हिंदू धर्मात रथसप्तमीला विशेष महत्त्व आहे. या सप्तमीला माघ सप्तमी असेही म्हणतात कारण ती माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या तिथीला साजरी केले जाते. यंदा रथसप्तमी २५ जानेवारी रविवार रोजी येत आहे. हिंदू धर्मातील सर्व सप्तमी मध्ये रथसप्तमी ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेव अवतरले होते. या दिवशी सूर्य देवाची आराधना केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व वाईट गोष्टी दूर होतात. या दिवशी सूर्यदेवाची पूजा आणि दान केल्याने आरोग्य आणि यश मिळते. रथसप्तमीचा दिवस हा मकरसंक्रांतीचा शेवटचा दिवस असतो. रथसप्तमी ही संपूर्ण भारतामध्ये मोठ्या जल्लोषात साजरी होती. (Rathsaptami)
यावर्षीची रथसप्तमी ही खूपच खास असणार आहे. याचे कारण म्हणजे सूर्याचा वार रविवार आणि रथसप्तमी देखील रविवारीच आली आहे. रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा केल्याने अनेक लाभ होतात. रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. या दिवसाचे व्रत म्हणून महत्त्व आहे. या पूजनाने समृद्धी प्राप्त होते. अदिती आणि कश्यप यांचे पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस आहे असे मानले जाते. भारताच्या विविध प्रांतांमध्ये पण रथ सप्तमी साजरी केली जाते. या दिवशी सूर्यदेव सात घोड्यांच्या रथावरून उत्तरायणाकडे प्रवास सुरू करतात, म्हणून हिवाळा संपतो आणि उन्हाळा सुरू होतो असे मानले जाते. (Marathi)
रथ सप्तमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करावे. या दिवशी फक्त अरुणोदयाच्या वेळी म्हणजे पहाटेच्या वेळी स्नान करणे शुभ आहे. तमिळनाडूमध्ये या पवित्र स्नानासाठी इरुकूची पानेही वापरली जातात. स्नान केल्यानंतर भक्त सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य देतात आणि नंतर दानधर्म करतात. यानंतर तुपाचा दिवा लावून, लाल फुले, कापूर आणि उदबत्ती लावून सूर्यदेवाची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया सूर्यदेवाचे स्वागत करण्यासाठी त्यांच्या घरासमोर सूर्यदेवाचे आणि त्याच्या सूर्यरथाची रांगोळी काढतात. (Todays Marathi Headline)

अनेक ठिकाणी या दिवशी अंगणात मातीच्या भांड्यात दूध ओतू घातले जाते. सूर्यदेवांच्या रथाला असणारे सप्त अश्व सप्ताहातील सात वार व बारा चाके बारा राशी दर्शवतात. या बारा राशींचे प्रतिक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते. अंगणात गोवर्या पेटवून त्यांवर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात; म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात. त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात. (Top Marathi Headline)
रथसप्तमीची पूजा झाल्यानंतर सूर्याच्या पुढील मंत्रांचा जप करावा आणि गायत्री मंत्र, सूर्य सहस्रनाम, आदित्यहृदयम्, सूर्याष्टकम यांचे पठण करावे.
ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः ।
ॐ सूर्याय नम: ।
ॐ घृणि सूर्याय नम: ।
ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा।। (Latest Marathi News)
ऊँ आदित्याय विदमहे प्रभाकराय धीमहितन्न: सूर्य प्रचोदयात्।।
ऊँ सप्ततुरंगाय विद्महे सहस्त्रकिरणाय धीमहि तन्नो रवि: प्रचोदयात्।।
रथसप्तमीचे महत्व रथसप्तमीला सूर्याची पूजा केल्याने शाश्वत फळ मिळते. तसेच सूर्यदेव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्याचा आशीर्वाद देतात. या दिवशी सूर्याकडे पाहून सूर्याची स्तुती केल्याने त्वचारोग दूर होतात आणि दृष्टी सुधारते. हे व्रत भक्ती आणि श्रद्धेने केल्याने पिता-पुत्रांमध्ये प्रेम टिकून राहते. रथसप्तमीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व असते. तुम्हाला जमेल तसे दान करा. अन्नदान, धान्यदान,वस्त्रादान करा. रथसप्तमीला सूर्याला न विसरता अर्घ्य द्यावे. असे केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्य आणि संपत्ती वाढते, म्हणून रथसप्तमीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. (Top Stories)
रथसप्तमी कथा
श्रीकृष्णाचा मुलगा सांब याला स्वत:चा खूप अभिमान झाला होता. एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते. दुर्वासा ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते. हे श्रीकृष्णाचा मुलास माहिती नव्हते. दुर्वासा ऋषी खूप दिवसाच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटावयास आले होते. दुर्वास ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते. तेव्हा हे बघून सांब त्यांना हसले. हसण्याचे कारण कळल्यावर दुर्वासांना त्याचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला “तुझे शरीर कुष्ठरोगी होईल”. तसेच घडले ही, अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली पण फायदा झाला नाही. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले. वडिलांची आज्ञा मानून सांब याने सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्यांचा रोग बरा झाला. (Scoial News)
(टीप : येथे दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
