Home » अश्विन अन्नाची रिटायरमेंट !

अश्विन अन्नाची रिटायरमेंट !

by Team Gajawaja
0 comment
Ravichandran Ashwin
Share

भारताला सर्वात उत्तम बोलर्स साउथ इंडियानेच दिले आहेत. मग ते एरापल्ली प्रसन्ना असो, गुंडप्पा विश्वनाथ असो, अनिल कुंबळे असो, जवागल श्रीनाथ असो किंवा वेंकटेश प्रसाद असो, सर्वांनीच आपल्या बॉलिंगने धुमाकूळ घातला आहे. पण यात एक असं नावही आहे, जो अनिल कुंबळे यांची बरोबरी करू शकला असता, आपल्या फिरकीने जसे त्याने विकेट्स घेतले, तसेच आपल्या Bat ने सेन्च्युरीज देखील ठोकल्या. त्याचं नाव रविचंद्रन अश्विन ! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या तिसऱ्या टेस्टमध्ये अश्विनने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली आहे. त्यामुळे सगळेच क्रिकेटप्रेमी अवाक झाले आहेत. भारताच्या क्रिकेटमध्ये एक वेगळ स्थान निर्माण करणाऱ्या याच द ग्रेट Ash अन्नाचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. (Ravichandran Ashwin)

रविचंद्रन अश्विन जन्म १७ सप्टेंबर १९८६, चेन्नई वडील क्लब क्रिकेट खेळायचे आणि फास्ट बॉलर होते. वडिलांचं बघून तो सुद्धा वयाच्या नवव्या वर्षी क्रिकेट खेळायला लागला. YMCA मध्ये तो क्रिकेटची ट्रेनिंग घ्यायला लागला. ऑफ स्पिनर व्हायच्या आधी तो मिडीयम पेसर होता. मात्र नंतर त्याने आपलं पूर्ण लक्ष ऑफ स्पिनकडेच केंद्रित केलं. लहानपणीच आपल्या फिरकीची जादू त्याने दाखवली आणि इंडियन अंडर-१७ मध्ये त्याची निवड झाली. अनेकांना माहित नाही की, त्याने इंजिनिअरीगचं शिक्षण घेतलं होत. मात्र क्रिकेट हाच आपल्या आयुष्याचा दुवा आहे हे ठरवून त्याने क्रिकेट Continue ठेवलं. २००६ साली वयाच्या २० व्या वर्षी त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये डेब्यू केलं. हरयाणा वि. तामिळनाडू हा त्याचा पहिला सामना यानंतर तो लिस्ट ए Matches खेळू लागला. यामध्ये जबरदस्त कामगिरी केल्यामुळे इंडियन टीमची नजर त्यांच्याकडे वळली. पण त्याच्या आधी त्याला साथ लाभली ती म्हणजे IPL ची ! २००९ साली अश्विनला चेन्नई सुपर किंग्सने १२ लाखांना विकत घेतलं आणि इंडियन टीममध्ये जाण्याचा एक Platform त्याला मिळाला. (Latest Updates)

