Raw Turmeric Tea Benefits : भारतीय स्वयंपाकघरात हळद एक मसाला म्हणून नव्हे तर औषधाप्रमाणे काम करते. यामख्ये करक्यूमिन गुणधर्म असतात, जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. याशिवाय हळदीत अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म असल्याने तुमची रोगप्रतिराक शक्ती वाढण्यास मदत होते. याशिवाय मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यासही मदत होते. कच्च्या हळदीचे तुम्हाला फायदा अशावेळी होईल जेव्हा याचे सेवन तुम्ही योग्य प्रमाणे कराल. जाणून घेऊया कच्ची हळद डाएटमध्ये कशा पद्धतीने वापरली पाहिजे याबद्दल अधिक….
कच्च्या हळदीची चहा
कच्च्या हळदीची चहा तुम्ही पिऊ शकता. यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट, करक्यूमिन, अँटी इंफ्लेमेंटरी गुणधर्म असतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही हळदीच्या चहाचे सेवन करू शकता.
कच्च्या हळदीची चहा पिण्याचे फायदे
-खाल्लेले अन्नपदार्थ शरिरात व्यवस्थितीत पचण्यासाठी तुम्ही हळदीची चहा पिऊ शकता. याशिवाय कच्ची हळद पचनक्रियेतील फॅट्स ब्रेक करुन शरिराला अधिक पोषण तत्त्वे शोषण करण्यास मदत करतात.
-मधुमेहाच्या रुग्णांसाठी कच्च्या हळदीची चहा पिणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. कारण यामुळे शरिरात इंसुलिनची सेंसिटिव्हिटी वाढली जाते.
-वजन कमी करण्यासाठी तुम्ही हळदीची चहा पिऊ शकता. कच्च्या हळदीत बर्निंग एंजाइम असतात जे पोटातील अतिरिक्त फॅट बर्न करण्याचे काम करतात.
-कच्च्या हळदीचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावरील अँटी-एजिंगच्या समस्येपासून दूर राहू शकता. (Raw Turmeric Tea Benefits)
-कच्च्या हळदीची चहा प्यायल्याने जखम लवकरच बरी होण्यास मदत होते. याशिवाय चेहऱ्यावरील डाग कमी होण्यासही मदत होते.
कच्च्या हळदीचे नुकसान
-खरंतर कच्च्या हळदीमुळे कोणतेही नुकसान होत नाही. पण काहींना कच्च्या हळदीच्या अत्याधिक सेवनाने किडनीला नुकसान पोहोचू शकते.
-करक्यूमिन शरिरात अधिक गेल्यास हृदयाचे ठोके वेगाने होतात. ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते. पोट बिघडणे, घश्यात इंन्फेक्शन आणि केस गळतीची समस्या निर्माण होऊ शकते.
-प्रेग्नेंसीदरम्यान कच्च्या हळदीचे सेवन करू नये.
टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.