Home » आरबीआयने ‘या’ बँकांच्या खात्यातून पैसे काढण्यावर घातली बंदी

आरबीआयने ‘या’ बँकांच्या खात्यातून पैसे काढण्यावर घातली बंदी

by Team Gajawaja
0 comment
RBI
Share

भारतीय रिजर्व बँक म्हणजेच आरबीआयने (RBI) बिघडलेली आर्थिक स्थिती पाहता ५ सहकारी बँकांवर काही प्रकारच्या बंदी घातल्या आहेत. यामध्ये बँक खात्यातून पैसे काढण्यावर ही बंदी घातली गेली आहे. ही बंदी ६ महिन्यापर्यंत लागू असणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. त्यामुळे बँकेतून ग्राहकांना पैसे जमा करणे अथवा काढता येणार नाहीत. त्याचसोबत बँकेच्या पूर्व परवानगी शिवाय एखाद्याला नवे कर्ज देऊ किंवा घेऊ शकत नाहीत. या व्यतिरिक्त आपल्या कोणत्याही संपत्तीचे ट्रांसफर किंवा विक्री ही करु शकणार नाहीत.

आरबीआयने असे म्हटले की, या बंदीवर लक्ष ठेवले जाणार आहे म्हणजेच केंद्रीय बँक पुढे सुद्धा बँकेचे कामकाजाचा आढावा घेतल्यानंतरच बंदी हटवावी की नाही याचा निर्णय घेणार. बँकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून आल्यास तर बंदी हटवली जाणार आहे. आरबीआयने स्पष्ट केले आहे की, या बँकांचा परवाना रद्द करण्यात आलेला नाही.

पुढील बँकांवर घालण्यात आलीय बंदी
ज्या पाच बँकांवर आरबीआयने बंदी घातली आहे त्यामध्ये एचसीबीएल सहकारी बँक लखनऊ, आदर्श महिला नगरी सहकारी बँक मर्यादित औरंगाबाद, शिमशा सहकारी बँक नियमिथा मद्दुर, उरावकोंडा को-ऑपरेटिव टाउन बँक, उरावकोंडा आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक अकलुजचा समावेश आहे. यापैकी एचसीबीएल युपी, महाराष्ट्र, मद्दुर येथील ग्राहकांना सध्या लिक्विडिटीच्या कमीच्या कारणास्तव आपल्या खात्यातून पैसे काढू शकत नाहीत.

उरावकोंडा को-ऑपरेटिव टाउन बँक, शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकचे ग्राहक आता बँकेतून जमा केलेल्या पैशांमधून केवळ ५ हजार रुपयेच काढू शकतात. याचा अर्थ असा की, खात्यात किती ही रक्कम जमा असली तरीही केवळ ५ हजार रुपयेच तुम्हाला काढण्याची परवानगी असणार आहे. भाररतीय रिजर्व बँकेने या सर्व पाच बँकांना पात्र डिपॉझिट, जमा बीमा आणि क्रेडिट गॅरेंटी कॉर्पोरेशन मधून ५ लाखांपर्यंत जमा बीमाची रक्कम मिळवू शकतात. (RBI)

हे देखील वाचा- ५ हजार रुपयांत ५० लाखांचा बीमा, संपूर्ण परिवाराच्या सुरक्षिततेसाठी LIC चा खास प्लॅन

दरम्यान, नुकत्याच काही दिवसांपूर्वी आरबीआयकडून रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली. त्यामुळे ज्या लोकांना कर्ज घ्यायचे आहे अथवा फ्लोटिंग रेटने कर्ज घेतले आहे त्यांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे दिलेल्या काळात हप्ते देऊ शकतील की नाही याची शक्यता फार कमी वाटत आहे. अशातच जर हप्ता थकल्यास बँकेकेडून जो दंड लावतात तो बंद करण्याचा आरबीआयकडून विचार केला जात आहे. त्यामुळे वाढलेल्या ईएमआयमुळे त्रस्त झालेल्यांना दिलासा मिळू शकतो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.