Home » Narsimha : ज्या खांबातून नरसिंह प्रकटले, तो आहे चक्क पाकिस्तानात !

Narsimha : ज्या खांबातून नरसिंह प्रकटले, तो आहे चक्क पाकिस्तानात !

by Team Gajawaja
0 comment
Narsimha
Share

सध्या देशभरात Animated Movie ‘महावतार नरसिम्हा’ अक्षरश: धुमाकूळ घालतोय. अवघ्या ६ कोटींमध्ये बनलेला हा मुव्ही… पण बॉक्स ऑफिसवर याने तब्बल १७५ कोटी कमावलेत. आधीही पौराणिक कथा असलेले Animated मुव्हीज तसे बरेच गाजले… पण ‘महावतार नरसिम्हा’ने जो माईलस्टोन गाठलाय… ते आजपर्यंतच्या सिनेमा इतिहासात कधीच घडलं नव्हतं. आता विषय भगवान नरसिंह यांचा आहे, तर आपल्या सर्वांना त्यांची स्टोरी आधीही माहिती होती, आणि मुव्हीमधूनही पहायला मिळाली. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का ? की ज्या खांबातून भगवान नरसिंह प्रकटले होते, तो आज चक्क पाकिस्तानात आहे.  हो तुम्ही बरोबर ऐकलं आहे. तो मूळ खांब आज पाकिस्तानच्या मुलतानमध्ये आहे, ज्याचं प्राचीन नाव मुलस्थान होतं. पण आज तो खांब तिथे आहे का ? त्याठिकाणी नेमकं काय आहे ? याची संपूर्ण स्टोरी जाणून घेऊ. (Narsimha)

तर आपल्या सर्वात प्रिय अशा भक्त प्रल्हादासाठी स्वतः भगवान विष्णू यांनी नरसिंहाचा अवतार घेऊन ते खांबातून प्रकट झाले आणि राक्षस हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं. यानंतर स्वत: प्रल्हादाने ज्या ठिकाणी ते प्रकट झाले होते, त्याच ठिकाणी भगवान नरसिंह यांचं मंदिर बांधलं होतं. हे मंदिर सध्या पाकिस्तानमधल्या मुलतानमध्ये असून त्याला प्रल्हादपुरी मंदिर म्हटलं जातं, पण दुर्दैवाने ते सध्या चांगल्या स्थितीत नाही. हजारो वर्षांपासून इथे पूजा-अर्चा सुरु होती. पण तुम्हाला तर माहितीच असेल, भारतावर कितीतरी परकीय आक्रमण झालेत. आणि त्यात या मंदिराचीही नासधूस झाली. १३व्या शतकात याच मंदिराला जोडून सुफी बाबा बहाउद्दीन झकारिया यांचा दर्गा बांधण्यात आला. त्यानंतर १५व्या शतकात शेर शाह सुरीने या मंदिरावर आक्रमण केलं होतं आणि मंदिराचं प्रचंड नुकसान केलं. इथे मशीदसुद्धा बांधली. (Top Stories)

यानंतर १८४८ साली ब्रिटीशांनी मुल्तानला वेढा घातला होता. यावेळीही मंदिराच्या उरल्या-सुरल्या गोष्टींना हानी पोहोचली. मुळात मंदीराचं इतकं नुकसान झालं असतानाही हिंदू इथे पूजा करायचे. १८६१ साली इथल्या मंदिराचे महंत बाबा रामदास यांनी पब्लिक डोनेशनच्या माध्यमातून मंदिर पुन्हा बांधायला ११ हजार रुपये जमा केले होते. पण तेव्हा काहीच होऊ शकलं नाही. दुसरीकडे मंदिराला जोडूनच दर्गा आणि मशीद असल्यामुळे हिंदू-मुस्लीम यांच्यात सतत वाद होताच राहायचे. पुढे पाकिस्तान हा नवीन इस्लामिक राष्ट्र उदयास आला. पण मुलतान भागातल्या उरल्या सुरल्या हिंदुनी मंदिरांच्या अवशेषांची आणि त्या मूळ खांबाचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेतली. याच दरम्यान बाबा नारायण दास यांनी भगवान नरसिंह यांची मूळ मूर्ती हरिद्वारमध्ये आणली. कारण ती भारतातच सुरक्षित होती. १९९२ साली भारतात बाबरी मशीद पडली आणि त्याचे पडसाद पाकिस्तानातही उमटले. तिथेही मुस्लीम मॉबने मंदिरावर पुन्हा हल्ला केला आणि आज जी मंदिराची परिस्थिती आहे, ती तेव्हापासून अशीच आहे. (Narsimha)

असं म्हणतात की, होळी पेटवण्याची प्रथा इथूनच सुरु झाली. त्याची कथा तर तुम्हाला माहितच आहे. तर नरसिंहाच्या खांबाचा प्रश्न काही वर्षांपूर्वी पुण्याच्या अनंत जोशी यांनाही पडला होता. त्यांनी याचा शोध घ्यायचं ठरवलं. अनंत जोशी यांनी मुलतानमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट Match च्या निमित्ताने व्हिसा मिळवून त्या खांबापर्यंत पोहोचले. याची शक्य तितकी माहिती स्थानिकांकडून काढली आणि भारतात पोहोचवण्याचं काम केलं.

==============

हे देखील वाचा : Panar Leopard : ४०० मनुष्यबळी भारतातल्या सर्वात डेंजर बिबट्याचा दरारा!

==============

याच दरम्यान त्यांना आणखी एक गोष्ट कळली की, नरसिंह ज्या खांबातून प्रकटले तो सोन्याचा होता. पूर्वी पाकिस्तानातील या भागाला प्रल्हादपुरा असं नाव होतं. विष्णूचा वामन अवतारही याच भागात झाल्याचं त्यांना कळलं. महम्मद बिन कासीमने जेव्हा या मंदिरावर हल्ला चढवला होता त्यावेळी इथलं १३,२०० मण सोने लुटून नेल्याचा उल्लेखसुद्धा अनंत जोशी यांना मिळाला. यानंतर त्यांनी ” मुलस्थानाचा ध्यास ” हे एक पुस्तक लिहिलं, ज्यामध्ये पाकिस्तानातील या मंदिर आणि खांबाची सगळी माहिती आहे. (Narsimha)

भगवान नरसिंह आजही भारतात अनेकांचं कुलदैवत आहे. पण त्यांच्याशी संबंधित असलेलं त्यांचं हे मूळ मंदिर इतक्या वाईट अवस्थेत आहे. मध्यंतरी पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने सरकारला हे मंदिर तातडीने बांधण्याचे आदेश दिले होते. मात्र अजूनही त्यावर काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे पाकिस्तानात असलेला हा आपला धार्मिक वारसा नाहीसा होईल की पाकिस्तान किंवा भारत सरकार त्याचे अवशेष वाचवण्यासाठी पुढाकार घेईल, हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.