Home » Ratha Saptami जाणून घ्या माघ सप्तमी अर्थात रथसप्तमीचे महत्व आणि माहिती

Ratha Saptami जाणून घ्या माघ सप्तमी अर्थात रथसप्तमीचे महत्व आणि माहिती

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ratha Saptami
Share

माघ महिन्यातील शुक्ल पक्ष सप्तमी ही रथ सप्तमी (Ratha Saptami) किंवा माघ सप्तमी’ म्हणून साजरी केली जाते. आजचा दिवस महाराष्ट्रासोबतच भारतातील काही राज्यांमध्ये मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. रथसप्तमीचा दिवस हा सूर्यदेवाला समर्पित आहे. आजच्या दिवशीच भगवान सूर्यदेव यांचा जन्म झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हा दिवस सूर्य जयंती म्हणून देखील साजरा करण्याची परंपरा आहे. (Ratha Saptami)

रथसप्तमीला काही जण आरोग्य सप्तमी, माघ जयंती, अर्क सप्तमी, पुत्र सप्तमी अथवा सूर्य जयंती देखील म्हणतात. आपल्याकडे मकर संक्रांतीपासून महिला हळदीकुंक करून विविध प्रकारचे वाण एकमेकींना देतात. हे हळदू कुंकू मकर संक्रातीपासून रथसप्तमीपर्यंत करण्याची पद्धत आहे. आजच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये दूध ओतू घालण्याची देखील प्रथा आहे. मोकळ्या जागेत गौऱ्या, समिधा आणि छोटे थोडेसे सरपण घेऊन त्यावर मातीचे बोळके ठेवतात. त्यात दूध घालून त्याला हळदी कुंकू वाहून मग दूध ओतू जाऊ देतात. (Top Marathi News)

रथसप्तमीचा हा दिवस अदिती आणि कश्यप यांचा पुत्र ‘सूर्य’ याचा हा जन्मदिवस असल्याची मान्यता आहे. या दिवशी सूर्य पूजनाला विशेष महत्व आहे. आजच्या दिवशी सूर्य पूजन केलेले शुभ मानले जाते. आजच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नानादि कर्मे आटोपून घ्यावे. नंतर कलशात पाणी घेऊन उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावे. सूर्याला अर्घ्य देताना सूर्याची बारा नावे आणि सूर्य मंत्राचे पठण करावे. रथसप्तमीच्या दिवशी तुळशीपुढे, दारापुढे रथसप्तमीची सात घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्यदेवाची रांगोळी काढली जाते. नंतर सूर्याला दिव्याने ओवाळून खिरीची नैवेद्य दाखवला जातो. (Lord Surya)

Ratha Saptami

रथसप्तमी या दिवसाला वैज्ञानिकदृष्ट्या देखील मोठे महत्व देखील आहे. रथसप्तमीपासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते. अर्थात पृथ्वी स्वतःभोवती आणि सूर्याभोवती प्रदक्षिणा मारत असताना, जेव्हा पृथ्वीची उत्तर धृवाकडील बाजू सूर्याच्या जवळ येते तेव्हा त्याला उत्तरायण म्हटले जाते. उत्तरायण हे साधारणपणे दरवर्षी २१ मार्च ते २१ जूनपर्यंत असते. आणि दक्षिणायन हे २२ सप्टेंबर ते २२ डिसेंबरपर्यंत असते. रथसप्तमीपासून वातावरणात देखील बदल होतात. थंडी कमी होऊन हळूहळू तापमान वाढायला लागते आणि वसंत ऋतूची सुरुवात होते.

========

हेही वाचा : 

Wheat Grass Juice निरोगी शरीरासाठी अमृततुल्य आहे गव्हांकुराचा रस

उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी चुकूनही खाऊ नका या गोष्टी, बिघडेल आरोग्य

=======

सूर्यदेव मंत्र
ॐ घृ‍णिं सूर्य्य: आदित्य:
ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा.
ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते, अनुकंपयेमां भक्त्या, गृहाणार्घय दिवाकर:
ॐ ह्रीं घृणिः सूर्य आदित्यः क्लीं ॐ
ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः
ॐ सूर्याय नम:
ॐ घृणि सूर्याय नम:

सूर्याची बारा नावे
१) ॐ मित्राय नम: |
२) ॐ रवये नम : |
३) ॐ सूर्याय नम: |
४) ॐ भानवे नम: |
५) ॐ खगाय नम: |
६) ॐ पूष्णे नम: |
७) ॐ हिरण्यगर्भाय नम: |
८) ॐ मरीचये नम: |
९) ॐ आदित्याय नम: |
१०) ॐ सवित्रे नम: |
११) ॐ अर्काय नम: |
१२) ॐ भास्कराय नम: |


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.