तुम्हाला रत्तन फर्नीचर(Rattan Furniture) बद्दल माहितेय का? खरंतर रत्तन फर्नीचर जे अत्यंत हलके असते आणि त्याला बहुतांश लोक बांबूचे फर्निचर असे म्हणतात. मात्र रत्तन हे वेगळे असते. हे फर्निचर खुप महाग असून त्याची खरेदी करणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे. परदेशातील मार्केटमध्ये एक खुर्ची १० हजारांपर्यंत विक्री केली जाते. परंतु ते ऐवढे महाग का असते याच बद्दल आपण आज अधिक जाणून घेणार आहोत.
रत्तन म्हणजे काय?
रत्तनला केन असे ही म्हटले जाते. ही एक लांब देठासारखी वेल असते. यापासून फक्त फर्निचरच नव्हे तर टोप्या, बॅग्स ही तयार केल्या जातात. मात्र त्याचे हार्वेस्टिंग करणे सोप्पे नाही. याचा वापर फर्निचरसाठी अशा कारणासाठी केला जातो कारण ते सहज मोडले जाते. परंतु बांबूचे तसे नसते आणि ते मोडल्यास तुटतो.
रत्तन हार्वेस्ट करणे मुश्किलचे काम
रत्तन फर्निचर करणे ऐवढे महाग आहे तितकेच त्याचे हार्वेस्ट करणे सुद्धा मुश्किल आहे. रत्तनची एक वेल काढण्यासाठी काही तास लागतात. ती काढताना सावधगिरी सुद्धा बाळगावी लागते. कारण यामध्ये काटे असतात ते तासल्यानंतरच त्याचा वापर करण्यात येते. त्याचसोबत ते अत्यंत घनदाट जंगलातील दलदलीजवळ आढळते.
७-८ वर्षात पिकून तयार होते रत्तन
हे महाग असण्याचे आणखी एक कारण असे की, जे रत्तन हार्वेस्ट करण्यासाठी योग्य आहे त्याला ७-८ वर्ष लावण्यात आलेले असते. जर ते हिरव्या रंगाचे असताना हार्वेस्ट केल्यास त्याची किंमत खुप कमी होते.काही वेळेस एका वर्षात हार्वेस्ट होतच नाही आणि पुढील हार्वेस्ट सीजनची वाट पहावी लागते. एकदा हे हार्वेस्ट झाल्यानंतर त्याला तीन दिवस पाण्यामध्ये ठेवले जाते आणि त्यानंतर त्यावरील आवरण काढून सुकवले जाते. नंतर ते विविध ठिकाणी पाठवले जाते. (Rattan Furniture)
कच्चे रत्तन हे विविध गोष्टी तयार करण्यासाठी पाठवले जाते. मात्र त्याचा अर्थ असा नव्हे की, ते फर्निचर बनवण्यासाठी तयार झाले आहे. त्यासाठी काही मशीनचा वापर करावा लागतो जो रत्तन फोल्ड करण्याचे काम करतात. याचसोबत यापासून फर्निचर बवण्यासाठी काही तास लागतात. त्यावर खुप प्रक्रिया केल्यानंतर रत्तन फर्निचर मार्केमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केले जाते.
हे देखील वाचा- गाड्यांच्या टायरचा रंग हा काळाच का असतो?
खरंतर रत्तन हे इंडोनेशियामधून एक्सपोर्ट केले जाते. मात्र भारतात काही ठिकाणी ते आढळून येते. भारतात याचे प्रोडक्शन कॉस्ट कमी असल्याने त्याचा वापर केला जाते. मात्र इम्पोर्टेड रत्तन बद्दल बोलायचे झाल्यास ते खुप महाग असते.