Raw Milk Benefits : त्वचा हेल्दी आणि ग्लोइंग होण्यासाठी काही प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. याशिवाय काही घरगुती उपायही केले जातात. यामध्ये कच्च्या दूधाचा देखील समावेश आहे. कच्चे दूध आरोग्यासह त्वचेसाठी फायदेशीर असते. यामुळे त्वचेला ग्लो येण्यास मदत होते. दूधात व्हिटॅमिन ए, डी, बी 12, कॅल्शियम, लॅक्टिक अॅसिड आणि प्रोटीन असतात, जे त्वचेला पोषण देण्यास मदत करतात. यामुळे कच्चे दूध चेहऱ्याला लावल्याने काय होते आणि तोटे काय जाणून घेऊया.
कच्च्या दूधाचे फायदे
त्वचा हाइड्रेट राहते
कच्चे दूध त्वचेमध्ये ओलसरपणा टिकवून ठेवते. कोरड्या त्वचेची समस्या असणाऱ्यांनी कच्चे दूध त्वचेला लावू शकता. हे नॅच्युरल मॉइश्चराइझरप्रमाणे काम करते. यामुळे त्वचा मऊसर आणि कोमल होण्यास मदत होते.
त्वचा स्वच्छ राहते
कच्च्या दूधामधील लॅक्टिक अॅसिड डेड स्किन सेल्स हटवण्यास मदत करतात. हे स्क्रब प्रमाणे मदत करते. यामुळे त्वचेवर जमा झालेली धूळ-माती हटवण्यास मदत होते. अशातच त्वचा स्वच्छ दिसते.
त्वचेला ग्लो येतो
कच्च्या दूधामुळे त्वचेवरील डाग, टॅनिंग दूर होते. याचा दररोज वापर केल्याने त्वचेवर नॅच्युरल ग्लो येतो. खासकरुन अशा व्यक्ती ज्यांची त्वचा कोरडी असते.
कच्च्या दूधाचे तोटे
अॅलर्जीचा धोका
काहींना दूधाची अॅलर्जी असू शकते. यामुळे त्वचेवर लाल चट्टे, खाज किंवा दाणे येऊ शकतात. अशातच कच्चे दूध लावण्यापूर्वी त्वचेवर पॅच टेस्ट करावी. याशिवाय त्वचा तेलकट असल्यास त्यामधून अत्याधिक तेल बाहेर पडू शकते. यामुळे त्वचेवर ब्लॅकहेड्स आणि पिंपल्सची समस्या वाढली जाऊ शकते. काहीवेळेस त्वचेवर इन्फेक्शनही होण्याचा धोका वाढला जातो.
=====================================================================================================
हेही वाचा :
उन्हाळ्यात चांदीची काळी पडलेली ज्वेलरी अशी करा स्वच्छ, वाचा ट्रिक्स
Urine Therapy : सगळीकडे चर्चेत असलेली युरीन थेरपी म्हणजे काय?
======================================================================================================
त्वचेवर कच्चे दूध लावत असाल तर आठवड्यातून दोनदाच वापर करावा. कारण याचा अत्याधिक वापर केल्याने त्वचेसंबंधित समस्या होऊ शकते. कॉटनच्या मदतीने कच्चे दूध त्वचेवर लावू शकता. याशिवाय कच्च्या दूधात मध, बेसन आणि हळद मिक्स करुन त्याचा फेसपॅक तयार करू शकता.