Home » Ravi Pushya Yog : रवि पुष्य योग म्हणजे काय? याचे महत्त्व काय?

Ravi Pushya Yog : रवि पुष्य योग म्हणजे काय? याचे महत्त्व काय?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ravi Pushya Yog
Share

आज माघ पौर्णिमा. माघ महिन्यातील पौर्णिमेला शास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे. या दिवशी स्नान, दान आणि व्रत केल्यास खूप पुण्य मिळतं अशी मान्यता आहे. यावेळची माघ पौर्णिमा अतिशय खास असणार आहे. कारण यादिवशी एक खास योग्य जुळून आला आहे. हा योग म्हणजे ‘रवि पुष्य नक्षत्र’. ज्योतिषशास्त्रमध्ये नक्षत्रांना मोठे महत्व आहे. एकूण २७ नक्षत्र असून, प्रत्येक नक्षत्राचे एक महत्त्व आहे. मात्र यात पुष्य नक्षत्र खूपच खास आणि महत्वाचे मानले गेले आहे. आज १ फेब्रुवारी रोजी ‘रवि पुष्य योग’ नावाचा शुभ संयोग जुळून येत आहे. नक्की ‘रवि पुष्य योग’ म्हणजे काय? काय आहे या योगाचे महत्त्व चला जाणून घेऊया. (Ravi pushya Yoga)

पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हणतात. पुष्य योगात लग्न सोडून इतर सर्व शुभ कार्य केल्याने प्रगती होते अशी धार्मीक मान्यता आहे. या योगात विशेषत: नवीन व्यवसाय सुरू करणे, सोने खरेदी करणे, वाहन खरेदी करणे आणि घर घेणे अत्यंत शुभ मानले जाते. पुष्य नक्षत्र हे २७ नक्षत्रांपैकी सर्वात शुभ, आठवे आणि ‘नक्षत्रांचा राजा’ मानले जाते. हे नक्षत्र समृद्धी, पोषण आणि लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते. या नक्षत्राचा स्वामी ‘शनि’ असून राशी ‘कर्क’ आहे. या नक्षत्राला ‘तिष्य’ किंवा ‘अमरेज्य’ या नावांनीही ओळखले जाते.’तिष्य’ म्हणजे शुभ मांगलिक नक्षत्र तर ‘अमरेज्य’ म्हणजे देव ज्याची पूजा करतात असे नक्षत्र.शनि ग्रह हा या नक्षत्राचा स्वामी मानला जातो.हे नक्षत्र इतके शुभ मानले जाते की या नक्षत्रात विवाहाव्यतिरिक्त कोणतेही शुभ कार्य पंचांग न बघताही करता येते.सर्व अशुभ योग दूर करण्याची शक्ती पुष्य नक्षत्रात आहे. (Marathi)

Ravi Pushya Yog

आज रवि पुष्य नक्षत्र योग तयार होत असल्याने आजचा दिवस हा अतिशय शुभ मानला जात आहे. रवी पुष्य योग ‘सर्वार्थ सिद्धि योग’ सारखा खूप प्रभावी मानला जातो. जेव्हा पुष्य नक्षत्र रविवारी येते तेव्हा या विशेष योगायोगाला ‘रवि पुष्य योग’ म्हणतात. हा योग अत्यंत दुर्मिळ आहे आणि वर्षातून काही वेळाच येतो. नक्षत्राच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या वेळेनुसार या योगाचा कालावधी काही तासांपासून ते संपूर्ण दिवसापर्यंत असू शकतो. पुष्य नक्षत्राचे स्थायी स्वरूप या योगात केलेल्या कामाला स्थिरता प्रदान करते, ज्यामुळे यशाची शक्यता वाढते. सूर्याची ऊर्जा आणि पुष्य नक्षत्राची शुभता एकत्रितपणे सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा दूर करते. (Latest Marathi Headline)

ज्योतिषशास्त्रानुसार, रवि पुष्य योगात केलेले सर्व काम यशस्वी होते आणि शुभ फळे देतात. हा योग विशेषतः धन, समृद्धी, व्यवसायात वाढ आणि नवीन काम सुरू करण्यासाठी खूप शुभ मानला जातो. रविपुष्य योगात सोन्या-चांदीच्या खरेदीपेक्षा कलश पूजा करणे अधिक शुभ आहे. असे केल्याने घरात धन-समृद्धी टिकून राहते. या तसेच एकाक्षी नारळाचीसुध्दा पुजा केली जाते. या नारळाच्या वरच्या बाजूला डोळ्यासारखी खूण असते, म्हणून त्याला एकाक्षी नारळ म्हणतात. एकाक्षी नारळ हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. म्हणूनच रविपुष्याच्या दिवशी ते घरी आणून, विधीवत पूजा करून तिजोरीत ठेवल्याने घरात धनाची कमतरता भासत नाही. (Top Stories)

========

Magh Purnima : जाणून घ्या माघ पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व

Maghi Purnima : घरात सुख- समृद्धी, संपत्ती मिळवण्यासाठी माघ पौर्णिमेला करा ‘हे’ उपाय

========

रविवार हा सूर्यदेवाची उपासना करण्याचा दिवस आहे किंवा या दिवशी रविपुष्य योग तयार झाल्यास सकारात्मक परिणाम प्राप्त होतात. रविपुष्य योगत सूर्यदेवाला जल अर्पण करा. पाण्यात लाल चंदन आणि गुळ टाकून अर्घ्य द्यावे. तुमची संपत्ती, धान्य, संतती आणि पराक्रम वाढेल. कुंडलीतील सूर्य दोष दूर करावा. ज्योतिष शास्त्रानुसार रविपुष्य नक्षत्राच्या दिवशी माता लक्ष्मी घरात वास करते. त्यामुळे या दिवशी पांढऱ्या-पिवळ्या कवड्यांव्यतिरिक्त कलश, चंदन, शंख इत्यादी वस्तू घरी आणाव्यात. याशिवाय सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते. याशिवाय हरभरा डाळ खरेदी करणे शुभ मानले जाते. (Social News)

(टीप: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.