share

काही लोकांना ते कोणत्या फिल्डमध्ये किंवा काय काम करतात हे तोंडाने सांगायचे गरजच नसते. त्यांच्या युनिफॉर्म आपल्याला त्याबद्दल एका क्षणात सर्व सांगून जातो. आपण जर नीट लक्ष दिले तर आपल्या लक्षात येईल की, आपल्या आजूबाजूला विशिष्ट प्रोफेशनमध्ये असलेल्या व्यक्तींना खास ड्रेस कोड असतो. अशा व्यक्तींचा ड्रेस पाहूनच आपल्याला त्यांच्या प्रोफेशनची कल्पना येते किंवा ते कोणत्या फिल्डमध्ये काम करतात हे लगेच आपल्याला समजते. पोलीस, आर्मी, नेव्ही आदी अनेक यातलीच काही उदाहरणं आहेत. (Profession)

अशीच दोन प्रोफेशन म्हणजे डॉक्टर आणि वकील. आता या दोघांना असा खास युनिफॉर्म नसला तरी त्यांच्या ड्रेसवर घालण्यात येणाऱ्या कोटवरून लगेच आपल्याला ती व्यक्ती डॉक्टर आहे की वकील हे समजते. डॉक्टरांसाठी पांढरा आणि वकिलांसाठी काळा कोट असतो. मात्र आपण कधी हा विचारच करत नाही की, असे का असेल? का वकील काळा आणि डॉक्टर पांढरा कोट घालतात? कोणी याबद्दल ठरवले असेल? दोघांच्याही कपड्यांमागे फक्त फॅशन किंवा परंपरा नाही तर एक खोल विचार आणि इतिहास देखील आहे. आपल्याला नजरेला त्याची सवय होते म्हणून आपण देखील जास्त विचार करत नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला याच प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. (Uniform)

वकील काळे कोट का घालतात?
वकील त्यांच्या व्यावसायिक जीवनात काळा कोट वापरतात याचे मुख्य कारण म्हणजे, काळा रंग हा गांभीर्य, ​​शक्ती आणि आदराचे प्रतीक समजला जातो. वकिलांनी काळा कोट घालण्याची परंपरा खूपच जुनी आणि परदेशातून आपल्या देशात आली आहे. १७ व्या शतकात ब्रिटनचे राजा चार्ल्स दुसरा यांच्या निधनानंतर वकील आणि न्यायाधीशांनी शोक व्यक्त करण्यासाठी काळे कपडे घातले होते. मात्र पुढे हळूहळू ही एक परंपराच बनली. पुढे ही परंपरा भारतात देखील आली, आणि हीच पद्धत आजही वकिल आणि न्यायाधीश पाळताना दिसतात. (advocate Dress)

Uniform

काळा रंग हा न्याय, निष्पक्षता आणि गांभीर्य हे गुण दर्शवतो. त्यामुळे जेव्हा वकील काळा कोट घालून कोर्टात येतात तेव्हा त्यांचे त्या खटल्यांमध्ये असलेले गांभीर्य आणि प्रामाणिकपणाची भावना दर्शवतात. शिवाय हा रंग एक कणखर आणि शक्तिशाली व्यक्तिमत्त्व दर्शवतो. तो वकिलाच्या कामाचे गांभीर्य दर्शवतो. काळ्या रंगात कोणतेही डाग लवकर दिसत नाहीत, ज्यामुळे वकील व्यावसायिकदृष्ट्या परिपूर्ण दिसतात. हे एक प्रकारे त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रतिमा टिकवण्यास फायदेशीर ठरतात. (Marathi Top Stories)

डॉक्टर पांढरा कोट का घालतात?
पांढरा रंग हा पवित्रता, स्वच्छता आणि विश्वासाचे प्रतीक मानला जातो. १९ व्या शतकाच्या मध्यात, जेव्हा वैद्यकीय शास्त्र वेगाने विकसित होत होते, तेव्हा रुग्णालयांमध्ये स्वच्छतेकडे देखील कटाक्षाने लक्ष दिले जाऊ लागले. तेव्हा डॉक्टरांनी पांढरा कोट घालण्यास सुरुवात केली. पांढऱ्या रंगावर डाग लवकर दिसतात, त्यामुळे डॉक्टरांना स्वच्छता आणि स्वच्छतेची जाणीव कायम राहते. पांढरा कोट घालण्याचे अजून एक मोठे कारण म्हणजे विश्वास. (Marathi Latest News)

Uniform

पांढरा कोट घातलेल्या डॉक्टरकडे रुग्ण विश्वासाने जातो, कारण त्याला माहित असते की, तो त्याच्यावर योग्य उपचार करू शकेल. पांढऱ्या रंगाच्या प्रभावामुळे रुग्णांना मानसिकदृष्ट्याही शांती आणि सुरक्षितता जाणवते. पांढऱ्या रंगाचे अजून एक महत्वाचे वैशिट्य म्हणजे आरोग्य आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये स्वच्छतेची काळजी घेऊन पांढरा कोट घातला जातो. पांढरा कोट घातल्याने डॉक्टर व्यावसायिक आणि विश्वासार्ह दिसतात, ज्यामुळे रुग्णांचा विश्वास जिंकण्यास मदत होते.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.