लसूण हा भारतीय आहार पद्धतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. लसणाच्या वापराने जेवणातील पोषण आणि चव दोन्ही वाढते. जेवणाबद्दल बोलायचे झाले तर लसूण चटणी, लसूण लोणचे आणि भाज्यांमध्ये चव म्हणून लसूणचा वापर हे त्याचे सेवन करण्याचे उत्तम मार्ग आहेत. लसणाचा वापर जेवणात योग्य प्रमाणात केला पाहिजे कारण जास्त लसूण खाल्ल्याने फायदे आणि तोटे दोन्ही होऊ शकतात. लसूण हा भारतीय आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. लसणाच्या वापराने अन्नातील पोषण आणि चव दोन्ही वाढते.लसूण हा भारतीय आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. लसणाच्या वापराने अन्नातील पोषण आणि चव दोन्ही वाढते. जेवणाबद्दल बोलायचे झाले तर लसूण चटणी, लसूण लोणचे आणि भाज्यांमध्ये चव म्हणून लसूणचा वापर हे त्याचे सेवन करण्याचे उत्तम मार्ग आहेत. लसणाचा आहारात योग्य वापर केला तर त्याने अनेक फायदे आहेत. अनेकदा डॉक्टर ही रोज कच्चा लसूण खाण्याचा सल्ला देतात. अर्थात त्यामागे कारण ही तशीच आहेत. आजच्या लेखात आपण कच्चा लसूण खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.(Raw Garlic Health Benefits)

कच्चा लसूण खाण्याचे फायदे:
– लसूण महिलांसाठी देखील खूप फायदेशीर आहे कारण ते आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यास उपयुक्त आहे. काही महिलांना लसणाचा वास आवडत नाही, पण लसणाचे फायदे अनेक आहेत. लसूण खाल्ल्याने मेटाबॉलिझमची क्रिया नियंत्रित ठेवता येते. याशिवाय वजन कमी करण्यास, हृदय निरोगी ठेवण्यास आणि कर्करोगापासून बचाव करण्यास मदत होते.
– जो कोणी रात्री झोपताना कच्चा लसूण खातो त्याचे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. लसूण शरीरातील हानिकारक कोलेस्टेरॉलची (एलडीएल) पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.(Raw Garlic Health Benefits)

– लसणाच्या पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांचा आपल्या हृदयाला सर्वाधिक फायदा होतो. लसणाचे नियमित सेवन केल्याने रक्ताभिसरण चांगले होण्यास मदत होते. लसणाच्या नियमित सेवनाने आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलदेखील नियंत्रित राहते, ज्यामुळे ते हृदय चांगले कार्य करते. जर आपण लसणाचे नियमित सेवन केले तर आपल्या रक्तवाहिन्या कडक होत नाहीत आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो. जर तुम्ही हृदयाशी संबंधित विकारांशी झगडत असाल तर दररोज सकाळी नियमितपणे लसूण खा.
– जर तुम्हाला सर्दी,पडसे , तापाचा प्रचंड त्रास होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी कच्च्या लसूणाचा सेवन करा. असे केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि त्याचबरोबर ताप, सर्दी इत्यादींपासून आराम मिळतो. लसणाचा अर्क रात्री झोपण्यापूर्वीही वापरता येतो, यामुळे तापही कमी होतो.
===========================
हे देखील वाचा: Benefits of Eating Khajoor: खजूर खाल्ल्याने होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे
===========================
– लसूणमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात ज्यामुळे ते पौष्टिकदृष्ट्या महत्वाचे बनते. लसूणच्या औषधी फायद्यांमुळे याचा बराच काळापासून वैद्यकीय सेवेत देखील वापर केला जात आहे. लसणामध्ये असलेल्या अँटी-बायोटिक घटकांमुळे पहिल्या महायुद्धाच्या काळात जखमा भरून काढण्यासाठी अँटी-सेप्टिक म्हणून याचा वापर केला जात होता असे म्हटले जाते.
– कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून बचाव करण्यासाठी ही लसणाचा वापर प्रभावी ठरला आहे. लसणाचे नियमित सेवन केल्याने कॅन्सरच्या गाठींमध्ये रक्त जाण्यापासून बचाव होतो आणि त्यामुळे विविध प्रकारचे कॅन्सर रोखण्यासाठी फायदेशीर ठरते. तज्ञांच्या मते, लसूणमध्ये आढळणारे एलिसिन कर्करोगविरोधी एजंट म्हणून कार्य करते आणि विविध प्रकारचे संक्रमण रोखण्यासाठी देखील प्रभावी आहे.
(डिस्क्लेमर: वरील सर्व लेख केवळ माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे. कोणताही उपाय करण्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)