हातापायावरील अनवॉन्टेड हेअर काढण्यासठी बहुतांवेळा महिला वॅक्सिंग किंवा शेविंग करतात. परंतु शेविंग एक सामान्य आणि सुरक्षित पद्धत असून याच्या माध्यमातून तुम्ही केस शेव करू शकता. मात्र शेविंग केल्यनंतर त्वचेवर लाल दाणे येऊ लागल्याची लक्षणे दिसून येतात. याकडे महिला दुर्लक्ष करतात. या लहान दाण्यांनाच वैद्यकिय भाषेत रेजर बम्प्स असे म्हटले जाते. रेजर बम्प्सची समस्या उन्हाळ्यात फार दिसून येते. खरंतर ही एक सामान्य समस्या आहे. परंतु यामुळे खाज आणि त्वचा लाल होण्याची समस्या होऊ शकते. अखेर हे रेजर बम्प्स का होतात आणि त्यापासून कसे दूर राहू शकता याच बद्दलच्या टिप्स आपण जाणून घेऊयात. (Razor Bumps)
रेजर बम्प्स म्हणजे काय
शेविंग केल्यानंतर रोमछिद्रांमध्ये इंफ्लेमेटरी रिअॅक्शन म्हणजेच सूज आल्यानंतर होणाऱ्या रिअॅक्शनमुळे रेजर बम्प्सची समस्या उद्भवते. काहीवेळेस केस वाढतात तेव्हा हात आणि पायांवर लहान दाण्याच्या रुपात ते दिसतात. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. जी काही घरगुती उपायांनी दूर करता येऊ शकते.
एलोवेरा
एलोवेरा जेलएक नैसर्गिक हिलर असून जे त्वचेसंबंधित काही समस्या कमी करण्यास मदत करते. हे त्वचेवर येणाऱ्या सूजेपासून आराम देते. रेजर बम्प्सची समस्या झाल्यास दररोज 2-3 वेळा लावल्यास यापासून दूर राहता येते.
कोकोनोट ऑइल
कोकोनट ऑइल मध्ये त्वचेला आराम देणारे गुण असतात. जे रेजर बम्प्सच्या समस्येवर फायदेशीर ठरते. याव्यतिरिक्त त्वचेत ओलसरपणा राखण्यास ही मदत करते. कोकोनट ऑइलचा वापर दररोज केल्याने त्वचेला चमक येते.
टी ट्री ऑइल
टी ट्री ऑइलमध्ये अँन्टी बॅक्टेरियल गुण असतात. जे बॅक्टेरियाच्या विकासाला रोखतात. टी ट्री ऑइलमध्ये असलेल्या गुणांमुळे त्वचेवर आलेले दाणे आणि खाज कमी होते. हे तेल अतिशय स्ट्राँन्ग असते. त्यामुळे ते त्वचेवर डायरेक्ट वापरू नये. त्याला कोकोनट किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिक्स करूनच वापरावे. (Razor Bumps)
शेविंग करताना पुढील काही गोष्टींची काळजी घ्या
-शेव करताना सावधगिरी बाळणे अत्यंत गरजेचे आहे
-शेव करण्यापूर्वी त्वचा स्वच्छ करण्यास विसरू नका
-शेव करताना फोमिंग क्रिमचा वापर करावा जेणेकरून रॅशेज येणार नाहीत
-फोमिंग क्रिमचा वापर केल्याने त्वचेवर होणारी जळजळ दूर केली जाऊ शकते.
-हातापायांवर शेव केल्यानंतर ते व्यवस्थितीत धुवावेत
-शेव केल्यानंतर मॉइश्चराइजर जरूर लावा
-जर त्वचेवर दाणे अथवा खाज याची लक्षणे दिसून येत असतील तर बर्फाने मसाज करा
हेही वाचा- त्वचेला नुकसान पोहचवू शकतात तुमच्या ‘या’ चुका