Raw Milk Benefits for Skin : महागडे ब्युटी प्रोडक्ट्स किंवा ट्रिटमेंट करुनही चेहऱ्यावर हवा तसा ग्लो येत नाही. यासाठी बहुतांश महिला घरगुती उपायाचा अवलंब करतात. अशातच रात्री झोपण्यापूर्वी स्किन केअर रुटीनमध्ये कच्च्या दूधाचा वापर करू शकता. यामुळे त्वचा चमकदार होण्यासह हेल्दी राहण्यास मदत होते. कच्च्या दूधामध्ये लॅक्टिक अॅसिड, व्हिटॅमिन आणि मिनिरल्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे त्वचा उजळ होते. रात्री झोपण्यापूर्वी कच्च्या दूधाने चेहरा स्वच्छ केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. याबद्दलच पुढे सविसत्र जाणून घेऊया…
त्वचेची खोलवर स्वच्छता
कच्च्या दूधामध्ये असणारे लॅक्टिक अॅसिड हलक्या एक्सफोलिएटरप्रमाणे काम करते. यामुळे चेहऱ्यावरील घाण, अतिरिक्त तेल किंवा डेड स्किन दूर होण्यास मदत होते. याशिवाय त्चचेवरील पोर्स उघडणे, पिंपल्स किंवा ब्लॅकहेड्सची समस्या होत नाही.
नैसर्गिक ओलसरपणा येतो
कच्च्या दूधाच्या वापरामुळे त्वचा नैसर्गिक रुपात ओलसर राहण्यास मदत होते. याशिवाय त्वचेचे आरोग्य राखले जाते. कच्च्या दूधाचे चेहरा रात्री स्वच्छ केल्यास सकाळी उठल्यानंतर चेहऱ्याची त्वचा मऊसर आणि फ्रेश वाटते. कोरड्या त्वचेसाठी कच्चे दूध फायदेशीर ठरते.
त्वचेला ग्लो येतो
कच्च्या दूधामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असल्याने त्वचाला नैसर्गिक रुपात ग्लो आणण्यास मदत करते. यामुळे चेहऱ्यावरील डार्क स्पॉट्स कमी होण्यासह त्वचा चमकदार दिसते.
अँटी-एजिंग गुण
कच्च्या दूधामध्ये लॅक्टिक अॅसिड असल्याने कोलेजनचे प्रोडक्शन होण्यास मदत होते. यामुळे त्वचा घट्ट आणि मऊसर होते. याचा दररोज वापर केल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि फाइन लाइन्स कमी होऊ शकतात. यामुळे वृद्धत्वाच्या समस्येची लक्षणे दिसत नाहीत.
डाग दूर होतात
त्वचेवर धूळ, माती आणि घाण चिकटून राहिल्यास त्वचेचे नुकसान होतो. पण कच्च्या दूधाने चेहरा स्वच्छ केल्यास त्वचेवरील डाग दूर होत त्वचा उजळ होते. (Raw Milk Benefits for Skin)
असा करा वापर
कच्च्या दूधाच्या मदतीने चेहरा स्वच्छ धुण्यासाठी सर्वप्रथम वाटीमध्ये कच्चे दूध घ्या. यामध्ये कॉटन बॉल बुडवून चेहऱ्यावर लावा. 5-10 मिनिटांनी चेहरा हलक्या कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
आणखी वाचा :
Tea Bag टी बॅग वापरून मिळवा चमकदार त्वचा आणि उत्तम सौंदर्य
Curd Benefits : हिवाळ्यामध्ये दही खाणे योग्य की अयोग्य? घ्या जाणून