Home » कच्च्या केळ्याचे आरोग्यदायी फायदे, घ्या जाणून

कच्च्या केळ्याचे आरोग्यदायी फायदे, घ्या जाणून

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासह वजन कमी करण्यासाठी कच्च्या केळ्याचा फायदा होते. फायबरयुक्त कच्च्या केळ्यामुळे पचनक्रियाही सुधारली जाते. अशातच कच्चा केळ्याचे काही फायदे जाणून घेऊया.

by Team Gajawaja
0 comment
raw banana benefits
Share

Raw Banana Benefits : केळी खाणे प्रत्येकालाच आवडते. यामुळे आरोग्याला काही प्रकारे फायदा होतो. पण तुम्हाला माहितेय का, कच्चे केळ खाण्याचा फायदा काय होतो? खरंतर, कच्च्या केळ्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहणे ते वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. फायबरयुक्त कच्च्या केळ्यामुळे पचक्रियाही सुधारली जाते. पोटॅशियमसारख्या महत्वपूर्ण पोषण तत्त्वांनी समृद्ध असणाऱ्या कच्च्या केळ्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

शरिरातील गुड बॅक्टेरिया वाढण्यास मदत
कच्च्या केळ्यामध्ये प्रतिरोधी स्टार्च भरपूर प्रमाणात असतात. जे एक प्रकारचे कार्बोहाइड्रेट असून लहान आतड्यामध्ये पचले जात नाही. त्याएवजी मोठ्या आतड्यामध्ये पोहोचले जाते. येथे गेल्यानंतर ते प्रीबायोटिकच्या रुपात कार्य करते. याशिवाय शरिरात यामुळे गुड बॅक्टेरिया तयार होतात.

रक्त शर्करेवर नियंत्रण
कच्च्या केळ्यामध्ये असलेल्या प्रतिरोधी स्टार्चमुळे रक्त शर्कराचा स्तर नियंत्रित करण्यात मदत होते. हा शर्करा अवशोषणाची प्रक्रिया स्लो करते. रक्तातील शर्कराचा स्तर नियंत्रणात राहण्यासाठीही कच्ची केळी मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांनी कच्च्या केळ्याचे सेवन केल्याने रक्तातील शर्कराचा स्तर नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

पचनक्रिया सुधारली जाते
कच्च्या केळ्यात फायबरचे प्रमाण अधिक असते. यामुळे पचनक्रिया सुधारली जाते. फायबरमुळे शौचास सुलभ होते.

पोषण तत्त्वे
कच्च्या केळ्यात पोषण तत्त्वे कमी प्रमाणात असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमि बी-6, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारकी आवश्यक व्हिटॅमिन आणि खनिजे असतात. कच्च्या केळ्यामधील पोषण तत्त्वांमुळे स्नायूंचे आरोग्य राखले जाते. (Raw Banana Benefits)

वजन नियंत्रणात राहते
कच्च्या केळ्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत राहते. आहारात प्रतिरोधी स्टार्चयुक्त कच्च्या केळ्याचा वापर केल्याचा आरोग्याला फायदा होऊ शकते.


आणखी वाचा :
विड्याच्या पानाचे आरोग्यदायी फायदे
तुपाची कॉफी सेवनाचे चमत्कारिक फायदे

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.