Home » यशस्वी होण्यासाठी रतन टाटांचे प्रेरणादायी विचार

यशस्वी होण्यासाठी रतन टाटांचे प्रेरणादायी विचार

by Jyotsna Kulkarni
0 comment
Ratan Tata
Share

प्रसिद्ध भारतीय उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. रतन टाटा यांचा जन्म व्यावसायिक घरात झाला असला तरी त्यांनी सर्वात खालच्या कामापासून करियरला सुरुवात केली. वतच्या कंपनीमध्ये त्यांनी नोकरी केली त्यानंतर ते स्वतःच्या हुशारीच्या, मेहनतीच्या जोरावर वर येऊ लागले. रतन टाटा यांना व्यावसायिक क्षेत्रामध्ये दूरदृष्टी असलेला, चाणाक्ष, हुशार आणि माणुसकीने ओतप्रोत व्यक्ती म्हणून ओळखले जाते.

रतन टाटा यांनी टाटा समूहाला मोठे करताना देशाचा आणि समाजाचा देखील तितकाच विचार केला. समाजाचे आणि देशाचे ऋण फेडण्यासाठी टाटा यांनी अनेक कार्य केली. विविध सामाजिक गोष्टींमधून टाटा यांनी नेहमीच गरजू लोकांना मदतीचा हात पुढे केला. हे सर्व करत असताना त्यांनी येणाऱ्या पिढीला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अनेक गोष्टी शिकवल्या. काय करावे काय करू नये याबद्दल त्यांनी नेहमीच तरुणांना मार्गदर्शन केले. चला जाणून घेऊया रतन टाटा यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी मांडलेले त्यांचे विचार.

Ratan Tata

रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार

  • आयुष्यात पुढे जाण्यासाठी चढ-उतार अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण ECGमध्ये सरळ रेषेचा अर्थ असतो आपण जीवंन नाही
  • सत्ता आणि पैसा हे माझे सिद्धांत नाही.
  • जर तुम्हाला वेगात चालायचे असेल तर एकटे चालत राहा पण तुम्हाला दुरपर्यंत चालायचे असेल तर इतरांच्या बरोबर चाला.
  • लोखंडाला कोणीही नष्ट करू शकत नाही पण त्याला त्याच गंज नष्ट करू शकतो. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला इतर कोणीही नष्ट करू शकत नाही त्याला त्याची मानसिकता नष्ट करते.
  • लोक तुमच्यावर दगड फेकत असतील तर ते उचला आणि त्याचा वापर एक स्मारक तयार करण्यासाठी करा.
  • मी योग्य निर्णय घेण्यावर विश्वास ठेवत नाही मी निर्णय घेतो आणि नंतर तो योग्य करून दाखवतो.
  • ज्या दिवशी मी उडण्यास सक्षम नसेल तो दिवस माझ्यासाठी अत्यंत दुखी दिवस असेल.
  • शेवटी आपल्याला अशा संधीसाठी पश्चाताप होतो ज्या आपण गमावतो. प्रत्येक छोटी संधी तुम्हाला मोठे बनवू शकते.
  • सर्वात मोठे अपयश प्रयत्न न करणे हे आहे.
  • गोष्टी नशिबावर सोडण्यावर माझा विश्वास नाही. माझा कठोर परिश्रम आणि तयारीवर विश्वास आहे.
  • आयुष्यात फक्त चांगली शैक्षणिक पात्रता किंवा चांगले करिअर पुरेसे नाही. त्यापेक्षा संतुलित आणि यशस्वी जीवन जगणे हे आपले ध्येय असले पाहिजे. संतुलित जीवन म्हणजे आपले चांगले आरोग्य, लोकांशी चांगले संबंध आणि मनःशांती या गोष्टी असणार महत्त्वाचे आहे.
  • इतरांचे अनुकरण करणारी व्यक्ती थोड्या काळासाठी यश मिळवू शकते, परंतु तो आयुष्यात जास्त प्रगती करू शकत नाही.
  • मेहनत करणाऱ्या तुमच्या मित्रांना तुम्ही कधीही चिडवू नका. एक वेळ अशी येईल की तुम्हालाही त्याच्या हाताखाली काम करावे लागेल.
  • आपल्या चुका आपल्या एकट्याच्या आहेत, आपले अपयश एकट्याचे आहे, त्यासाठी कोणाला दोष देऊ नये. चुकीतून शिकून आयुष्यात पुढे जायला हवे.
  • टीव्हीचे आयुष्य खरे नाही आणि टीव्ही मालिकेसारखे आयुष्यही नाही. वास्तविक जीवनात विश्रांती नाही, फक्त काम आहे.
  • जे लोक इतरांची कॉपी करतात ते थोड्या काळासाठी यश मिळवू शकतात, परंतु ते आयुष्यात फार प्रगती करू शकत नाहीत.
  • काही शाळा तुम्हाला उत्तीर्ण होईपर्यंत परीक्षा देऊ देतात. पण बाहेरच्या जगाचे नियम वेगळे आहेत, तिथे हरणाऱ्याला दुसरी संधी मिळत नाही.
  • आपण माणसं आहोत, संगणक नाही, त्यामुळे जीवनाचा आनंद घ्या, नेहमी गंभीर करू नका.
  • पराभवाची भिती मनात नसणं हा जिंकण्याचा एकमेव मार्ग आहे.
  • गोष्टी नशिबावर सोडायच्या यावर माझा विश्वास नाहीय. कठोर मेहनत आणि तयारीवर माझा विश्वास आहे.
  • आपलं मूळ कधी विसरु नका. जिथून तुम्ही आलात, नेहमी त्याचा अभिमान बाळगा.
  • तुम्ही मुल्य आणि सिद्धांताशी कधी तडजोड करु नका. भले, तुम्हाला त्यासाठी कठीण रस्त्यावरुन चालाव लागेल.
  • तुम्हाला एक लढाई जिंकण्यासाठी एकापेक्षा जास्तवेळ लढावं लागू शकत.
  • ज्या माणसाला आपल्या सभोवताली आपल्यापेक्षा अधिक हुशार माणसे हवी असतात तोच माणूस चांगले नेतृत्व करू शकतो.
  • आव्हानांचा सामना जिद्दीने आणि चिकाटीने करा कारण यश मिळवण्यासाठी ते खूप महत्वाचे असते.
  • “इतरांशी संवाद साधताना दयाळूपणा, सहानुभूती आणि करुणेची शक्ती कधीही कमी लेखू नका.”

     


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.