२०१० साली आयपीएलमध्ये त्याने १३ विकेट्स घेतले. त्याच्या ऑफ स्पिनची सगळीकडे चर्चा सुरु झाली. कारण हरभजन सिंग सोडून एकही उमदा ऑफ स्पिनर त्यावेळी भारताकडे नव्हता. त्यामुळे अश्विनला संधी द्यावी, असा निर्णय बीसीसीआय सिलेक्टर्सनी घेतला. ५ जून २०१० ला त्याने इंडियन टीममध्ये आपलं डेब्यू केलं. श्रीलंके विरुद्धचा त्याचा पहिला सामना यानंतर पुढच्या 7 दिवसात त्याने टी20 मध्ये डेब्यू केलं आणि २०११ ला टेस्टमध्ये त्याला संधी मिळाली. आणि अशाप्रकारे वर्षभरात तो तिन्ही Format मध्ये आला आणि आपल्या जादुई फिरकीने सगळ्यांचा फेवरेट झाला. आपल्या संपूर्ण क्रिकेट करिअरमध्ये आपला फॉर्म त्याने कधीच ढळू दिला नाही. यामुळेच भारताच्या महान क्रिकेटपटूच्या यादीत त्याने आपलं नाव मिळवलं. २०११ साली अश्विन वर्ल्ड कप विनिंग स्क्वडचा पार्ट देखील होता. यानंतर २०१३ च्या आयसीसी Champions ट्रॉफीमध्येही इंग्लंडविरुद्ध अखेरचा ओव्हर डिफेंड करत भारताला विजय मिळवून दिला. दोनवेळा तो भारताच्या आशिया कप विनिंग टीमचाही भाग होता. अश्विनची खासियत म्हणजे फ्लाईट बॉल, ऑफ ब्रेक बॉल, Carrom बॉल आणि आर्म बॉल ! आपल्या टी२० लीग क्रिकेटमध्ये तो चार वेळा Champion ठरला. दोनदा आयपीएलमध्ये आणि दोनदा Champions लीगमध्ये ! (Ravichandran Ashwin)

========

हे देखील वाचा : सिक्सर किंग युवराज सिंगचा प्रेरणादायी प्रवास

========

आता अश्विनच्या एकंदर रेकॉर्डसकडे पाहुया. अश्विनने १०५ टेस्टमध्ये ५३७ विकेट्स, वनडेमध्ये ११६ Match मध्ये १५६ विकेट्स आणि टी२० मध्ये ६५ Match मध्ये ७२ विकेट्स घेतले आहेत. एकूण ७६५ विकेट्ससोबत अश्विन हा अनिल कुंबळे यांच्यापाठोपाठ दुसरा सर्वात जास्त विकेट्स घेणारा भारतीय आहे. महत्त्वाचं म्हणजे टेस्टमध्ये त्याने ६ सेन्च्युरीज आणि १४ हाफ सेंच्युरी ठोकल्या होत्या. ज्याने हे सिद्ध झालं की तो एक उमदा All Rounder पण होता. टेस्टमध्ये ३७ वेळा त्याने ५ विकेट्सकेलं आणि ८ वेळा १० विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला होता. वर्ल्ड टेस्ट Champion  शिपमध्ये १०० विकेट्स घेणारा तो पहिला बॉलर आहे. सर्वात जास्त फायफर्स म्हणजे एकाच Match मध्ये पाच विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वात Fast ५०० विकेट्स घेणारा तो दुसरा बॉलर आहे. सर्वात जास्त LBW Out करण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ३०२ विकेट्स LBW च घेतले होते. एकाच टेस्ट Match मध्ये सेंच्युरी आणि पाच विकेट्स घेणारा LBW एकमेव भारतीय बॉलर आहे. Ashwin च्या रेकॉर्डची एक अख्खी List आहे. आईसीसीचे अनेक पुरस्कारदेखील त्याला मिळाले होते. इतक्या रेकॉर्ड्स, विकेट्स, Awards आणि प्रेमाचा मानकरी अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाला. अश्विनचं एक युट्युब Channel सुद्धा आहेत, ज्याच्या माध्यमातून तो क्रिकेटचे धडे सर्वांना देत असतो. याशिवाय चेन्नईत ‘जेन-नेक्स्ट क्रिकेट इन्स्टिट्यूट’ अश्विनने सुरु केलं आहे, या Academy ची UAE आणि UK सोबत ५ सेंटर्स आहेत. Captain रोहित शर्मानेही पिंक-बॉल कसोटीपर्यंत थांबण्याची विनंती केली होती. मात्र अश्विन अन्नाने घेतलेली ही अचानक रिटायरमेंट सगळ्यांनाच शॉक करणारी आहे. अश्विननंतर आता भारताला तितक्याच ताकदीचा ऑफ स्पिनर मिळतो का, हे येणारा काळच दाखवेल. (Latest Updates)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.